Pashmina roshan (फोटो सौजन्य-Instagram)
बॉलीवूडचा ग्रीक गॉड हृतिक रोशन सध्या त्याची चुलत बहीण पश्मिना रोशन हिच्या यशाचा आनंद साजरा करत आहे, तिने अलीकडेच ‘इश्क विश्क रिबाउंड’ या हिंदी चित्रपटातून शानदार पदार्पण केले आहे. या चित्रपटामधील तिचे पात्र आणि अभिनय चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. अभिनेत्रीला तिच्या अभिनयाबद्दल प्रशंसादेखील मिळाली आहे. आणि आता तिच्या अभिनयाचे कौतुक तिचा चुलत भाऊ अभिनेता हृतिक रोशनने देखील केले आहे. हृतिकने तिचे कौतुक करताना एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे ज्यामध्ये तिने खूप सुंदर नोट लिहिली आहे.
अभिनेत्याने त्याच्या बहिणीचे कौतुक करताना एक चांगला संदेश देखील तिला दिला आहे, त्याने पोस्ट शेअर करताना लिहिले की, “तुला खऱ्या अर्थाने ओळखणे आणि मोठ्या पडद्यावर पूर्णपणे पात्रात मग्न असलेले पाहणे हा एक साक्षात्कार आणि माझ्यासाठी आनंददायी अनुभव आहे, तुझी क्षमता ही गगनाला भिडणारी आहे जे तूला लवकरच दिसून येईल, जशी तू तुझा पहिला चित्रपट ‘इश्क विश्क रिबाउंड’ मध्ये दिसली आहेस. तुझ्या उपस्थितीत काहीतरी विशेष आहे. एकदा का तुला ते कळले की ते कसे वापरायचे, त्याचे संरक्षण कसे करायचे, त्याचे पालनपोषण कसे करायचे हे स्वःताच समजेल. असेच प्रयत्न करत राहा चांगला अनुभव आणि पात्र करत राहा मला तुझा खूप अभिमान आहे.” असे त्याने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
हृतिक आणि पश्मिना यांचे खूप जवळचे नाते आहे, हे दोघेदेखील अनेकदा एकमेकांबरोबर प्रवास करताना दिसत असतात. हृतिक हा एक प्रस्थापित अभिनेता म्हणून पश्मीनासाठी नेहमीच मार्गदर्शन करणारा भाऊ ठरला आहे. या दोघांमधील नाते परस्पर आदर आणि कौतुकाचे असल्याचे स्पष्ट दिसून येते, हृतिक अनेकदा भाऊ म्हणून त्याचे कर्तव्य पार पाडले आहे. तसेच, अभिनेत्रीने कुटूंबियाचे समर्थन करणारी पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तिला रोशन कुटूंबियाचा एक भाग असल्याचा अभिमान वाटतो असे ती म्हणाली होती.
हे देखील वाचा- पश्मिना रोशनने इंस्टाग्रामच्या AMA द्वारे केला हृदयस्पर्शी खुलासा, BTS टाकून चाहत्यांना संदेश
तरुण प्रेमावर आधारित आधुनिक चित्रपट “इश्क विश्क रिबाउंड” हा एक भावनिक आणि मनोरंजक प्रवास असल्याचे वचन देतो आणि आता चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांची या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद आणि प्रेम मिळताना दिसत आहे. पश्मिना रोशन लवकरच अश्या उत्साहाच्या भूमिकेत पुन्हा दिसेल आणि चाहत्यांचे प्रेम मिळवेल याची आशा आहे.