(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस १९ ने पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना त्याच्याशी जोडले आहे. सलमान खानने होस्ट केलेला हा रिअॅलिटी शो या वर्षी २४ ऑगस्ट रोजी प्रीमियर झाला. त्याच्या भव्य प्रीमियरच्या एका महिन्याच्या आतच, बिग बॉस १९ वादात सापडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शोच्या निर्मात्यांनी परवानगीशिवाय काही गाणी वापरल्यामुळे त्यांच्यावर २ कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. भारतातील एक प्रख्यात संगीत परवाना संस्थाने ‘बिग बॉस १९’ च्या निर्मात्यांवर आरोप केला आहे की, त्यांनी परवानगी न घेता कॉपीराइट असलेली गाणी शोमध्ये वापरली. ‘चिकनी चमेली’ ‘धत्त तेरी की’ ही दोन्ही गाणी Sony Music India यांच्या मालकीची असून, सार्वजनिक प्रसारणासाठी त्यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक होते. PPL ने १९ सप्टेंबर रोजी Endemol Shine India या शोच्या निर्मिती संस्थेला वकील हितेन अजय वासन यांच्या मार्फत नोटीस पाठवली. या नोटीसमध्ये पुढील गोष्टींची मागणी करण्यात आली आहे, तर २ कोटी रूपयांची नुकसान भरपाई मागण्यात आली आहे.
या प्रकरणावर भाष्य करताना PPL च्या कायदेशीर पथकातील एका सूत्राने सांगितलं की, “दोन्ही गाणी Sony Music Entertainment India या संस्थेच्या मालकीची आहेत. ही संस्था PPL च्या ४५० हून अधिक संगीत लेबल्सपैकी एक आहे, ज्यांचे सार्वजनिक सादरीकरणाचे हक्क फक्त PPL कडून प्रशासित केले जातात.”
एकीकडे ‘बिग बॉस १९’ हा सीझन जोरदार चालू आहे. शोला चांगली TRP मिळते आहे आणि घरातील भांडणं, ड्रामा यामुळे स्पर्धक सोशल मीडियावरही चांगलेच चर्चेत आहेत. मात्र, अशा कॉपीराईट उल्लंघनाच्या आरोपांमुळे निर्मात्यांना आर्थिक आणि कायदेशीर फटका बसण्याची शक्यता आहे.
As per media reports, Bigg Boss 19 has received a legal notice for using unauthorized music songs in the show (Dhat Teri Ki & Chikni Chameli), demanding 2 crore in damages. — BBTak (@BiggBoss_Tak) September 25, 2025
धनंजय पोवारचा प्रणितला पाठिंबा: “११ कोटी मराठी लोक तुझ्या पाठीशी आहेत, प्रणित तू फक्त लढ”
गाण्यांमुळे निर्माण झाली अडचण
बिग बॉस’मध्ये दररोज सकाळची सुरुवात मॉर्निंग गाण्यांनी होते. ही गाणी लागल्यावर सर्व स्पर्धक घरात डान्स, उत्साहात दिवसाची सुरुवात करतात. प्रेक्षकांनाही हा भाग विशेष आवडतो आणि तो एक मनोरंजक सेगमेंट मानला जातो. रोज वेगवेगळी धमाल गाणी लावून निर्माते स्पर्धकांचं आणि प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात.
अभिजीतच्या “प्रेमरंग सनेडो” ने जिंकली प्रेक्षकांची मने! तरुणाईला भावलं मराठमोळं ठसका असलेले गाणे
मात्र आता, हीच निर्मात्यांची सर्जनशीलता त्यांच्यावरच उलटली आहे. कारण, या भागात वापरलेल्या काही गाण्यांचे कॉपीराईट परवाना न घेताच वापर करण्यात आल्याने, एका संगीत परवाना संस्थेने कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यामुळे निर्मात्यांना आता आर्थिक आणि कायदेशीर फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.