Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझ्या नवऱ्याचे ५० अफेअर्स असले तरी…’; शिल्पा शिंदेवर भडकली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा, ‘लॉकअप २’मध्ये रंगला मोठा वाद

'लॉकअप २'मध्ये शिल्पा शिंदे आणि सुनीता आहुजा यांच्यात जोरदार वाद झाला. गोविंदावरील टिप्पणीवर सुनीता आहुजाने संतप्त प्रतिक्रिया देत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 07, 2026 | 10:56 AM
( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

नेटफ्लिक्सवरील रिअॅलिटी शो ‘लॉकअप २’ सध्या स्पर्धकांमधील वाद, आरोप-प्रत्यारोप आणि वैयक्तिक खुलाशांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच शोमधून श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठ बाहेर पडल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शिंदेने वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दमदार एन्ट्री केली. तिच्या आगमनानंतर घरातील वातावरण आणखी तापल्याचं पाहायला मिळत आहे.

शिल्पा शिंदेच्या एन्ट्रीनंतर सर्वाधिक चर्चा झाली ती गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा हिच्यासोबत झालेल्या वादाची. शोदरम्यान शिल्पाने गोविंदाचा उल्लेख करत संवाद सुरू केला. मात्र, आपल्या कुटुंबाबद्दल चर्चा झाल्याने सुनीता आहुजा संतापली आणि तिने स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.

राम कपूरशी बोलताना सुनीता म्हणाली, “माझ्या कुटुंबाबद्दल बोलू नका. तो माझा नवरा आहे. त्याचे ५० अफेअर्स असले तरी त्याचा इतरांशी काय संबंध? माझ्या वैयक्तिक आयुष्यावर कोणी भाष्य करू नये.” तिच्या या वक्तव्यानंतर शोमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं.

दरम्यान, सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा शिंदे सुनीता आहुजाला एलिमिनेशनपासून वाचवण्यासाठी इतर स्पर्धकांशी वाद घालताना दिसते. विशेष म्हणजे, सुनीताने स्वतःला घरी जायचं असल्याचं सांगून तिला कोणीही वाचवू नये, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, शिल्पाने तिचा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याने घरात नव्या चर्चांना उधाण आलं.

Marathi Serial: संपूर्ण लूक बदलून ‘ती’ खलनायिका पुन्हा आली; ‘सावळ्याची जणू सावली’च्या सेटवर स्वागताची जोरदार तयारी

 

यापूर्वीही शिल्पा शिंदेने सुनीता आहुजाशी तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शिल्पा म्हणाली होती, “आम्ही गोविंदाचे चाहते आहोत, पण काही गोष्टींबद्दल लोक प्रश्न विचारतात.” यावर सुनीताने शांत पण ठाम शब्दांत उत्तर दिलं, “जेव्हा तुम्ही त्या परिस्थितीतून जाल, तेव्हा तुम्हाला समजेल. त्यामुळे जास्त बोलू नका.”

सुनीता आहुजाच्या या स्पष्ट भूमिकेचं सोशल मीडियावर अनेकांनी समर्थन केलं आहे. तर दुसरीकडे, शिल्पा शिंदे आणि सुनीता आहुजा यांच्यातील हा वाद आगामी भागांमध्ये आणखी कोणतं वळण घेणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Sultan Movie: 10 वर्षांनंतर समोर आलं ‘सुलतान’चं रहस्य; Salman Khanने अवघ्या 15 मिनिटांत चित्रपटासाठी दिला होता होकार

Web Title: Even if my husband had 50 affairs govindas wife sunita ahuja slams shilpa shinde major clash erupts on lock upp 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • shilpa shinde
  • sunita ahuja
  • Television Shows

संबंधित बातम्या

Govinda-Sunita Ahuja: घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम! सुनीता आहुजाने घेतला घटस्फोटाचा अर्ज मागे; मॅनेजरने केला खुलासा
1

Govinda-Sunita Ahuja: घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम! सुनीता आहुजाने घेतला घटस्फोटाचा अर्ज मागे; मॅनेजरने केला खुलासा

Govinda-Sunita Ahuja Divorce: गोविंदा-सुनीता आहुजा यांचा घटस्फोट होणार? मुलासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली सुनीता; Video व्हायरल
2

Govinda-Sunita Ahuja Divorce: गोविंदा-सुनीता आहुजा यांचा घटस्फोट होणार? मुलासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली सुनीता; Video व्हायरल

Govinda Controversy: गोविंदाच्या समर्थनार्थ सोमी अली मैदानात; कमी वयाच्या अभिनेत्रीला हिरोईन करण्यावर म्हणाली…
3

Govinda Controversy: गोविंदाच्या समर्थनार्थ सोमी अली मैदानात; कमी वयाच्या अभिनेत्रीला हिरोईन करण्यावर म्हणाली…

Govinda: ‘स्वतःच्या मर्यादेत रहा…’ गोविंदाचा सुनिता अहुजावर पलटवार, ‘Sugar Daddy’ टोमण्यावर भडकला
4

Govinda: ‘स्वतःच्या मर्यादेत रहा…’ गोविंदाचा सुनिता अहुजावर पलटवार, ‘Sugar Daddy’ टोमण्यावर भडकला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.