Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रणवीर सिंगचा ‘Dhurandhar 2’ ठरला बॉक्स ऑफिसवर सुपरहिट; 17 व्या दिवशीही चित्रपटाची जबरदस्त कमाई

'धुरंधर २' हा चित्रपट आयबी प्रमुख अजय सन्याल यांनी पाकिस्तानी दहशतवादी झहूर मिस्त्रीला दिलेल्या आव्हानाची आणि भारतीय विमानाच्या अपहरणादरम्यान घेतलेल्या त्याच्या सूडाची कथा मांडणारा आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Apr 03, 2026 | 08:40 AM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘Dhurandhar 2’ ठरला बॉक्स ऑफिस हिट
  • 17 व्या दिवशीही चित्रपटाची जबरदस्त कमाई
  • ‘Dhurandhar 2’ एकूण कलेक्शन
 

आदित्य धर यांच्या कथानकावर आधारित ‘धुरंधर 2’ हा चित्रपट आयबी प्रमुख अजय सान्याल (अजीत डोभाल) यांच्या पाकिस्तानविरुद्धच्या सूडगाथेवर आधारित आहे. दहशतवादी जहूर मिस्त्रीने भारतीय विमान अपहरणाच्या वेळी भारताला दिलेल्या आव्हानानंतर उभ्या राहिलेल्या या कथेत अजय सान्याल एक ‘धुरंधर’ तयार करतात, ज्याला भारतात घडवून पाकिस्तानमध्ये वापरण्याची योजना आखली जाते.

रणवीर सिंगने या चित्रपटात त्या ‘धुरंधर’च्या भूमिकेत दिसतो. त्याच्या व्यक्तिरेखेला नवी ओळख दिली जाते. ज्यात सूड, राग आणि शत्रूंना संपवण्याची तीव्र भावना आहे. १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता १५ दिवस पूर्ण झाले आहेत. चित्रपटात जसकीरत सिंह रांगी उर्फ रणवीर सिंहचा हमजाचा हा प्रवास दाखवण्यात आला आहे. अजय सान्याल त्याला ‘हमजा अली मझारी’ हे नाव देऊन पाकिस्तानमध्ये पाठवतात, जेणेकरून तो भारताच्या शत्रूंना संपवू शकेल. ही कथा ९० च्या दशकातील पाकिस्तानमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी विचारसरणीवर आणि एका गुप्त डबल एजंटच्या आयुष्यावर आधारित आहे.

काळू डॉनचा आनंद गगनात मावेना! ‘तन्वीने दिलेला शब्द अगदी बिग बॉसच्या घरात बसूनच पाळला!’ प्रभूच्या घरी पोहचलं Special Gift

चित्रपटाच्या सुरुवातीला ही कथा काल्पनिक असल्याचे सांगितले असले तरी तिचा आधार भारतातील अनेक वास्तविक घटनांवर आहे. जसे की कंदहार विमान अपहरण, २००१ भारतीय संसद हल्ला आणि २००८ मुंबई हल्ले. शेवटी या कथेला भारतातील नोटबंदीच्या निर्णयाशीही जोडण्यात आले आहे.

रणवीर सिंग अभिनीत ‘धुरंधर 2’ हा चित्रपट स्पाय जॉनरमध्ये एक मैलाचा दगड ठरत असून, त्याच्या दमदार ॲक्शन आणि गंभीर कथानकामुळे तो चर्चेत आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, या चित्रपटाने १५ व्या दिवशी भारतात सुमारे ₹१७.८० कोटींची कमाई केली आहे. ही कमाई एकूण १७,०३० शोमधून झाली आहे. आतापर्यंत चित्रपटाचा भारतातील ग्रॉस कलेक्शन सुमारे ₹१,१२२.१७ कोटींवर पोहोचला आहे, तर एकूण इंडिया नेट कलेक्शन अंदाजे ₹९३७.३२ कोटी इतके झाले आहे.

Hollywood बनवणार होता हनुमानावर चित्रपट! Shahrukh ला Film केली गेली होती ऑफर, दिला नकार; म्हणाला “माझं…”

१५ व्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत पाहिले तर ‘धुरंधर 2’पेक्षा पहिल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने अधिक कमाई केली होती. ‘धुरंधर’ने १५ व्या दिवशी सुमारे ₹२२.५० कोटींची कमाई केली होती. तर देशातील टॉप चित्रपटांमध्ये गणल्या जाणाऱ्या Pushpa 2: The Rule ने १५ व्या दिवशी ₹१४ कोटींची कमाई केली होती, तर Baahubali 2: The Conclusion ने ₹१०.०५ कोटींचा गल्ला जमवला होता.

Web Title: Dhurandhar 2 box office collection day 15 worldwide starring ranveer singh directed by aditya dhar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ranveer Singh

संबंधित बातम्या

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार
1

Kantara Chapter 1: ‘कंतारा: ए लीजेंड चॅप्टर 1’च्या यशाला एक वर्ष पूर्ण; होम्बले फिल्म्सने मानले जगभरातील प्रेक्षकांचे आभार

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष
2

Jai Jai Swami Samarth: ‘जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा’; नवरात्रीत रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग
3

Nimrat Kaur: ‘७ दिवस तडफडले’, काश्मीर दहशतवादी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू; निमरत कौरने सांगितला काळजाचा ठाव घेणारा प्रसंग

Dharau Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज
4

Dharau Marathi Movie: गोमातेच्या भावनिक नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘धाराऊ’चं मोशन पोस्टर रिलीज , ‘या’ दिवशी होणार रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.