(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
हिंदी टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. शोमध्ये नुकताच एक मोठा वाद पाहायला मिळाला, ज्यात गायक-अभिनेता अमाल मलिक आणि मराठी अभिनेता प्रणित मोरे यांच्यात तुफान भांडण झाल्याचं बघायला मिळाले. नुकत्याच प्रसारित झालेल्या भागात प्रणितचा संयम सुटला आणि तो थेट अमाल मलिकला “तू माझ्याबद्दल काय बोललास?” असा जाब विचारायला गेला. या भांडणादरम्यान सुद्धा अमाल मलिकने “तुला मी आता एकच वाजवेन”, “तू माझा बाप लागतोस का”, “किचनमधल्या भांड्यांप्रमाणे मी तुला सुद्धा धुवून टाकेन” असं म्हणत प्रणितशी वाद घालायला सुरुवात केली. या दोघांमध्ये जोरदार टोकाचे भांडण झाल्याचे बघायला मिळाले , शेवटी अन्य स्पर्धकांनी मध्यस्थी केली. बसीर अलीसुद्धा यावेळी प्रणितच्या विरोधात उभा राहिला, ज्यामुळे वाद आणखी चिघळला.
या आठवड्यातही प्रणित मोरे नॉमिनेशनमध्ये आहे. त्यामुळे त्याच्यावर शोमधून बाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन आता अनेक मराठी युट्युबर्स, इन्फ्लुएन्सर्स आणि चाहत्यांनी प्रणितला सपोर्ट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘बिग बॉस मराठी’ या शोचा माजी स्पर्धक धनंजय पोवार याने एक व्हिडीओ शेअर करत प्रणितला खुलेआम पाठिंबा दिला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो, हा व्हिडिओ नीट बघा, हे असं मराठी माणसाबरोबर केलं जातं. सतत तुच्छ लेखलं जातं, सतत कमी लेखलं जातंय. आता जे काही करायचंय, जो काही इतिहास घडवायचा असेल… तो संपूर्ण महाराष्ट्राने एकत्र येऊन घडवला पाहिजे. तुम्ही हिंदी लोक आम्हाला ज्याप्रकारे ट्रोल करताय, चेष्टा-मस्करी करताय…या सगळ्या गोष्टींमुळे आमची मनं दुखावतात. हे लक्षात ठेवा. या प्रणित मोरेला…आमच्या मराठी माणसाला तुम्ही ‘बिग बॉस’च्या घरात ज्याप्रकारे ट्रोल करत आहात…त्याच्याबरोबर जे किडे करताय ते संपूर्ण महाराष्ट्र बघतोय.”
अभिनेता सोनू सूद मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीसमोर हजर, पोलिसांची चौकशी सुरु; काय आहे प्रकरण?
पुढे धनंजय पोवार म्हणाला ,” आजच्या घडीला सर्वाधिक सोशल मीडिया वापरणारा वर्ग हा महाराष्टात आहे. हा मराठी माणूस म्हणजे जोक नाहीयं. प्रणित तू फक्त लढ… आम्ही ११ कोटी नागरिक तुझ्याबरोबर आहोत.तुझा खेळ सुंदर आहे.. असाच खेळत राहा.”