पंत आणि बावुमा या दोन कर्णधारांकडून सामन्याचे उद्घाटन(फोटो-सोशल मीडिया)
हेही वाचा : Ind vs SA Test : गौतम गंभीरच्या प्रयोगांचे भारतीय संघाला अपचन! दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले गेले ‘सात’ फलंदाज
या सामन्यातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे ऋषभ पंतचा कर्णधार म्हणून मैदानात प्रवेश. शुभमन गिल मानेच्या दुखापतीमुळे बाहेर पडला, ज्यामुळे पंतला संघाची जबाबदारी स्वीकारावी लागली. हा प्रसंग त्याच्यासाठी खास होता, कारण तो पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून घरच्या प्रेक्षकांसमोर खेळला होता. सामन्यापूर्वीच्या अधिकृत फोटोशूट आणि औपचारिकता या ऐतिहासिक क्षणाला आणखी खास बनवतात.
दूसरा सामना सुरू होण्यापूर्वी, भारतीय कर्णधार ऋषभ पंत आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा यांनी एसीए स्टेडियममध्ये एका संस्मरणीय फोटोवर स्वाक्षरी केली. यावेळी बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी देखील समारंभाला उपस्थिती लावली आणि दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीसाठी एक विशेष स्मारक सोन्याचे नाणे भेट देण्यात आले आहे. गुवाहाटीमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याची आठवण म्हणून हे नाणे कायमचे जपले जाणार आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बावुमाकडून नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. खेळपट्टी लवकर फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने त्याने ही रणनीती अवलंबवण्यात आली. भारताकडून या सामन्यासाठी संघामध्ये बदल केले, ज्यामध्ये संघाला नवीन जोम देण्यासाठी युवा खेळाडू नितीश कुमार रेड्डी आणि साई सुदर्शन यांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा : AUS vs ENG : Ashes 2025 मध्ये ट्रॅव्हिस हेडचा धुमाकूळ! फक्त 69 चेंडूत धमाकेदार शतक ठोकत रचला इतिहास
भारत आणि दक्षिण आफ्रिकेतील दुसरा कसोटी सामना गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने ६ बाद २४७ धावां केल्या होत्या. मुथुस्वामी २५ आणि व्हर्नन १ धावांवर नाबाद राहिले. भारताकडून फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने सर्वाधिक तीन बळी घेतले.






