Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Alia Bhatt रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामील; अभिनेत्रीला गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने केले सन्मानित

अभिनेत्री आलिया भट्ट सध्या इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री आहे. आता, आलियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे. तिला गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Dec 11, 2025 | 02:49 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • Alia Bhatt रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये सामील
  • अभिनेत्रीला गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने केले सन्मानित
  • गोल्डन ग्लोब्सच्या अध्यक्षांनी आलिया भट्टचे केले कौतुक
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट कारकिर्दीत आणखी एक मोठे काम केले आहे. रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये या अभिनेत्रीला गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ट्युनिशियातील अभिनेत्री हेंड साबरी हिच्यासोबत एका समारंभात आलियाचा सन्मान करण्यात आला आहे. अभिनेत्रीला ओमर शरीफ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून, रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलची पाचवी आवृत्ती सौदी अरेबियातील जेद्दाह येथे आयोजित करण्यात आली आहे.

वल्लरी पिंगा गर्ल्सच्या मदतीने घेणार मिनाक्षीचा शोध! पाहा ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचा विशेष भाग

आलिया भट्टने पुरस्काराबद्दल व्यक्त केला आनंद

गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्कार जिंकल्याबद्दल आनंद व्यक्त करताना आलिया भट्ट म्हणाली, “गोल्डन ग्लोब्सने सन्मानित होणे हा एक मोठा सन्मान आहे. जगभरातील चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या नवीन पिढीतील इच्छुक कलाकार आणि महिलांच्या वतीने बोलण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. अशा वेळी जेव्हा लोक प्रभावी कथा सांगण्यासाठी जागतिक स्तरावर एकत्र येत आहेत, तेव्हा या सन्मानाचे खूप महत्त्व आहे.” असे अभिनेत्रीने सांगितले.

 

गोल्डन ग्लोब्सच्या अध्यक्षांनी आलिया भट्टचे केले कौतुक

या प्रसंगी, गोल्डन ग्लोब्सच्या अध्यक्षा हेलेन होहन म्हणाल्या, “आम्हाला आलिया भट्टला गोल्डन ग्लोब्स होरायझन पुरस्काराने सन्मानित करताना आनंद होत आहे. हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील तिच्या असाधारण योगदानाची दखल घेतो आणि जागतिक स्तरावर चित्रपट आणि टेलिव्हिजनसाठी एक गतिमान आणि प्रभावशाली केंद्र म्हणून मध्य पूर्व, आशिया आणि त्यापलीकडे वाढत्या सर्जनशील उर्जेचे प्रतिबिंबित करतो.”

Dhurandhar चित्रपटातून Akshaye khannaचा कमबॅक, एक्स गर्लफ्रेंडने केली खास पोस्ट, शेअर केला ‘तो’ फोटो, म्हणाली…

आलियाने आगामी चित्रपटाबद्दल सांगितले

महोत्सवादरम्यान, आलियाने तिच्या बहुप्रतिक्षित आगामी “अल्फा” चित्रपटाबद्दल काही संकेत दिले, माध्यमांशी बोलताना आलिया म्हणाली की, “अल्फा हा यशराज फिल्म्सच्या विश्वातील पहिला महिला ॲक्शन चित्रपट आहे, म्हणून हा एक धोका आहे कारण इतिहासात अशा प्रकारचे चित्रपट पुरुष प्रधान भूमिकांमध्ये पाहायला मिळालेले आहे. परंतु आता ही ॲक्शन भूमिका एक स्त्री साकारताना दिसणार आहे.” यशराज फिल्म्सच्या विश्वातील सातवा चित्रपट “अल्फा” मध्ये आलिया भट्ट, शर्वरी आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित, हा चित्रपट १७ एप्रिल २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Alia bhatt won golden globes horizon award at red sea international film festival she feels proud and happy

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • alia Bhatt
  • Bollywood
  • entertainment

संबंधित बातम्या

वल्लरी पिंगा गर्ल्सच्या मदतीने घेणार मिनाक्षीचा शोध! पाहा ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचा विशेष भाग
1

वल्लरी पिंगा गर्ल्सच्या मदतीने घेणार मिनाक्षीचा शोध! पाहा ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचा विशेष भाग

‘आमच्यात कोणतेही भांडण नव्हते…’ करण कुंद्रासोबतच्या ब्रेकअपवर अखेर आता कृतिका कामराने सोडले मौन; सांगितले कारण
2

‘आमच्यात कोणतेही भांडण नव्हते…’ करण कुंद्रासोबतच्या ब्रेकअपवर अखेर आता कृतिका कामराने सोडले मौन; सांगितले कारण

‘३ महिन्याच्या मुलीने मांडीवरच सोडला जीव’, सुनीता आहुजा आणि गोविंदाने गमावले तिसरे मुल; दुःख व्यक्त करत म्हणाली…
3

‘३ महिन्याच्या मुलीने मांडीवरच सोडला जीव’, सुनीता आहुजा आणि गोविंदाने गमावले तिसरे मुल; दुःख व्यक्त करत म्हणाली…

दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या शाळेत पार पडला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चा संगीत अनावरण सोहळा
4

दिग्दर्शक हेमंत ढोमेच्या शाळेत पार पडला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चा संगीत अनावरण सोहळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.