Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! सावळ्या-इराच्या नात्याची परीक्षा घेण्यासाठी येतोय एक मोठा धोका!

Jay Jay Swami Samarth Serial: ‘जय जय स्वामी समर्थ - उत्सव बाप्पाचा, लीला स्वामींची’ मालिकेत इराच्या आयुष्यात नव्या संकटाची चाहूल लागली आहे. स्वामींच्या गूढ इशाऱ्यानंतर इरासमोर कोणती परीक्षा उभी राहणार, याची उत्सुकता वाढली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 18, 2026 | 06:15 PM
Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jay Jay Swami Samarth Serial: स्वामींनी दिला संकटाचा इशारा! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • इराची नवी परीक्षा
  • सावळ्याचं गुपित कायम
  • गणपतची एंट्री
“ज्योत उजळत असली तरी तिच्या भोवती काजळी जमा होतेच… आणि इरा, तुलाही या काजळीचा सामना करावा लागणार!” स्वामींच्या या गूढ इशाऱ्याने आगामी भागांमध्ये इराच्या आयुष्यात येणाऱ्या वादळाची चाहूल लागली आहे. एका बाजूला सावळ्याच्या भूतकाळाचं काळं सत्य आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या आयुष्यात उमलत चाललेलं इराचं स्थान… या दोन्हींच्या गुंत्यात आता एका नव्या संकटाची एंट्री होणार आहे.

इराची परीक्षा सुरू

इराची परीक्षा सुरू होणार आहे… सावळ्याचं सत्य अजूनही गुपित आहे… आणि गणपतच्या रूपाने या नात्यावर संकटाची सावली पडली आहे! आता स्वामींची लीला कोणतं नवं वळण घेणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. सावळ्याला त्याच्या आयुष्याचं खरं सत्य कधी कळणार? गणपतच्या नजरेपासून इराला सावळ्या वाचवू शकेल का?

इराची आणि सावळ्याची ही वाढती जवळीक त्यांना स्वामींच्या नियोजित मार्गावर घेऊन जाणार की एका मोठ्या संघर्षाकडे? आणि एका दरोडेखोराचं भक्तात होणारं हे अद्भुत परिवर्तन नेमकं कसं घडणार?या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मालिकेचे आगामी भाग नक्की पाहा! पहा, ‘जय जय स्वामी समर्थ – उत्सव बाप्पाचा, लीला स्वामींची’, दररोज रात्री 8:10 वा. फक्त कलर्स मराठीवर. Jay Jay Swami Samarth Serial:

भविष्यात काय घडणार?

सावळ्याच्या आयुष्यावर झालेला अन्याय जेव्हा इराला समजतो, तेव्हा त्याच्याबद्दल तिच्या मनात केवळ सहानुभूती राहत नाही, तर त्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. सावळ्यालाही इराच्या सहवासाची जाणीव होऊ लागली आहे. मात्र, आपल्या आयुष्यात दडलेलं सत्य त्याला अद्याप माहीत नाही. स्वामींना मात्र भविष्यात काय घडणार आहे याची पूर्ण जाणीव आहे.

म्हणूनच इरा सावळ्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न करते, तेव्हा स्वामी तिला थांबवतात. “सांगायचं असतं तर आम्ही नसतं का सांगितलं एव्हाना… त्याची वेळ अजून यायची आहे!” स्वामींच्या या शब्दांमुळे प्रश्न आणखी गडद होतो—इराला सावळ्याचं सत्य कधी सांगता येणार? आणि तो क्षण येईपर्यंत तिच्या आणि सावळ्याच्या नात्याचं काय होणार?

भूतकाळाचे धागे पुन्हा घट्ट

सुभानची एंट्री… आणि नात्यासमोर उभं ठाकणारं नवं संकट! – या सगळ्यात सावळ्याच्या आयुष्यात एंट्री होते सुभानची एक हिंसक, निर्दयी आणि गुन्हेगारी जगात रमलेला चेहरा. त्याच्या आगमनाने सावळ्याच्या भूतकाळाचे धागे पुन्हा घट्ट होतात; पण त्याहून मोठा धक्का तेव्हा बसतो, जेव्हा सुभानची नजर इरावर पडते. सुभानच्या विकृत नजरेची जाणीव होताच सावळ्या संतापतो. इराच्या सन्मानासाठी तो सुभानला थेट विरोध करतो. आणि इथेच एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडते. “ठिणगी पडली… आता द्रौपदीवरून महाभारत होणार!” असा स्वामींचा इशारा या संघर्षाची तीव्रता आणखी वाढवतो.

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

मात्र या कथेतला सर्वांत मोठा आणि कधीही न पाहिलेला प्रवास अजून बाकी आहे एक दरोडेखोरापासून त्याचा एक भक्तामध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा! ज्याच्या हातात आजवर गुन्ह्याचं शस्त्र होतं, त्याच हातात उद्या स्वामींच्या नामाची माळ असेल का? ज्याच्या आयुष्यात हिंसा आणि दहशत होती, तिथे श्रद्धेचा प्रकाश कसा पोहोचणार? इराची साथ या परिवर्तनात किती निर्णायक ठरणार? आणि स्वामींच्या कृपेने सावळ्याला त्याच्या नियतीच्या फेर्‍यातून मुक्ती मिळणार का? अखेर इराच्या अपहरणामागे नेमकं काय सत्य दडलंय ?.

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे

Web Title: Jay jay swami samarth ira savlya ganpat upcoming episode marathi serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 06:15 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Yemen War : येमेन हादरला! संघर्षामुळे १.१२ लाख लोक विस्थापित; हजारोंनी जिबूतीत घेतला आश्रय
1

Yemen War : येमेन हादरला! संघर्षामुळे १.१२ लाख लोक विस्थापित; हजारोंनी जिबूतीत घेतला आश्रय

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे
2

Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची निवड; विविध भाषांमधील 33 चित्रपटांना टाकले मागे

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
3

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

World News : काळ्या दगडावरची पांढरी रेष ;ट्रम्प आणि नेतन्याहू सत्तेत असे पर्यंत होर्मूझ बंदच राहणार ;इराण
4

World News : काळ्या दगडावरची पांढरी रेष ;ट्रम्प आणि नेतन्याहू सत्तेत असे पर्यंत होर्मूझ बंदच राहणार ;इराण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.