
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड दिग्दर्शक आदित्य धर यांच्या “धुरंधर” या चित्रपटाने रिलीज होताच खळबळ उडवून दिली आहे. या मोठ्या बजेटच्या चित्रपटाने दोन दिवसांत ५० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद देखील मिळत आहे. जर चित्रपटाची कमाई अशीच राहिली तर तो लवकरच १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची अपेक्षा आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे, तसेच दोन दिवसात चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये वाढत चालली आहे.
‘अटल करंडक’ तीन दिवसांची नाट्य स्पर्धा! विजेत्यांना मिळणार १ लाखांची रोख रक्कम
“धुरंधर” चे बॉक्स ऑफिस कलेक्शन
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ३१ कोटी रुपये कमावले आहे. चित्रपटाच्या दुसऱ्या दिवसाच्या कमाईचे अधिकृत आकडे अद्याप समोर आलेले नाही. परंतु, जर चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ३१ कोटी रुपये कमावले तर त्याचे एकूण कलेक्शन ५८ कोटी रुपयांपर्यंत पोहचेल हे नक्की. तसेच चित्रपट पुढे किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
संजय दत्तचा सर्वाधिक कमाई करणारा ६ वा चित्रपट
धुरंधरने पहिल्या दिवशी २७ कोटी रुपये कमावले. यामुळे तो संजय दत्तच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा ६ वा चित्रपट बनला आहे. धुरंधरने संजय दत्तच्या बागी ४ (५३.३८ कोटी), डबल धमाल (४४.१ कोटी), ऑल द बेस्ट (४१.४१ कोटी) आणि शमशेरा (३९.९४ कोटी) या चित्रपटांना मागे टाकले आहे. यासह धुरंधरने रणवीर सिंगच्या सर्कसच्या आयुष्यभराच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्कसने ३५.८० कोटींची कमाई केली. धुरंधरने सर्कसला कमाईमध्ये मागे टाकले आहे.
धुरंधर चित्रपटाबद्दल
धुरंधर चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट पाकिस्तानमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर आधारित आहे, जिथे रणवीर सिंग एका भारतीय गुप्तहेराची भूमिका साकारताना दिसला आहे. सत्य घटनांवर आधारित, हा चित्रपट आदित्य धर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन आणि सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत. राकेश बेदी देखील चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसले आहेत. आयशा खान आणि क्रिस्टल डिसूझा यांनीही एका आयटम सॉंगमध्ये काम केले आहे.
या चित्रपटाने बरीच चर्चा निर्माण केली आहे आणि त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आदित्य धर हे उरी: द सर्जिकल स्ट्राइक सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जातात, ज्यामध्ये विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाने विक्रमी कमाई केली. त्यांनी आदित्य धरची पत्नी आणि अभिनेत्री यामी गौतम यांनी अभिनय केलेला ‘आर्टिकल ३७०’ देखील बनवला होता. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.