
फोटो सौजन्य - Social Media
जेष्ठ अभिनेते Anupam Kher यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ते त्याच रेल्वे स्थानकावर उभे आहेत, जेथे 32 वर्षांपूर्वी ‘Dilwale Dulhaniye Le Jayenge’ या सिनेमाच्या त्या Iconic क्षणाची शूटिंग पार पडली होती. अनुपम खेर यांनी त्या ठिकाणी शूटिंगच्या निमित्ताने का होईना, परंतु भेट दिली आणि त्या आठवणींना उजाळा दिला. फक्त इतकेच नव्हे तर त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे एक मागणीही केली.
कुठे आहे ‘तो’ Iconic Railway Station?
Dilwale Dulhaniye Le Jayenge या सिनेमातील शेवटचा रेल्वे स्थानकावरील seen महाराष्ट्रातील कोकण रेल्वेवर स्थित ‘आपटा’ या रेल्वेस्थानकावर Shoot करण्यात आले होते. आपटा रेल्वे स्थानक कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी काही नवीन नाही.
काय आहे Anupam Kher यांची पोस्ट, काय आहे मागणी?
Bollywood Veteran Actor Anupam Kher यांनी त्यांच्या @anupampkher या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट शेअर केली आहे. ते Dilwale Dulhaniye Le Jayenge या सिनेमातील Iconic क्षण ज्या ठिकाणी शूट करण्यात आल्या त्या आपटा रेल्वेस्थानकावर एका Shoot मध्ये व्यस्थ आहेत. दरम्यान, त्यांनी त्या ठिकाणच्या Dilwale Dulhaniye Le Jayenge सिनेमासंबंधित 32 वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र शासनाकडे एक मागणीही केली आहे. त्यांनी आपटा रेल्वे स्थानकाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात यावे, यासाठी शासनाला निवेदन केले आहे.