Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मी व्हर्जिन आहे’, शिल्पा शिंदेने ‘या’ स्पर्धकाची उडवली खिल्ली; ‘lock upp 2’च्या नव्या भागात रंगला वाद

'लॉक अप 2'च्या नव्या एपिसोडमध्ये शिल्पा शिंदे आणि श्रेया कालराने शिवांगी जोशीची नक्कल करत तिची खिल्ली उडवली. 'मी वर्जिन आहे' या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 15, 2026 | 09:28 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Shilpa Shinde Virgin Comment:  नेटफ्लिक्सवरील रिअॅलिटी शो lock upp 2 सुरू झाल्यापासून अनेकदा स्पर्धकांमध्ये वाद, विनोद आणि जोरदार शाब्दिक चकमकी पाहायला मिळतात. ‘lock upp 2’ च्या या भागात स्पर्धकांमध्ये वाद होताना दिसत आहे. शोच्या नुकत्याच संपलेल्या एका भागातील एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये शिल्पा शिंदे आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर श्रेया कालरा टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशीची नक्कल करताना दिसत आहेत.व्हिडिओमध्ये शिल्पाने शिवांगीवर टिप्पणी केली, ज्यामुळे सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

नुकत्याच प्रसारित झालेल्या एका एपिसोडमध्ये शिल्पा शिंदे आणि श्रेया कालरा एकत्र बसून शिवांगी जोशीची नक्कल करताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये शिल्पा शिवांगीच्या बोलण्याच्या शैलीची नक्कल करत म्हणते, “हे मैत्रिणी, माझ्याकडे कोणतंही सीक्रेट नाही. मी किती अभिनय करू? मी खूप इनोसेंट आहे. मला काहीही नको आहे. मी वर्जिन (Virgin) आहे. मी हे फक्त लग्नानंतरच करेन.”


शिल्पाची नक्कल पाहून श्रेया सुद्धा हसायला लागते आणि मग हर्षद चोप्राची नक्कल करत म्हणते, “शिवांगी, तू काय विचार करत आहेस?” त्यावर ती शिवांगीच्याच शैलीत उत्तर देते, “माहित नाही, पण जेव्हा हे सीक्रेट उघड होईल, तेव्हा मी खूप हसेन, कारण त्यात काहीच नव्हतं.”

Shahrukh Khan : शाहरुख खानला दिलासा! मन्नत वाढणार? न्यायालयाने नूतनीकरणाविरोधात ‘त्या’ याचिका फेटाळल्या

खरं तर, हा सगळा प्रकार तेव्हा घडला, जेव्हा शिल्पा आणि श्रेयाने शिवांगी जोशी आणि हर्षद चोप्रा यांना दुरून एकमेकांशी बोलताना पाहिले. त्यांनी ते संभाषण आधार मानून त्यांची नक्कल करायला सुरुवात केली. मात्र, शिवांगीने त्यांच्या संभाषणावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

शिल्पा शिंदेचे शिवांगी जोशीसोबतचे वागणे वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीच्या एका एपिसोडमध्ये, शिल्पाने नियंत्रक म्हणून शिवांगीला हर्षद चोप्राशी कमी बोलण्याचा आदेश दिला होता. त्यावेळी सोशल मीडियावर अनेक लोकांनी शिल्पाच्या वागण्यावर टीका केली होती.

‘लॉक अप सीझन २’ हा शो पहिल्या दिवसापासूनच स्पर्धकांमधील वाद आणि जोरदार भांडणांमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये राम कपूर, धीरज धूपर, शिल्पा शिंदे, शिवांगी जोशी, श्रेया कालरा आणि आकांक्षा चमोला यांच्यासह अनेक प्रसिद्ध चेहरे आहेत.

“तुकाराम मुंढेंकडे शिक्षण खातंही सोपवा”, मराठी अभिनेत्याचं मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन, म्हणाला, ‘System खऱ्या अर्थाने मुळापासून’

Web Title: I am a virgin shilpa shinde mimics shivangi joshi lock upp 2 latest episode goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • shilpa shinde
  • tv reality show

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.