(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘पिंगा गं पोरी पिंगा’ वेगळ्या वळणावर येऊन पोहचली आहे. या मालिकेत वल्लरीची चाहती म्हणून बेळगावहून मुंबईत आलेली मीनाक्षी हरवली आहे. आणि तिला शोधण्यासाठी वल्लरी काय काय करते हे सगळं आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच प्रेक्षकांना पाहायला मिळणार भाग हा १ तासांचा विशेष भाग असणार आहे.
‘गोलमाल 5’ मध्ये Kareena आणि Sara एकत्र? Rohit Shettyने दिली हिंट; कुणाल खेमूचा रोल बदलणार
कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेतील बुलबुल बागेत सध्या प्रचंड गोंधळ माजला आहे. वल्लरीची चाहती म्हणून बेळगावहून मुंबईत आलेली मीनाक्षी अचानक रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली आहे. घरच्यांना न सांगता परीक्षा देण्यासाठी मुंबईत आलेली ही साधी, निरागस मुलगी अचानक गायब झाल्याने बुलबुल बागेतील सगळ्यांची झोप उडाली आहे. मीनाक्षीच्या गायब होण्याची माहिती मिळताच वल्लरी सगळ्या पिंगा गर्ल्सना एकत्र करून शोधमोहीमेवर निघते.
परिसरातील गल्ली–बोळ, मैदाने, लोकल स्टेशनपासून ते मीनाक्षी शेवटची दिसली त्या भागापर्यंत सगळीकडे तगडी चौकशी सुरू होते. मुली भेदरलेल्या असल्या तरी एकमेकींचा हात घट्ट धरून मीनाक्षीला शोधून काढण्याचा निर्धार करतात. मीनाक्षी कुठे आहे? तिच्या गायब होण्यामागे नक्की कोणाचा हात आहे का? वल्लरी पिंगा गर्ल्सच्या साथीने मीनाक्षीला कशी शोधून काढणार ? या प्रश्नांची उत्तरं मिळणार आणि बुलबुल बागेत उलघडणारं एक धक्कादायक सत्य प्रेक्षकांना येणारी आगामी भागात पाहायला मिळणार आहे. पिंगा गं पोरी पिंगा मालिकेचा महारविवार विशेष भाग प्रदर्शित होणार आहे.
शोधमोहीम जसजशी खोलात जाते तसतसे काही धक्कादायक संकेत समोर येऊ लागतात. मीनाक्षीचं अपहरण केलं गेल्याची शक्यता बळावते. त्यातच बुलबुल बागेत अलीकडेच दाखल झालेली मंजुषा जी एका प्रतिष्ठित आश्रमाशी जोडलेली आहे तिच्यावर आता संशयाची सुई वळू लागली आहे. अचानक बेपत्ता झालेल्या मीनाक्षीच्या शोधासाठी बुलबुल बागेतली प्रत्येक मुलगी रात्रंदिवस धडपड करत आहे. रहस्य अधिक गडद होत चाललं असून या प्रकरणात मोठ्या रॅकेटचा सुगावा मिळत असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.






