Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलिवूड हादरवणार अक्षय कुमारचा ‘Samuk’! ऑस्कर विजेते तंत्रज्ञ बनवणार भयानक परग्रही राक्षस; पाहा चित्रपटाची इनसाईड स्टोरी

Akshay Kumar Film Samuk : अक्षय कुमार लवकरच 'समूक' या सायन्स-फिक्शन हॉरर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात हॉलिवूडचे तंत्रज्ञ असून एक भयानक परग्रही राक्षस दाखवण्यात आला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: May 24, 2026 | 02:23 PM
akshay kumar upcoming movie samuk sci fi alien horror hollywood technicians

akshay kumar upcoming movie samuk sci fi alien horror hollywood technicians

Follow Us
Follow Us:
  • हॉलिवूड-शैलीतील पदार्पण
  • हॉलिवूडच्या दिग्गज तंत्रज्ञांची एन्ट्री
  • १२ वर्षांनंतर ऐतिहासिक युती

Akshay Kumar Samuk Movie Announcement : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणजेच अक्षय कुमार (Akshay Kumar) नेहमीच रुपेरी पडद्यावर नवनवीन प्रयोग करण्यासाठी ओळखला जातो. सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत सस्पेन्स, थ्रिलर आणि मोठ्या बजेटच्या अ‍ॅक्शन सिनेमांचा ट्रेंड सुरू असताना, अक्षय कुमार प्रेक्षकांसाठी थेट हॉलिवूडच्या तोडीचा थरार घेऊन येत आहे. अक्षय कुमार लवकरच ‘समूक’ (Samuk) या सायन्स-फिक्शन एलियन हॉरर थ्रिलर चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची सर्वात मोठी खासियत म्हणजे यात दाखवला जाणारा एलियन (परग्रही प्राणी) हा आजवरच्या भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात भयानक राक्षस ठरणार आहे, ज्याची निर्मिती पूर्णपणे हॉलिवूड तंत्रज्ञानाच्या मदतीने केली जात आहे.

१२ वर्षांनंतर जुळला ऐतिहासिक योग

‘समूक’ चित्रपटाचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा करत असून, या मेगा-बजेट प्रोजेक्टची निर्मिती अक्षय कुमार, विपुल अमृतलाल शाह आणि आशिष शाह संयुक्तपणे करत आहेत. विशेष बाब म्हणजे, ‘आंखे’, ‘वक्त’ आणि ‘नमस्ते लंडन’ सारखे सुपरहीट चित्रपट देणारी अक्षय कुमार आणि निर्माते विपुल अमृतलाल शाह यांची जोडी तब्बल १२ वर्षांनंतर या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आली आहे. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांना आणि समीक्षकांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर बनवला जात असून, याचे बरेचसे चित्रीकरण भारताबाहेर परदेशात होणार असल्याचे समजते.

हे देखील वाचा : Aishwarya Rai Cannes look 2026 : अखेर सौंदर्याची राणी रेड कार्पेटवर अवतरलीच; ऐश्वर्या राय बच्चनच्या अदांवर चाहते फिदा

‘मिशन इम्पॉसिबल’ फेम स्टंट डायरेक्टरची एन्ट्री

या चित्रपटाची अ‍ॅक्शन केवळ हवेत उड्या मारण्यापुरती मर्यादित नसेल, तर ती अत्यंत वास्तववादी आणि थरारक असणार आहे. ‘मिशन: इम्पॉसिबल – द फायनल रेकनिंग’, ‘वेनम’, ‘नो टाइम टू डाय’ (जेम्स बाँड) आणि ‘स्टार वॉर्स’ यांसारख्या ब्लॉकबस्टर हॉलिवूडपटांमध्ये अ‍ॅक्शनचे दिग्दर्शन करणारे प्रख्यात स्टंट समन्वयक ल्यूक टंबर (Luke Tamber) या चित्रपटाचे अ‍ॅक्शन डिझाईन करत आहेत. ल्यूक टंबर यांनी अक्षय कुमारचे कौतुक करताना त्याला “भारताचा खराखुरा अ‍ॅक्शन हिरो” म्हटले आहे. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्टंट कौशल्य आणि दमदार लाइव्ह-ॲक्शन यांचे परिपूर्ण मिश्रण असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

#AkshayKumar confirms #SAMUK 👽🔥
India’s first big-scale alien horror thriller with Hollywood-level action & creature design.
Akshay says it’s “a totally new genre” for him & Indian cinema 🚀 – @htcity pic.twitter.com/kihgtE5WUg
— AKSHAYKUMARNEWS 🇮🇳 (@Akkian_Gauravv) May 24, 2026

credit – social media and Twitter

ऑस्कर नामांकित आर्टिस्ट बनवणार ‘भयानक एलियन’

