(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने संदीप रेड्डी वांगा यांचा ‘स्पिरिट’ चित्रपट सोडला तेव्हा चित्रपटसृष्टीत कलाकारांसाठी ८ तासांच्या शिफ्टची चर्चा सुरू झाली. असे म्हटले जात आहे की तिने काही अटी घातल्या होत्या ज्या पूर्ण झाल्या नाहीत.गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमध्ये ८ तासांच्या शिफ्टवरून जोरदार चर्चा सुरू आहे. तेव्हापासून अनेक कलाकारांनी या विषयावर आपले मत मांडले आहे.. आता मोहित सुरीनेही या प्रकरणी आपले मत मांडले आहे. मात्र, त्याची प्रतिक्रिया संमिश्र आहे.
मोहित सुरी म्हणतात की चित्रपटसृष्टीत वेळापत्रक नियमितपणे पाळणे सोपे नसते. त्यांच्या मते, अभिनय हे ९ ते ५ ची नोकरी नसून, तो एक सर्जनशील व्यवसाय आहे, ज्यामध्ये परिस्थितीनुसार कधीकधी जास्त तास काम करावे लागते.एक उदाहरण देताना ते म्हणाले की, ‘आवारपन’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान इम्रान हाश्मीने सलग २४ तास काम केले होते, कारण चित्रीकरणाचे ठिकाण फक्त एका दिवसासाठी उपलब्ध होते.
विशेष म्हणजे, मोहित सुरी ८ तासांच्या शिफ्टच्या पूर्णपणे विरोधात नाहीत. ते म्हणतात की, तयारी, प्रवास आणि तांत्रिक कामाचाही त्यात समावेश असल्याने १२ तासांचे चित्रीकरण प्रत्यक्षात १४-१५ तासांपर्यंत लांबू शकते.त्यामुळे, ८ तासांची शिफ्ट ही केवळ कलाकारांची मागणी नसून, लाईटमन, स्पॉट बॉय आणि ड्रायव्हर यांच्यासह संपूर्ण टीमसाठीही ती आवश्यक असू शकते.
The 50 Winner: ‘द ५०’ चा विजेता कोण ठरणार? महाअंतिम सोहळा आज; कधी आणि कुठे पाहायचा जाणून घ्या
दीपिकाच्या अटी काय होत्या?
रिपोर्ट्सनुसार, दीपिकाने ‘स्पिरिट’समोर काही अटी ठेवल्या होत्या जसे की दिवसाला फक्त ८ तास काम करणे, चित्रपटाच्या नफ्यात वाटा मिळणे आणि स्वतः तेलुगू संवाद न बोलणे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी या अटी मान्य केल्या नाहीत, त्यानंतर दीपिकाने स्वतःला चित्रपटापासून दूर केले. नंतर, तिच्या जागी प्रभासच्या अपोजिट मुख्य भूमिकेत तृप्ती डिमरीला साइन करण्यात आले.
दीपिका पादुकोण लवकरच दोन मोठ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.ती शाहरुख खानसोबत ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. दीपिका एटलीच्या चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहे.






