Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Border 2 ठरला 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट; तरीही ‘या’ 5 चित्रपटांना टक्कर देणे कठीण

सनी देओलचा "बॉर्डर २" हा चित्रपट थिएटरमध्ये चांगलीच कमाई करताना दिसत आहे. कमाईच्या बाबतीत, हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. परंतु, तो अजूनही बॉलीवूडच्या पाच चित्रपटांपेक्षा मागे आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 10, 2026 | 12:21 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • Border 2 ठरला 2026 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
  • तरीही ‘या’ 5 चित्रपटांच्या मागे आहे Border 2
  • Border 2 एकूण कमाई किती?
 

सनी देओलचा “बॉर्डर २” चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन १८ दिवस झाले आहेत. चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन अजूनही चांगले चालले आहे. चाहते चित्रपटाला खूप प्रेम देत आहेत आणि सोशल मीडियावर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. “बॉर्डर २” हा २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. परंतु, तो अजूनही इतर पाच चित्रपटांच्या कलेक्शनला मागे टाकू शकलेला नाही. “बॉर्डर २” अजूनही या पाच चित्रपटांपेक्षा मागे आहे. आता हे चित्रपट नक्की कोणते आहेत हे आपण जाणून घेऊयात.

‘मी माझ्या मुलांसाठी राजकारण सोडलं…’ वैयक्तिक आरोपांवर गोविंदाचा संताप; सगळे आरोप फेटाळून सुनावले खडेबोल

“बॉर्डर २” चे बॉक्स ऑफिस कलेक्शन

“सॅकनिल्कच्या अहवालानुसार, बॉर्डर २ च्या कमाईत घट झालेली दिसून येत आहे. १८ व्या दिवशी, सनी देओलच्या चित्रपटाने १.८५ कोटी कमावले. चित्रपटाने आता भारतात ३११.६० कोटींची कमाई केली आहे. अशातच आता चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाने आतापर्यंत जगभरात ४२६.१५ कोटी कमावले आहेत. येत्या आठवड्याच्या शेवटीही चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची अपेक्षा आहे. तसेच हा चित्रपट आता पुढे किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

“बॉर्डर २” अजूनही या चित्रपटांपेक्षा मागे

सनी देओलचा “बॉर्डर २” हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे, परंतु गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या पाच चित्रपटांपेक्षा तो अजूनही मागे आहे: “धुरंधर”, “छावा”, “सैयारा”, “कांतारा: चॅप्टर १” आणि “कुली” यांसारख्या चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे. “धुरंधर” चे जगभरातील कलेक्शन ₹१३०४.५ कोटी, “सैयारा”चे ₹५७०.३३ कोटी, “छावा”चे ₹८०७.९१ कोटी, “कांतारा: चॅप्टर १”चे ₹८५२.३६ कोटी आणि “कुली” ₹५१८ कोटी आहे. या सगळ्या चित्रपटांच्या कमाईत जूनही “बॉर्डर २” मागे आहे.

Jana Nayagan बद्दल मद्रास उच्च न्यायालयाचा नवा आदेश; विजयच्या चित्रपटाला मिळणार प्रदर्शनाची नवी तारीख

चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट

‘बॉर्डर २’ च्या कथेसोबतच चित्रपटातील स्टारकास्टचेही कौतुक होताना दिसत आहे. सनी देओलसोबत वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या भूमिका देखील पाहायला मिळाल्या आहेत. मोना सिंग, मेधा राणा, सोनम बाजवा आणि अन्या सिंग हे देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या सर्व स्टार्सनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे आणि त्यांची मने जिंकली आहेत.

Web Title: Border 2 becomes highest grossing film 2026 still behind these 5 movies dhurandhar chhaava saiyaara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • Bollywood
  • Border 2
  • entertainment

संबंधित बातम्या

कलेक्टिव स्टुडिओज–मॅड मॅन फिल्म्सची नवी भागीदारी; निखिल भट्ट आणि साकेत चौधरी घेऊन येणार दोन चित्रपट
1

कलेक्टिव स्टुडिओज–मॅड मॅन फिल्म्सची नवी भागीदारी; निखिल भट्ट आणि साकेत चौधरी घेऊन येणार दोन चित्रपट

“दान नाही तर आदर आहे…” राजपाल यादव यांच्या मदतीसाठी धावून आला सोनू सूद; कोटींचं कर्ज फेडण्यास करणार मदत
2

“दान नाही तर आदर आहे…” राजपाल यादव यांच्या मदतीसाठी धावून आला सोनू सूद; कोटींचं कर्ज फेडण्यास करणार मदत

Jana Nayagan बद्दल मद्रास उच्च न्यायालयाचा नवा आदेश; विजयच्या चित्रपटाला मिळणार प्रदर्शनाची नवी तारीख
3

Jana Nayagan बद्दल मद्रास उच्च न्यायालयाचा नवा आदेश; विजयच्या चित्रपटाला मिळणार प्रदर्शनाची नवी तारीख

‘मी माझ्या मुलांसाठी राजकारण सोडलं…’ वैयक्तिक आरोपांवर गोविंदाचा संताप; सगळे आरोप फेटाळून सुनावले खडेबोल
4

‘मी माझ्या मुलांसाठी राजकारण सोडलं…’ वैयक्तिक आरोपांवर गोविंदाचा संताप; सगळे आरोप फेटाळून सुनावले खडेबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.