
Gondhal Movie: Oscarसाठी मराठी चित्रपट ‘गोंधळ’ची (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Gondhal Movie: मराठी चित्रपटसृष्टीसाठी एकदम भारी बातमी आहे. संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ‘ हा मराठी सिनेमा आता थेट ऑस्करला जाणार आहे. 99 व्या ऑस्कर अवॉर्डसाठी म्हणजे ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत एंट्री म्हणून ‘गोंधळ’ ची निवड झाली आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने म्हणजेच FFI ने ही घोषणा केली आहे. बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म या कॅटेगरीमध्ये आता ‘गोंधळ’ भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. ही मराठी सिनेमासाठी खूप मोठी गोष्ट आहे. Gondhal Movie:
गोंधळ’ हा एक थ्रिलर सिनेमा आहे. पण त्याची गोष्ट आपल्या मातीतली आहे. महाराष्ट्रात लग्नानंतर किंवा वरा-नवरीच्या आयुष्यातले विघ्न दूर करण्यासाठी गोंधळ घातला जातो. ही परंपरा महाराष्ट्रात जवळपास 80 टक्के भागात पाळली जाते. ‘कांतारा’ सिनेमा कर्नाटकच्या 20 टक्के भागातल्या परंपरेवर होता, ‘दशावतार’ कोकणात प्रसिद्ध आहे, पण ‘गोंधळ’ तर अख्ख्या महाराष्ट्रात साजरा होतो. हीच या सिनेमाची सगळ्यात मोठी ताकद आहे.
हा सिनेमा फक्त एका धार्मिक विधीवर नाहीये. तर त्याच्या मागे अंधश्रद्धा, घरातली भांडणं, नात्यांमधले प्रॉब्लेम, समाजाची बदलती विचारसरणी आणि माणसाच्या मनातला गोंधळ हे सगळं दाखवलं आहे. त्यामुळे हा सिनेमा फक्त मराठी माणसालाच नाही तर जगभरातल्या प्रेक्षकांना पण कनेक्ट होईल असा आहे. सिनेमाचं प्रेझेंटेशन खूप भव्य आहे. कॅमेरा वर्क, बॅकग्राऊंड म्युझिक आणि टेक्निकल गोष्टी एकदम टॉप लेव्हलच्या आहेत. त्यामुळे मराठी संस्कृती जगासमोर खूप ताकदीने मांडली गेली आहे.
दरवर्षी FFI जगभरातून ऑस्करला पाठवण्यासाठी एका भारतीय सिनेमाची निवड करतं. यावर्षी अनेक हिंदी, तमिळ, मल्याळम सिनेमे रेसमध्ये होते, पण त्यातून ‘गोंधळ’ ने बाजी मारली. याचं कारण म्हणजे सिनेमाचा विषय. ऑस्करमध्ये नेहमी आपल्या मातीतले, आपल्या संस्कृतीतले सिनेमे जास्त लक्ष वेधून घेतात. ‘गोंधळ’ मध्ये ती ओरिजिनॅलिटी आहे. तो कुठल्या सिनेमाची कॉपी नाहीये.
या सिनेमात मराठीतले दिग्गज कलाकार आहेत. किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळिंबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. प्रत्येकाने आपलं काम खूप चांगलं केलं आहे. विशेषतः किशोर कदम यांचा अभिनय नेहमीप्रमाणेच दमदार आहे.
याआधी पण मराठी सिनेमांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत. पण ऑस्करला अधिकृत एंट्री म्हणून जाणं हे वेगळंच आहे. यामुळे मराठी सिनेमा जागतिक लेव्हलवर पोहोचेल. आता पुढची प्रोसेस सुरू होईल. ऑस्करच्या ज्युरींना हा सिनेमा दाखवला जाईल. जगभरातल्या देशांमधून आलेल्या सिनेमांमधून बेस्ट 15, मग बेस्ट 5 निवडले जातील. ‘गोंधळ’ तिथपर्यंत पोहोचला तरी तो मोठा विजय असेल. संतोष डावखर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं सगळीकडून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर पण ‘गोंधळ’ ट्रेंड होत आहे. सगळे मराठी प्रेक्षक आता प्रार्थना करत आहेत की ‘गोंधळ’ ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्ये यावा आणि मराठीचा झेंडा जगभरात फडकावा.
या ३३ चित्रपटांमध्ये १४ हिंदी, ४ मराठी, ४ तेलगू, ४ गुजराती, ३ तमिळ, १ मल्याळम, १ नागामी आणि १ मूक (Silent) चित्रपटाचा समावेश होता