चित्रपटात केवळ व्हीएफएक्स (VFX) वर अवलंबून न राहता प्रत्यक्ष दिसणाऱ्या क्रिएचर इफेक्ट्सवर (Practical Creature Effects) जास्त भर दिला जाणार आहे. यासाठी ऑस्कर-नामांकित प्रसिद्ध इफेक्ट्स आर्टिस्ट ॲलेक गिलीज (Aleक Gillis) यांची निवड करण्यात आली आहे. ॲलेक गिलीज हे हॉलिवूडमधील अनेक एलियन आणि मॉन्स्टर चित्रपटांसाठी ओळखले जातात. त्यांनी सांगितले की, ‘समूक’मधील एलियन राक्षस हा अत्यंत अद्वितीय, क्रूर आणि धोकादायक असेल. अक्षय कुमारच्या तोडीचा आणि त्याला पडद्यावर तगडे आव्हान देणारा खलनायक तयार करणे हे आमचे मुख्य ध्येय आहे, जेणेकरून प्रेक्षकांच्या अंगावर काटा येईल.

हे देखील वाचा : Quetta Blast: पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरात मोठा बॉम्बस्फोट; आत्मघाती हल्लेखोराने रेल्वे रुळ उडवला, 23 जण ठार, VIDEO

अक्षय कुमारने व्यक्त केली कमालीची उत्सुकता

अक्षय कुमारने स्वतः या चित्रपटाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तो म्हणाला, “सायन्स-फिक्शन एलियन हॉरर हा जॉनर माझ्यासाठी पूर्णपणे नवीन आहे. जेव्हा मला कनिष्कने ही कथा ऐकवली, तेव्हा मी एका क्षणात होकार दिला. ही कथा अत्यंत रंजक आणि खिळवून ठेवणारी आहे.” सध्या अक्षय कुमार त्याच्या ‘वेडिंग टू द जंगल’ आणि इतर चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असला, तरी ‘समूक’च्या घोषणेने चाहत्यांची आणि चित्रपट जगताची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. बॉलिवूडला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारा हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

💡

Frequently Asked Questions

  • Que: अक्षय कुमारच्या आगामी सायन्स-फिक्शन चित्रपटाचे नाव काय आहे?

    Ans: अक्षय कुमारच्या आगामी हॉलिवूड-शैलीतील सायन्स-फिक्शन एलियन हॉरर चित्रपटाचे नाव 'समूक' (Samuk) असे आहे.

  • Que: समूक' चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती कोण करत आहे?

    Ans: या चित्रपटाचे दिग्दर्शन कनिष्क वर्मा करत असून, निर्मिती अक्षय कुमार आणि विपुल अमृतलाल शाह संयुक्तपणे करत आहेत.

  • Que: या चित्रपटात कोणते हॉलिवूड तंत्रज्ञ काम करत आहेत?

    Ans: 'मिशन इम्पॉसिबल'चे स्टंट डायरेक्टर ल्यूक टंबर आणि ऑस्कर-नामांकित इफेक्ट्स आर्टिस्ट ॲलेक गिलीज या चित्रपटात काम करत आहेत.

Web Title: Akshay kumar upcoming movie samuk sci fi alien horror hollywood technicians

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • bollywood Flim
  • Entertainement News

संबंधित बातम्या

Welcome to the Jungle Box Office: विकेंडनंतरही दमदार कमाई कायम; पहिल्या सोमवारी 8 कोटींचा गल्ला
1

Welcome to the Jungle Box Office: विकेंडनंतरही दमदार कमाई कायम; पहिल्या सोमवारी 8 कोटींचा गल्ला

Marathi Serial: ‘राजवाडे, I Love You! स्वानंदीने दिली प्रेमाची कबुली; बायकोच्या आधी समरने केली वटपौर्णिमेची पूजा; पाहा प्रोमो
2

Marathi Serial: ‘राजवाडे, I Love You! स्वानंदीने दिली प्रेमाची कबुली; बायकोच्या आधी समरने केली वटपौर्णिमेची पूजा; पाहा प्रोमो

होम्बळे फिल्म्सची मोठी घोषणा! सूर्या, कायाडू लोहार आणि टी. जे. ज्ञानवेल पहिल्यांदाच एकत्र
3

होम्बळे फिल्म्सची मोठी घोषणा! सूर्या, कायाडू लोहार आणि टी. जे. ज्ञानवेल पहिल्यांदाच एकत्र

Kiss Controversy: किसिंग सीनदरम्यान कंगना रणौतने अभिनेत्याच्या ओठाला घेतला चावा? व्हायरल Videoनंतर रंगली चर्चा
4

Kiss Controversy: किसिंग सीनदरम्यान कंगना रणौतने अभिनेत्याच्या ओठाला घेतला चावा? व्हायरल Videoनंतर रंगली चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.