बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्याच्या शेवटच्या दिवशी 41 पैकी आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले. या उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळत जल्लोष केला. राष्ट्रवादीचे नेते व माजी जेष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी, बारामती शहर हे विकासाचे रोल मॉडेल संपूर्ण देशात पोहोचले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीमुळे झालेल्या विकासामुळे बारामतीकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास आहे. खरंतर राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार बिनविरोध निवडून यायला हवे होते. तरी देखील आठ उमेदवार बिनविरोध निवडून आले, याबद्दल बारामतीकर जनतेचे व उमेदवारी अर्ज माघारी घेतलेल्या सर्व उमेदवारांचे आम्ही आभारी आहोत. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सचिन सातव व उर्वरित सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया किरण गुजर यांनी व्यक्त केली.