फोटो सौजन्य - Social Media
पनवेलमध्ये नाट्य स्पर्धा भरवण्यात आली आहे. यामुळे स्थानिक कलाकारांना आपली कला लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी एक स्थान मिळाले आहे. मुळात, या स्पर्ध्येचि महाअंतिम फेरी सुरु झाली आहे. ‘अटल करंडक’ ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगू–काना ठाकूर महाविद्यालय यांचे संयुक्त आयोजन आहे. हे या स्पर्ध्येचे १२ वे पर्व आहे, या पर्वात नाट्यरसिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळत आहे.
भव्य उदघाटन सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. यावेळी मराठी नाट्यसृष्टीतील अनेक कलावंत उपस्थित असणार आहेत. यामध्ये डॉ. गिरीश ओक, प्रतिमा कुलकर्णी, सुनील तावडे यांची उपस्थिती असून यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ होईल. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे कार्यक्रमाचे आयोजन असून सोहळ्याला युवा ते ज्येष्ठ नाट्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी एकूण १०० हुन अधिक एकांकिका पाठवण्यात आल्या आहेत पण त्यापैकी फक्त २५ उत्कृष्ट एकांकिकेची निवड करण्यात येईल. तीन दिवसांमध्ये २५ उत्कृष्ट एकांकिका रंगमंचावर सादर करण्यात येतील. वि.प्र, स्वातंत्र्य सौभाग्य, कारण काय, बकेट लिस्ट, द गर्दभ, सोयरीक, प्रतीक्षायान, हाफ वे, आख्यान-ए-झुरळ, सांग रहियो या एकांकिका पहिल्या दिवशी सादर करण्यात येतील तर उर्वरित १५ एकांकिका शनिवारी आणि रविवारी सादर करण्यात येतील.
७ डिसेंबर रोजी कलाकारांचे सम्मान करण्यात येईल. उत्कुष्ट एकांकिका एकंदरीत विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येईल. ०१ लाख रुपयांची रोख रक्कम विजेत्याला मिळेल. तर ज्येष्ठ रंगकर्मी नीना कुलकर्णी आणि अभिनेते व निर्माता सुनिल बर्वे यांचा गौरव पुरुस्कराने सम्मान करण्यात येईल. या कार्यक्रमाच्या वेळी परेश ठाकूर, निर्दोष पाटील, जयंत पगडे, अनिल भगत, राजू सोनवणे, रुचिता लोंढे, दर्शना भोईर, प्रीती जॉग, संजय भगत, मयुरेश नेतकार, रिंकू बहिरा यांसह अनेक मान्यवर उपस्थित असतील तर इतर क्षेत्र तसेच नाट्यक्षेत्रातील विविध कलाकार, दिग्दर्शक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित असतील.






