Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhaava: ‘छावा’ने तिसऱ्या रविवारी देखील केला धमाका; या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून रचला इतिहास!

विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना अभिनीत 'छावा' हा पीरियड ड्रामा चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने तिसऱ्या रविवारी देखील १० चित्रपटांच्या रेकॉर्ड मोडला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 03, 2025 | 11:08 AM
(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

विकी कौशल आणि रश्मिका मंदान्ना यांच्या ‘छावा’ चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन सतत वाढत आहे. ‘छावा’ने पहिल्या दिवशी ३१ कोटी रुपयांची कमाई करून खळबळ उडवली. १५ व्या दिवशी चित्रपटाने ४०० कोटींचा टप्पा सहज पार केला. आता तिसऱ्या रविवारी, ‘छावा’ चित्रपटाने शाहरुख खानच्या ‘जवान’ आणि ‘पठाण’ या चित्रपटासह १० चित्रपटांचा विक्रम मोडला आहे. आणि आपले अव्वल स्थान निर्माण केले आहे.

१७ व्या दिवसाचे कलेक्शन
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटाचा आज तिसरा रविवार होता. सॅकनिल्कच्या मते, छावा चित्रपटाने आज १७ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २३.०५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आणि अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून छावाने इतिहास बनवला आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

स्टारकिड असूनही कॉफी शॉपमध्ये काम करायची ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री, आज गाजवतेय बॉलिवूड इंडस्ट्री

चित्रपटाचा आतापर्यंतचा एकूण संग्रह
या चित्रपटाने पहिल्या दिवशी ३१ कोटी रुपये कमावले. आणि यानंतर चित्रपटाने पहिल्या आठवड्यात २१९.२५ कोटी रुपये आणि दुसऱ्या आठवड्यात १८०.२५ कोटी रुपयांची दमदार कमाई केली. चित्रपटाने तिसऱ्या शुक्रवारी १३ कोटी आणि तिसऱ्या शनिवारी २२ कोटी रुपयांची कमाई केली. काल, तिसऱ्या रविवारी, ‘छावा’ने २३.०५ कोटी रुपये कमावले आहेत. आतापर्यंत विकी कौशलच्या ‘छावा’ चित्रपटाने एकूण ४५७.५५ कोटी रुपये कमावले आहेत. छावाच्या सातत्यपूर्ण कमाईवरून, तो दिवस दूर नाही जेव्हा हा चित्रपट ५०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल.

‘छावा’ने तिसऱ्या रविवारी या १० चित्रपटांना मागे टाकले
याशिवाय, ज्या चित्रपटांनी तिसऱ्या रविवारी सर्वाधिक कमाईचा विक्रम केला आहे. ‘छावा’ चित्रपटाने त्या सर्व चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. यापूर्वी, स्त्री २ ने तिसऱ्या रविवारी २२ कोटी रुपये कमावले होते. ‘बाहुबली २’ ने १७.७५ कोटी रुपये कमावले होते. सनी देओलच्या ‘गदर २’ चित्रपटाने १६.१ कोटी रुपये कमावले होते. तर शाहरुख खानच्या ‘जवान’ने तिसऱ्या रविवारी १३.९ कोटी रुपये कमावले होते. आमिर खानच्या दंगलने १३.६८ कोटी रुपये आणि रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाने १३.५ कोटी रुपये कमावले होते. तर दीपिका पदुकोण आणि शाहरुख खान यांच्या ‘पठाण’ चित्रपटाने १२.६ कोटी रुपये कमावले होते. ‘तान्हाजी’ चित्रपटाने १२.५ कोटी रुपये आणि आमिर खानच्या पीकेने ११.५ कोटी रुपये कमावले होते. या सर्व चित्रपटांपैकी, ‘छावा’ चित्रपटाने आतापर्यंतच्या तिसऱ्या रविवारी सर्वाधिक कलेक्शन केले आहे.

Pratik Gandhi Look: ‘याला म्हणत्यात Royal कारभार…’; पाहा प्रतीक गांधीचा शेरवानी लूक

‘छावा’ मध्ये या कलाकारांनी साकारली आहे ही खास भूमिका
छावा या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारत आहे, जे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते. तर अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. रश्मिका मंदान्ना महाराणी येसूबाईची भूमिका साकारत आहे. या चित्रपटात आशुतोष राणा यांनी हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारली आहे, दिव्या दत्ता यांनी राजमातेची भूमिका साकारली आहे आणि विनीत कुमार सिंह यांनी कवी कलशची भूमिका साकारली आहे.

Web Title: Chhaava box office collection day 17 vicky kaushal rashmika mandanna akshaye khanna laxman utekar film earning

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 03, 2025 | 11:08 AM

Topics:  

  • Chhaava
  • entertainment
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

…म्हणून निर्मिती सावंत यांनी ‘सुपर डुपर’साठी घेतली मकरंद अनासपुरे यांची खास मदत
1

…म्हणून निर्मिती सावंत यांनी ‘सुपर डुपर’साठी घेतली मकरंद अनासपुरे यांची खास मदत

Peddi : राम चरण आणि जान्हवी कपूरच्या चित्रपटाची बदलली रिलीज डेट; 30 एप्रिल नाही तर, ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट
2

Peddi : राम चरण आणि जान्हवी कपूरच्या चित्रपटाची बदलली रिलीज डेट; 30 एप्रिल नाही तर, ‘या’ तारखेला प्रदर्शित होणार चित्रपट

सलमान खानने केली साऊथ दिग्दर्शकाशी हातमिळवणी; नव्या अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपटाची घोषणा, पुढील महिन्यात शूटिंग सुरू
3

सलमान खानने केली साऊथ दिग्दर्शकाशी हातमिळवणी; नव्या अ‍ॅक्शन-ड्रामा चित्रपटाची घोषणा, पुढील महिन्यात शूटिंग सुरू

‘‘धुरंधर 2’ पाहणारे मूर्ख आहेत?’ दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा पलटवार; प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना दिले जोरदार प्रत्युत्तर
4

‘‘धुरंधर 2’ पाहणारे मूर्ख आहेत?’ दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा पलटवार; प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना दिले जोरदार प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.