Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘भगवा है अपनी पहचान’ ‘शतक’ चित्रपटातील ‘या’ दमदार गाण्याचे श्री मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण

‘शतक' हा आगामी चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांची वाटचाल उलगडणार असून, चित्रपटामधील पहिल्याचे अनावरण करण्यात आले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jan 14, 2026 | 03:56 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘शतक’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित
  • ‘भगवा है अपनी पहचान’ गाणं पप्रेक्षकांच्या भेटीस
  • ‘शतक’ चित्रपट कधी होणार प्रदर्शित
 

‘शतक – आरएसएस के १०० वर्ष ’ या चित्रपटातील पहिले प्रभावी गीत ‘भगवा है अपनी पहचान’ नुकतेच नवी दिल्लीतील केशव कुंज येथे आयोजित विशेष सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक श्री मोहन भागवत यांच्या हस्ते या गीताचे अधिकृत अनावरण करण्यात आले. हा सोहळा ‘शतक’ चित्रपटाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. हा चित्रपट आरएसएसची न उलगडलेली कहाणी, त्याचे प्रमुख नेते आणि भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जडणघडणीतले योगदान उलगडण्याचा प्रयत्न करतात.

हे गीत भगव्याचे सामर्थ्यपूर्ण आवाहन आहे. बलिदान, शिस्त आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक असलेला भगवा रंग केवळ एक चिन्ह न राहाता, मूल्ये, सेवा आणि सामूहिक जाणीव यांवर आधारित ओळख म्हणून या गीतात साकारला आहे. भगव्या ध्वजाखाली एकतेचे आवाहन करत, समान ध्येय आणि सांस्कृतिक अभिमानाने एकत्र उभे राहाण्याचा संदेश हे गीत देते.

‘अगं अगं सूनबाई..’ केदार शिंदे यांच्या चित्रपटामधून उलगडणार सासू-सुनेचे नवे भावविश्व

उत्साह, जोश आणि राष्ट्रीय भावनेशी दीर्घकाळ नाते असलेल्या सुखविंदर सिंग यांच्या दमदार आवाजात साकारलेले हे गीत आरएसएसच्या शिस्तीचे, सामूहिक भावनेचे, देशभक्तीचे आणि मातृभूमीप्रेमाचे संगीतमय अभिवादन आहे. संगीतकार सनी इंदर यांचे संगीत आणि गीतकार राकेश कुमार पाल यांचे प्रभावी शब्द यामुळे गीताला जोशपूर्ण ताल आणि ठाम आशय मिळतो, जो एकता आणि दृढ निश्चय अधोरेखित करतो.

 

या प्रसंगी श्री मोहन भागवत म्हणाले, ”डॉ. हेडगेवार यांचे जीवन आरएसएसच्या आत्म्याचे प्रतीक होते. भारत सदैव प्रथम. ‘शतक’ चित्रपट आणि ‘भगवा है अपनी पहचान’ हे गीत त्यांची अखंड देशभक्ती आणि सामर्थ्य दाखवते. आरएसएस बदलत नाही, तो विकसित होत आहे. आपल्या मुळाशी प्रामाणिक राहून. हा चित्रपट न उलगडलेली कथा उलगडतो आणि लोकांना एकत्र आणण्याची व जीवनातील आव्हाने समतोलाने हाताळण्याची डॉ. हेडगेवार यांची क्षमता अधोरेखित करतो. या प्रभावी उपक्रमासाठी संपूर्ण टीमला माझ्या शुभेच्छा.”

‘अगं अगं सूनबाई…’ मधील मनात साठलेल्या भावना शब्दांत सांगणारं ‘डाव मोडू नको’ ‘हे’ भावस्पर्शी गाणं प्रदर्शित

यावेळी सुखविंदर सिंग म्हणाले, ” ‘भगवा है अपनी पहचान’ या माझ्या गीताचे श्री मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण झाले, याचा मला अत्यंत आनंद आहे. त्यांची उपस्थिती आशीर्वादासारखी आहे आणि त्यांची दृष्टी आम्हाला प्रेरणा देते. दिग्दर्शकांची साधेपणात प्रभाव निर्माण करण्याची दृष्टी मला खूप आवडली. इतिहास जपला पाहिजे. हे गीत केवळ व्यावसायिक संधी नाही, तर राष्ट्रीय सेवा आहे. सर्वांच्या मनाला ते भिडावे, यासाठी मी मनापासून गायले आहे. हे गीत हिंदुस्थानाच्या खऱ्या आत्म्याचे दर्शन घडवते.”

‘शतक’ हा चित्रपट राष्ट्र स्वयंसेवक संघाच्या १९२५ मध्ये नागपूर येथे झालेल्या स्थापनेपासून ते आजच्या देशव्यापी स्वयंसेवी चळवळीपर्यंतच्या १०० वर्षांच्या प्रवासाचा मागोवा घेतो. अनिल डी. अग्रवाल यांची संकल्पना, आशिष मल्ल दिग्दर्शित आणि विर कपूर निर्मित, तर आशिष तिवारी सह-निर्माते असलेला हा चित्रपट एडीए ३६० डिग्री एलएलपी प्रस्तुत हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Bhagwan hai aapni pehchaan this powerful song from the film shatak was unveiled by shri mohan bhagwat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Bollywood
  • bollywood Flim
  • entertainment

संबंधित बातम्या

‘अगं अगं सूनबाई…’ मधील मनात साठलेल्या भावना शब्दांत सांगणारं ‘डाव मोडू नको’ ‘हे’ भावस्पर्शी गाणं प्रदर्शित
1

‘अगं अगं सूनबाई…’ मधील मनात साठलेल्या भावना शब्दांत सांगणारं ‘डाव मोडू नको’ ‘हे’ भावस्पर्शी गाणं प्रदर्शित

‘अगं अगं सूनबाई..’ केदार शिंदे यांच्या चित्रपटामधून उलगडणार सासू-सुनेचे नवे भावविश्व
2

‘अगं अगं सूनबाई..’ केदार शिंदे यांच्या चित्रपटामधून उलगडणार सासू-सुनेचे नवे भावविश्व

ChatGPT वरून लिहिला गेला Stranger Things चा शेवटचा सीझन? वेब सीरिजमध्ये चाहत्यांना ‘हे’ काय दिसले?
3

ChatGPT वरून लिहिला गेला Stranger Things चा शेवटचा सीझन? वेब सीरिजमध्ये चाहत्यांना ‘हे’ काय दिसले?

‘The Raja Saab’ पाच दिवसात झाला फ्लॉप? जाणून घ्या प्रभासच्या चित्रपटाचे Box Office Collection
4

‘The Raja Saab’ पाच दिवसात झाला फ्लॉप? जाणून घ्या प्रभासच्या चित्रपटाचे Box Office Collection

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.