
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने गँगस्टर रवी पुजारीला अटक केल्याचे आता समोर आपले आहे. २०१८ मध्ये त्याच्यावर कोरिओग्राफर-चित्रपट दिग्दर्शक रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लिझेस डिसूझा यांना धमकावण्याचा आणि खंडणी मागण्याचा आरोप होता. हे संपूर्ण प्रकरण एका चित्रपटावरून झालेल्या वादानंतर सुरू झाले होते आणि आता या गॅंगस्टरला अटक करण्यात आली आहे. गँगस्टर रवी पुजारीला पाच वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतील सेनेगल या देशातून पोलिसांनी अटक केली होती. त्याने अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींना देखील धमकावले होते आणि त्यांच्या घरांवर हल्ला केला होता. तो २०० हून अधिक प्रकरणांमध्ये वॉन्टेड होता. परंतु, रेमो डिसूझा प्रकरणात त्याला अटक करण्यात आली नव्हती.
रवी पुजारीला पोलीस कोठडीत पाठवण्यात आले
गुरुवार, २२ जानेवारी रोजी, गुन्हे शाखेने गँगस्टर रवी पुजारीला न्यायालयात हजर केले आणि त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलिसांनी सांगितले की त्याचा सहआरोपी सत्येंद्र त्यागी याला आधीच अटक करण्यात आली आहे. त्यानेच ऑक्टोबर २०१६ आणि फेब्रुवारी २०१८ मध्ये रवी पुजारीला रेमो डिसूझाला धमकी देण्याचे आदेश दिले होते.
रवी पुजारीने रेमो डिसूझाला दिली धमकी
या गुंडावर रेमो, त्याची पत्नी आणि मॅनेजर यांना वारंवार फोन करून “डेथ ऑफ अमर” चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी दबाव आणल्याचा आरोप आहे. त्याने हे प्रकरण मिटवण्यासाठी ₹५० लाखांची खंडणीही मागितली. २०१८ मध्ये, रेमो आणि सत्येंद्र यांच्यात एक करार झाला, ज्यामध्ये चित्रपटाचे शीर्षक बदलून “अमर मस्ट डाय” असे करण्यात आले. परंतु, चित्रपटाच्या हक्कांवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. गुंडाने या प्रकल्पात गुंतवणूक केल्याचा दावा केला आणि रेमोकडून अद्याप त्याला ५ कोटी रुपये मिळालेले नसल्याचा दावा केला.
सत्येंद्र त्यागीच्या सांगण्यावरून रवी पुजारीने खंडणीची मागणी केली
त्यानंतर, सत्येंद्र त्यागीने पैसे उकळण्यासाठी रवी पुजारीला कामावर ठेवले. सत्येंद्रच्या सांगण्यावरून, रवीने रेमो, त्याची पत्नी आणि मॅनेजरला धमकावू लागला आणि प्रकरण मिटवण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली. रवी एकेकाळी छोटा राजनचा शार्पशूटर होता आणि तो पैशांसाठी खून देखील करत असे. 2017 मध्ये उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथं त्यागीने रेमो डिसूझाविरोधात एफआयर दाखल केला होता. आता रवी पुजारीला अटक केल्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु आहे.