Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दबंग’ स्टाइल एन्ट्रीने सलमान खानने पुन्हा वेधलं लक्ष, नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात; चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

'मातृभूमी' नंतर सलमान खानने त्याच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत नयनतारा मुख्य भूमिकेत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 24, 2026 | 01:50 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अभिनेता सलमान खान सध्या त्याच्या ‘मातृभूमी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, त्याने दुसऱ्या एका प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. वामशी पैडीपल्ली दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात झाली आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत नयनतारा मुख्य भूमिकेत आहे. आज, शुक्रवारी, सलमान खानने चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. सुपरस्टारने अधिकृतपणे ईद २०२७ साठी आपल्या पुढील चित्रपटाची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून गेल्या दशकभरापासून हिंदी चित्रपटसृष्टीला आकार देणारी परंपरा पुन्हा एकदा ताजी झाली आहे.

या नव्या चित्रपटाचे सध्या ‘एसव्हीसी ६३’ असे नाव ठेवण्यात आले असून त्याचे दिग्दर्शन वंशी पैदीपल्ली करत आहेत. या चित्रपटात नयनतारा दिसणार असून निर्मिती दिल राजू करत आहेत. समाजमाध्यमांवर माहिती देताना सलमानने लिहिले, “थोडं पुढचं विचारायला हवं, म्हणून ईदची घोषणा केली… काळजी करू नका, या चित्रपटाबद्दलही योग्य वेळी सांगू… थोडा संयम ठेवा… माझ्यासारखंच तुम्हालाही वाट पाहावी लागेल… तुमची जी अवस्था आहे तीच माझीही आहे…

सलमान खानचा चित्रपट म्हणजे फक्त एक सिनेमा नसतो, तर तो एक उत्सव असतो. आणि तोही ईदच्या निमित्ताने असेल, तर तो संपूर्ण देशासाठी आनंदाचा सोहळा ठरतो. अनेक वर्षांपासून सलमानने ईद हा सण जणू आपल्या नावावरच केला आहे. ॲक्शन, भावना, संगीत आणि जबरदस्त लोकाभिमुखता यांचा संगम असलेले त्यांचे चित्रपट प्रेक्षकांना नेहमीच भावले आहेत. ‘वॉन्टेड’, ‘दबंग’, ‘बॉडीगार्ड’, ‘एक था टायगर’, ‘किक’, ‘बजरंगी भाईजान’, ‘सुलतान’ आणि ‘भारत’ अशा चित्रपटांनी ईदच्या काळात मोठे यश मिळवले आहे.

सलमान खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिला अभिनेते ठरला, ज्याच्या सलग १७ चित्रपटांनी शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आणि बॉक्स ऑफिसचे मापदंडच बदलून टाकले. त्याच्या नावावर दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करणारे अनेक चित्रपट आहेत, तसेच ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुलतान’ सारख्या चित्रपटांनी तीनशे कोटींचाही टप्पा पार केला आहे.

 

सलमान खानची चाहतावर्ग इतक मोठी का आहे, याचे कारण म्हणजे चाहत्यांचे त्याच्यावरील निःस्वार्थ प्रेम आणि निष्ठा. मोठ्या शहरांपासून ते गाव-कस्ब्यांपर्यंत, प्रत्येक वयोगटातील लोक त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहतात आणि प्रत्येक प्रदर्शित होणारा चित्रपट एक सामूहिक उत्सव बनतो. आता ईद २०२७ निश्चित झाल्यामुळे सलमान खानच्या आणखी एका भव्य चित्रपटाचा उलटगणना अधिकृतपणे सुरू झाली आहे

Web Title: Dabangg style entry salman khan grabs attention again as filming of his new movie begins fans excited

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट
1

Rajpal Yadav Cheque Bounce Case: जेलमध्ये जाण्यापासून राजपाल यादवांना तात्पुरता दिलासा; सुप्रीम कोर्टाने घातली ‘ही’ अट

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री
2

Deepika Ranveer Photoshoot:लेक दुआच्या वाढदिवसानिमित्त दीपिका-रणवीरने केलं खास फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली अभिनेत्री

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली
3

Mukta Barve on Mumbai Pune Mumbai 4: ‘मुंबई पुणे मुंबई’चा चौथा भाग कधी येणार? मुक्ता बर्वेच्या उत्तराने चाहत्यांची उत्सुकता वाढली

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत
4

Afara Tafari Marathi Movie: एक कोटींच्या पॉलिसीने तीन भावांची उडवली झोप; ‘अफरातफरी’चा धमाल टीझर चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.