Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eetha Movie : श्रद्धा कपूरच्या ‘ईठा’ सिनेमावर नारायणगावकर कुटुंबाची नाराजी! ‘या’ मागण्यांची केली शिफारस

विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत असलेला 'ईठा' हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर त्याला चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी चित्रपटाच्या नावासह काही दृश्यांवर नारायणगावकर कुटुंबीयांनी आक्षेप घेतला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 28, 2026 | 08:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

अभिनेत्री श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत असलेला आणि तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘ईठा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांनी चित्रपटाच्या नावासह काही दृश्यांवर आक्षेप घेत निर्मात्यांसमोर काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. या मागण्यांकडे ३ जुलैपर्यंत लक्ष दिले नाही, तर न्यायालयीन मार्ग अवलंबण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

लेकीसाठी काहीही! मिशी काढून साडी नेसायलाही तयार; प्रसिद्ध अभिनेत्याचा भावूक अंदाज जिंकतोय चाहत्यांची मनं, Video व्हायरल

विठाबाई नारायणगावकर यांचे पुत्र कैलास नारायणगावकर आणि नातू मोहित नारायणगावकर यांनी एका मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, विठाबाई यांच्या आयुष्यावर चित्रपट तयार होत असल्याचा आनंद आणि अभिमान आहे. मात्र, चित्रपटाच्या निर्मितीपूर्वी किंवा चित्रीकरणादरम्यान कुटुंबीयांशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधण्यात आला नाही. त्यामुळे विठाबाईंच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना आणि वास्तव चित्रपटात अधिक प्रभावीपणे मांडण्याची संधी गमावली गेली, असे त्यांनी म्हटले. टीझरमधील काही दृश्यांवरही त्यांनी आक्षेप घेतला आहे. स्टेजच्या मागे बाळाचा जन्म झाल्याचे दाखवण्यात आले असून, अशा संवेदनशील प्रसंगांबाबत कुटुंबीयांकडून खात्री करून घेणे आवश्यक होते, असे कैलास नारायणगावकर यांनी सांगितले. विठाबाईंचा संघर्ष मोठ्या पडद्यावर पोहोचत असल्याचा आनंद असला, तरी त्याचे वास्तवाशी सुसंगत चित्रण होणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

चित्रपटाच्या शीर्षकाबाबतही कुटुंबीयांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ग्रामीण भागात ‘विठा’चा उच्चार ‘ईठा’ असा केला जात असला, तरी नव्या पिढीला विठाबाईंची खरी ओळख समजण्यासाठी त्यांच्या पूर्ण नावाचा उल्लेख होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपटाचे नाव बदलून ‘विठा’ करावे किंवा उपशीर्षकात ‘विठाबाई नारायणगावकर’ असे संपूर्ण नाव द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. याशिवाय, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी तो कुटुंबीयांना दाखवावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. चित्रपटात काही तथ्यात्मक चुका किंवा आक्षेपार्ह बाबी आढळल्यास त्या वेळेत दुरुस्त करता येतील, असे त्यांचे म्हणणे आहे.

मोहित नारायणगावकर यांनी सांगितले की, या सर्व मागण्या ई-मेलद्वारे चित्रपटाच्या निर्मात्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या आहेत. तसेच विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित प्रकाशित झालेल्या एका पुस्तकातील अनेक माहिती ऐकीव असल्याचा दावाही त्यांनी केला. त्या पुस्तकाचा आधार घेऊन चित्रपट तयार करण्यात आला असेल, तर इतिहासाचे चुकीचे चित्रण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी आणखी एक मुद्दा उपस्थित करत सांगितले की, विठाबाई ज्या तमाशा फडाशी संबंधित होत्या, त्याचे मूळ नाव ‘भाऊ बापू नारायणगावकर’ असे होते. मात्र, चित्रपटात त्याचा अपूर्ण उल्लेख करण्यात आल्याने मूळ इतिहासाला धक्का बसू शकतो, असे त्यांचे मत आहे.

Ravana Lanka Tour: रावणाची लंका आणि अशोकवाटिका आता कशी दिसते? प्रदीप काबरांनी दाखवली थक्क करणारी दृश्ये

निर्मात्यांकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नसल्याची माहिती देत मोहित नारायणगावकर यांनी २ ते ३ जुलैपर्यंत संपर्क न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला. या संदर्भात कायदेतज्ज्ञांशी चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. “चित्रपट चांगला असेल, तर आम्ही त्याचे स्वागतच करू. मात्र, विठाबाई नारायणगावकर यांच्या इतिहासाचे चुकीचे किंवा आक्षेपार्ह चित्रण झाल्यास आम्ही शांत बसणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.

Web Title: Eetha movie narayangavkar family objects to title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2026 | 08:27 PM

Topics:  

  • Shraddha Kapoor

संबंधित बातम्या

Shraddha Kapoor Followed Marathi Actress: श्रद्धाने ‘या’ मराठी अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर केलं फॉलो; पोस्ट करत व्यक्त केल्या भावना
1

Shraddha Kapoor Followed Marathi Actress: श्रद्धाने ‘या’ मराठी अभिनेत्रीला इंस्टाग्रामवर केलं फॉलो; पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.