Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BIGG BOSS 19 नंतर गौरव खन्ना बॉलीवूडमध्ये करणार एन्ट्री? सलमान खानने स्वतःच केली मोठी घोषणा

दरवर्षीप्रमाणे, "बिग बॉस" चा १९ वा सीझन अंतिम टप्प्यात आहे. लवकरच या शोचा विजेता निवडला जाणार आहे. गौरव खन्ना याने आधीच अंतिम फेरीचे तिकीट जिंकले असून, त्याच्या हाती मोठा प्रोजेक्ट देखील लागला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 30, 2025 | 03:17 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • “बिग बॉस” १९ नंतर गौरवला मिळणार मोठा प्रोजेक्ट
  • सलमान खान मोठ्या पडद्यावर करणार काम?
  • सलमानने गौरवला दिले वचन?
 

सलमान खानच्या “बिग बॉस १९” शोमध्ये शेवटचा आठवडा सुरु आहे. आता लवकरच या शोला त्याचा विजेता मिळणार आहे. अशनूर कौरला दुसऱ्या-गेल्या आठवड्यातच बाहेर काढण्यात आले होते. आता, शाहबाजलाही डबल एव्हिक्शनने बाहेर काढण्यात येणार आहे. परंतु, “वीकेंड का वार” दरम्यान, सलमान खानने अनेक स्पर्धकांना फटकारले. तो संपूर्ण सीझनमध्ये गौरव खन्नाच्या गेम प्लॅनवर खूश दिसत होता आणि त्याचे कौतुकही करत होता. “बिग बॉस १९” नंतर गौरव खन्ना मोठ्या प्रोजेक्टमध्ये सलमान खानसोबत दिसणार असल्याचे समोर आले आहे, ज्याची घोषणा सलमान खानने स्वतःच केली आहे.

Suraj Chavan Wedding: जान्हवीने लाडक्या भावाला दिले ‘हे’खास गिफ्ट, नजर काढत म्हणाली, ”स्पेशल भेटवस्तू…”

गौरव खन्ना हे टीव्ही इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय नाव आणि चेहरा बनला आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून टीव्हीवर काम करत आहे, पण “अनुपमा” मधील अनुजची त्याची भूमिका उत्तम होती. या अभिनेत्याच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. त्याचप्रमाणे, तो “बिग बॉस १९” च्या घरात आला, पण तो अंतिम फेरीत पोहचेपर्यंत कोणासोबतही कारण नसताना भांडला नाही. ज्यामुळे इतर घरातील सदस्यांनी त्याला खोटे म्हटले. परंतु, सलमान खानने त्याच्या खेळाचे खूप कौतुक केले आहे, म्हणूनच त्याने गौरव खन्नाला एक मोठे वचन देखील दिले आहे.

सलमानने गौरवला कोणते वचन दिले?

अलीकडेच, एकता कपूरने ‘बिग बॉस १९’ मध्ये दोन स्पर्धकांना काम दिले आहे. यामध्ये तान्या मित्तल आणि अमाल मलिक यांचा समावेश आहे. दरम्यान, सलमान खानने गौरव खन्नाच्या खेळाचे आणि कामगिरीचे खूप कौतुक केले आहे. त्याने लवकरच गौरव खन्नासोबत काम करण्याची घोषणाही केली. सलमान खान असे म्हणताना दिसला की, “त्याची पत्नी त्याचा आदर करते, त्याचे मित्र त्याचा अभिमान मानतात आणि त्याच्या पालकांनाही त्याचा अभिमान वाटतो. लोकांना त्याच्यासोबत काम करायला नेहमीच मजा आली आहे. मी लवकरच गौरवसोबत काम करेन. मला त्याच्यासोबत काम करायलाही मजा येईल.” त्यानंतर, गौरव खन्ना थोड्या वेळाने आश्चर्यचकित होतो. त्याने त्याच्या पाठिंब्याबद्दल आणि या घोषणेबद्दल सलमान खानचे आभारही मानले.

“तो साधा दिवस नव्हता, तर…”, श्रीलंकेत पूर आणि विमानतळावर तब्बल २४ तास अडकून राहिला ‘हा’ मराठी अभिनेता

सलमान खानने गौरवचे केले कौतुक

सलमान खानने पुढे, ‘गौरव खन्ना शांत आहे, ही चांगली गोष्ट आहे’, असेही त्याने म्हटले. त्याने फरहाना भट्टने घरात केलेल्या वाईट घटनेची आठवण करून दिली आणि म्हटले की जेव्हा टीव्ही सुपरस्टारवर टीका करण्यात अली तेव्हा गौरव खन्ना त्या दिवशी खूप संतापला होता. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. पण त्याने स्वतःला ज्या पद्धतीने हाताळले ते कौतुकास्पद आहे. अशा परिस्थितीत संयम राखणे अशक्य आहे… भाऊला माझा सलाम आहे.’ असे सलमान म्हणाला. आता गौरव ‘बिग बॉस’नंतर सलमान खान सोबत काय मोठे काम करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Bigg boss 19 salman khan promise to work with gaurav khanna during weekend ke vaar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • bigg boss 19
  • Gaurav Khanna
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी
1

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

Bigg Boss 20: सलमान खानचा ‘बिग बॉस २०’ OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार? तारीख आणि वेळ जाणून घ्या
2

Bigg Boss 20: सलमान खानचा ‘बिग बॉस २०’ OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार? तारीख आणि वेळ जाणून घ्या

Salman Khan: ‘सलमानने मला शिवी दिली अन्…’,दिग्दर्शकाने सांगितला पार्टीतील धक्कादायक किस्सा, सलीम खान यांनी असा सोडवला वाद
3

Salman Khan: ‘सलमानने मला शिवी दिली अन्…’,दिग्दर्शकाने सांगितला पार्टीतील धक्कादायक किस्सा, सलीम खान यांनी असा सोडवला वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.