(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
“बॉर्डर २” या ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
जे.पी. दत्ता यांच्या १९९७ मध्ये आलेल्या “बॉर्डर” या चित्रपटाचा सिक्वेल असलेला “बॉर्डर २” ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. बऱ्याच प्रतीक्षेनंतर, हा चित्रपट अखेर २० मार्च २०२६ रोजी नेटफ्लिक्स या लोकप्रिय स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर येत आहे. प्रेक्षक आता त्यांच्या कुटुंबियांसोबत घरी बसून हा युद्ध चित्रपट ऑनलाइन पाहण्याचा आनंद घेऊ शकतात. परंतु, चित्रपट निर्मात्यांकडून अधिकृत पुष्टीकरण अद्याप अपेक्षित आहे.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर आधारित, हा चित्रपट भारतीय सशस्त्र दलांच्या – लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या संयुक्त कारवायांचे चित्रण करतो. सनी देओल व्यतिरिक्त, ‘बॉर्डर २’ मध्ये दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी आणि वरुण धवन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. यात मोना सिंग, सोनम बाजवा, अन्या सिंग आणि मेधा राणा यासारख्या अनेक महिला कलाकारांचाही समावेश आहे. वरुण धवनच्या अभिनयाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटात वरुण धवनने मेजर होशियार सिंग दहियाची भूमिका साकारली आहेत. तसेच सगळ्यांचे उत्तम काम पाहून त्यांना प्रशंसा मिळाली आहे.
Zakir Khan रुग्णालयात दाखल; कॉमेडियनला नक्की झालं तरी काय? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची चिंता
“बॉर्डर २” ची एकूण कमाई
“बॉर्डर” चा पहिला भाग जेपी दत्ता यांनी दिग्दर्शित केला होता. परंतु, यावेळी अनुराग सिंग यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आणि जेपी दत्ता, त्यांची मुलगी निधी दत्ता आणि भूषण कुमार यांनी “बॉर्डर २” ची निर्मिती केली. SACNILC नुसार, चित्रपटाने जगभरात ₹४४९.६५ कोटींची कमाई केली. पहिला भाग बॉक्स ऑफिसवरही यशस्वी झाला आणि ब्लॉकबस्टरचा टॅग मिळवला.






