
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आदित्य धरच्या दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाने कमाईचे नवीन विक्रम रचले असून, हा ट्रेंड अजूनही सुरू आहे. या चित्रपटाने अमेरिकेतील बॉक्स ऑफिस कामगिरीमध्ये ‘बाहुबली २’ ला मागे टाकले आहे. ‘बाहुबली’ फ्रँचायझीमध्ये भल्लालदेवाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता राणा डग्गुबाटीने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
‘धुरंधर २’ या चित्रपटाने ‘बाहुबली २’ ला मागे टाकत, अमेरिकेच्या बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनण्याचा मान मिळवला आहे. या चित्रपटाने अमेरिकेत २४.३९ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली असून, एकूण कमाई २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. या चित्रपटाने नऊ वर्षांपूर्वी ‘बाहुबली २’ ने २०.८० दशलक्ष डॉलर्सची कमाई करून प्रस्थापित केलेला विक्रम मोडला आहे. ‘धुरंधर २’ ला मागे टाकण्याच्या चित्रपटाच्या या यशाचे राणा डग्गुबाटीने स्वागत केले आहे.
“हे खूप छान आहे. एक दशकानंतरही ते तितकंच छान आहे. मला वाटतं की ही तर फक्त सुरुवात आहे,” असे राणा डग्गुबाटीने ‘व्हेरिटी इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. “तुमच्याकडे ‘बाहुबली’सारखे चित्रपट असतील, ‘धुरंधर’सारखे चित्रपट असतील. हे सर्व चित्रपट येतील, पण जो चित्रपट मनाला भिडतो, तो दूरदूरच्या लोकांशी जोडला जातो,” असेही तो अभिनेता पुढे म्हणाला.
स्थानिक चित्रपट आणि कथांबद्दल बोलताना राणा डग्गुबाटी म्हणाला, “मला वाटते की कोरियन चित्रपटसृष्टीने या बाबतीत मोठे यश मिळवले आहे. त्यांनी त्यांच्या संस्कृतीतील अत्यंत स्थानिक गोष्ट घेतली आणि ती जगासमोर सादर केली. अमेरिकेनेही आपल्या सुरुवातीच्या काळात हे सुंदरपणे केले होते. म्हणूनच आपल्याला भारतीय इतिहासापेक्षा अमेरिकन इतिहासाबद्दल जास्त माहिती आहे आणि याचे संपूर्ण श्रेय त्यांनी बनवलेल्या चित्रपटांना जाते.”
“धुरंधर २” कलेक्शन
स्पाय ॲक्शन थ्रिलर “धुरंधर”ने बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. SacNilk वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाने जगभरात ₹५२३.५८ कोटी कमावले आहेत. तसेच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ९५९.३७ कोटींची कमाई केली आहे.