Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govinda : ‘गोळी खिशात घेऊन…’, Lock Upp 2’मध्ये गोविंदाची दमदार एंट्री; पत्नी सुनीता आहुजाच्या वक्तव्यावरही सोडलं मौन

'लॉक अप २'च्या आगामी एपिसोडमध्ये गोविंदाची विशेष एन्ट्री पाहायला मिळणार आहे. पत्नी सुनीता आहुजाच्या वक्तव्यावर त्याने मौन सोडत 'गोळी' प्रकरणावरही मिश्कील प्रतिक्रिया दिली. जाणून घ्या नेमकं काय घडलं.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 10, 2026 | 09:49 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

नेटफ्लिक्सवरील रिअॅलिटी शो ‘लॉक अप २’ सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. शोमध्ये दररोज नवे ट्विस्ट पाहायला मिळत असून, आता आगामी ‘जजमेंट डे’ एपिसोडमध्ये अभिनेता गोविंदाची एन्ट्री होणार आहे. निर्मात्यांनी याचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यामध्ये गोविंदा पत्नी सुनीता आहुजाला भेटण्यासाठी शोमध्ये आल्याचे दिसत आहे.

याआधी शोमध्ये सुनीता आहुजाने गोविंदासोबतच्या वैवाहिक आयुष्यातील चढ-उतार, त्याच्या विवाहबाह्य संबंधांच्या चर्चांबाबत आणि त्यांच्या नात्यातील अडचणींबाबत स्पष्टपणे भाष्य केले होते. अभिनेत्री शिल्पा शिंदेने या विषयावर टिप्पणी केल्यानंतर सुनीताने गोविंदाची बाजू घेतल्याचाही प्रसंग शोमध्ये पाहायला मिळाला होता.

आता गोविंदा स्वतः शोमध्ये येत पत्नीला पाठिंबा देताना दिसणार आहे. मात्र, त्याच्या एन्ट्रीवेळी  केलेल्या एका विधानाने सर्वांचेच लक्ष वेधले. प्रोमोमध्ये फराह खान आणि रितेश देशमुख यांच्याशी संवाद साधताना गोविंदा म्हणतो, “जी कोठडी दिसते ती ही आहे, पण जी दिसत नाही ती खरी कोठडी आहे. मी तिथूनच आलो आहे.”

यानंतर फराह खान त्याला विचारते, “तिला गोळी घालण्याची सुपारी तू का दिलीस?” त्यावर गोविंदा मिश्कील अंदाजात उत्तर देतो, “मी गोळी घेऊन आलोय. तिला माझ्या छातीत गोळी घालायची होती.” हे ऐकून सर्वजण क्षणभर चकित होतात. मात्र, त्यानंतर तो हातातील गोळी (बुलेट) दाखवत विनोद करत असल्याचे स्पष्ट होते.

दरम्यान, सुनीता आहुजाने यापूर्वी अनेक मुलाखतींमध्ये आणि रिअॅलिटी शोमध्ये गोविंदाच्या अपघाती गोळीबाराच्या घटनेवर मिश्कील भाष्य केले होते. ‘लाफ्टर शेफ्स’ कार्यक्रमात तिने, “जर गोळी झाडायचीच होती तर छातीत झाडायला हवी होती, पायात नाही,” असे विनोदी स्वरूपात म्हटले होते. तिचे हे वक्तव्य त्यावेळी सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरले होते.

Hero No. 1 ki entry se lekar inmates ki class lagne tak, iss Judgement Day mein machega kaafi bawaal 💥 pic.twitter.com/k6b3ER9crb — Netflix India (@NetflixIndia) July 9, 2026

 

Mysaa: रश्मिका मंदानाचा विक्रम! अंडरवॉटर फाइट सीन शूट करणारी ठरली पहिली अभिनेत्री; 20 तास पाण्यात राहून केलं शूटिंग

उल्लेखनीय म्हणजे, २०२४ मध्ये गोविंदाच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून चुकून गोळी सुटून त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रियेनंतर काही दिवसांत त्याला डिस्चार्जही देण्यात आला होता.

आता ‘लॉक अप २’मध्ये गोविंदा आणि सुनीता आहुजा समोरासमोर आल्यानंतर त्यांच्या संवादात आणखी कोणते खुलासे होणार आणि दोघांतील मतभेदांवर काय चर्चा होणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Arbaz Shaikh : मुंढेंनी सैराट फेम सल्याची हाक ऐकली! अभिनेत्याने रडत शेअर केला व्हिडीओ, FDA ने रुग्णालयात टाकली धाड अन्…

Web Title: Govinda makes a powerful entry in lock upp 2 breaks his silence on wife sunita ahujas remarks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 09:39 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Govinda
  • sunita ahuja

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.