Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Drishyam 3’ च्या रिलीज डेटमध्ये बदल? यशच्या ‘टॉक्सिक’नंतर आता मोहनलालच्या चित्रपटांचीही करावी लागणार प्रतीक्षा

यशच्या 'टॉक्सिक'नंतर, मोहनलालचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'दृश्यम ३' सुद्धा पुढे ढकलला जाऊ शकतो. एका वृत्तानुसार, दिग्दर्शक जीतू जोसेफ आणि त्यांची टीम ३ एप्रिल २०२६ ही प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा विचार करत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 23, 2026 | 03:00 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘Drishyam 3’ च्या रिलीज डेटमध्ये बदल?
  • यशच्या ‘टॉक्सिक’नंतर आता मोहनलालचा चित्रपट लांबणीवर
  • “दृश्यम ३” मध्ये झळकणार हे कलाकार
सध्या चित्रपटगृहांमध्ये ‘धुरंधर: द रिव्हेंज’चा जबरदस्त गाजावाजा सुरू असून, 19 मार्च रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने 4 दिवसांच्या एक्सटेंडेड वीकेंडसह प्रीमियर शोज मिळून देशांतर्गत तब्बल ₹454.12 कोटींचे नेट कलेक्शन केले आहे.

याआधी यशच्या ‘टॉक्सिक’ची टक्कर ‘धुरंधर 2’सोबत होणार होती, मात्र मेकर्सनी शेवटच्या क्षणी हा चित्रपट 4 जूनपर्यंत पुढे ढकलला. आता मोहनलाल यांचा ‘दृश्यम ३’ हाही पुढे ढकलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 3 एप्रिल 2026 रोजी रिलीज होणारा हा क्राइम थ्रिलर चित्रपटही लांबणीवर जाणार असल्याचे समोर येत आहे. यामागील कारणही ‘टॉक्सिक’प्रमाणेच असल्याचे सांगितले जात आहे. खाडी देशांमधील वाढता संघर्ष आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे ओव्हरसीज बिझनेसवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

6 महिन्यांच्या प्रेग्नन्सीनंतर Divyanka Tripathi चे थाटात पार पडले डोहाळेजेवण; मित्र-मैत्रिणींनी दिले खास सरप्राईज

लेखक-दिग्दर्शक जीथू जोसेफ यांच्या ‘दृश्यम 3’ हा 2013 पासून सुरू झालेल्या ‘दृश्यम’ फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. याआधी 2021 मध्ये ‘दृश्यम 2’ प्रदर्शित झाला होता. विशेष म्हणजे, यावेळी मूळ मलयाळम चित्रपट हिंदीसह इतर भारतीय भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, अजय देवगण यांचाही ‘दृश्यम 3’ वेगळ्या कथेसह 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

हिंदीत विजय साळगावकर, मल्याळममध्ये जॉर्जकुट्टी

एकूणच, यावेळी प्रेक्षकांना हिंदीत विजय सालगावकर आणि मलयाळममध्ये जॉर्जकुट्टी यांच्या दोन वेगळ्या कथा पाहायला मिळणार आहेत. सध्या उपलब्ध माहितीनुसार, इराणवर अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे खाडी देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय चित्रपटांसाठी UAE हा मोठा बाजार असल्यामुळे या परिस्थितीचा ओव्हरसीज कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर ‘टॉक्सिक’ प्रमाणेच ‘दृश्यम 3’ची रिलीज पुढे ढकलण्याचा विचार सुरू असून, याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

नोरा फतेहीचा वर्क परमिट रद्द होणार? भारतातून डिपोर्ट होण्याची शक्यता; 10 वकीलांची टीम मंत्रालयात पोहोचली

सॅकनिल्कच्या अहवालानुसार, जीथू जोसेफ आणि त्यांची टीम ‘दृश्यम 3’चा मोठ्या स्तरावर जागतिक प्रदर्शन करण्याचा विचार करत आहेत. मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर त्याचा चित्रपटाच्या कमाईवर होणाऱ्या परिणामाची त्यांना जाणीव आहे. तणाव वाढत असल्यामुळे खाडी देशांमध्ये भारतीय चित्रपटांच्या व्यवसायावर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. अशा परिस्थितीत मोहनलाल यांनाही याबाबत चिंता वाटत आहे, कारण परदेशात त्यांची मोठी फॅन फॉलोइंग आहे. विशेषतः ‘दृश्यम’ फ्रँचायझीच्या या पुढील भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.

“दृश्यम ३” मध्ये झळकणार हे कलाकार

“दृश्यम ३” साठी मोहनलाल यांच्यासोबत मीना, अंसिबा हसन, एस्थर अनिल आणि सिद्दीक परत येत आहेत. चित्रपटाची कथा जीतू जोसेफ यांनी लिहिली असून, आशिर्वाद सिनेमाजच्या बॅनरखाली अँटनी पेरुंबावूर यांनी निर्मिती केली आहे. कॅनडा आणि अमेरिकेत वितरणासाठी १० कोटी रुपयांचा करार आधीच झाला आहे, यावरून प्रेक्षकांचा चित्रपटाबद्दलचा उत्साह दिसून येतो आहे.

 

 

Web Title: Drishyam 3 to be postponed after yash toxic mohanlal film is also set to be delayed find out why

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • tollywood movie

संबंधित बातम्या

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
1

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?
2

Love and War: रिलीजआधीच भन्साळींच्या चित्रपटाचा धमाका! ‘लव्ह अँड वॉर’च्या राइट्ससाठी बॉलिवूडमधील दिग्गजांत युद्ध; कोण बाजी मारणार?

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती
3

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी
4

Bharat Bhagya Vidhata: हिंदी Zee5 वर 26/11 दहशतवादी हल्ल्याच्या अनाम वीरांची कहाणी, स्वातंत्र्यदिनी खास पर्वणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.