Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘माझ्यावर हल्ला झाला, पण एका पाकिस्तानीनेच’, कराची स्फोटाचा थरारक अनुभव; Sonu Nigam ने शेअर केल्या जुन्या आठवणी

प्रसिद्ध गायक सोनू निगमने आपल्या सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात, त्याने २००४ च्या कराची कॉन्सर्ट स्फोटाच्या भीषण आठवणींना उजाळा दिला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Mar 30, 2026 | 06:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

सोनू निगम हा बॉलीवूड मधला सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. त्याच्या आवाजाने त्याला केवळ भारतातच नव्हे, तर जगभरात प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली आहे. तो पाकिस्तानातही खूप लोकप्रिय आहे. सोनू एकदा एका कॉन्सर्टसाठी पाकिस्तानाला गेले होता. त्याचा कॉन्सर्ट कराचीमधील एका लष्करी परिसरात होणार होता. त्याने आपल्या कुटुंबालाही सोबत नेले होते. कॉन्सर्टच्या अगदी आधी, त्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला. तो आणि त्याचे कुटुंब ज्या बसमधून प्रवास करत होते, त्या बसच्या शेजारी असलेल्या एका कारमध्येही बॉम्बस्फोट झाला.

प्रसिद्ध गायक सोनू निगमने आपल्या सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात, त्याने २००४ च्या कराची कॉन्सर्ट स्फोटाच्या भीषण आठवणींना उजाळा दिला आहे. ही घटना १० एप्रिल २००४ रोजी घडली होती, जेव्हा तो पाकिस्तान दौऱ्यावर होता आणि कराचीमध्ये त्याचा एक लाईव्ह कॉन्सर्ट नियोजित होता. हा छोटा व्हिडिओ त्या दिवसाची संपूर्ण कहाणी एका माहितीपटाप्रमाणे सांगतो. मिळालेल्या माहितीनुसार, कॉन्सर्ट सुरू होण्याच्या काही वेळ आधी, कार्यक्रमस्थळाजवळ एक शक्तिशाली स्फोट झाला, ज्यात अनेक लोक जखमी झाले आणि काहींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तथापि, सुरक्षा वाढवल्यानंतर, कार्यक्रम रद्द न करता तो पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बॉम्बस्फोटातून गायक थोडक्यात बचावला. त्याने या घटनेबद्दल यापूर्वीही भाष्य केले आहे. आता, त्याने एक रील पुन्हा शेअर केली आहे. ही रील पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव अर्स्लान खान आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सोनू निगमच्या पाकिस्तानमधील कॉन्सर्टच्या अनेक रील्स शेअर केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी फुरकान स्पष्ट करतो की, दरवर्षी १० एप्रिलला त्याला ‘आपण भाऊ आहोत. आपण एकत्र मृत्यूवर मात केली,’ असा संदेश यायचा. त्याने सांगितले की, सेटवर सोनू म्हणाला होता, ‘माझ्यावर इथे हल्ला झाला होता, पण पाकिस्तानने मला वाचवले.’मंचावर पोहोचल्यावर सोनू म्हणाला, “मी तुमचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करतो. मला या कार्यक्रमाची सुरुवात या वाक्याने करायची आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील लोक खूप दुर्दैवी ठरले आहेत. ज्यांच्यावर आपण खूप प्रेम केले, ते भारतात असोत वा पाकिस्तानात, अनेक वर्षांपासून बेपत्ता आहेत. कृपया प्रार्थना करा की आपले प्रेम कायम वाढत राहो.”

लाल सिंह चड्ढा” नंतर नागा चैतन्य हिंदी चित्रपटांपासून दूर; अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला…

‘मी कॉल केलेलाच बरा…’, ‘Dhurandhar 2’ पाहिल्यानंतर ‘या’ चित्रपट निर्मात्याचा Aditya Dhar ला सूचक इशारा

व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “१० एप्रिलला फक्त दहा दिवस उरले आहेत. १० एप्रिल २००४ रोजी कराचीमध्ये सोनू भैय्याच्या दौऱ्यादरम्यान काय घडले, यावर एक छोटा माहितीपट.” यात सोनू निगमच्या नियोजित कॉन्सर्टजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाचे वर्णन आहे, ज्यात अनेक लोक ठार आणि जखमी झाले होते. या घटनेनंतरही सोनूने कार्यक्रम सादर केला.त्यानंतर सोनू निगमने गायले, “‘क्या बेबसी है ये क्या हैं मजबूरियां, हम पास हैं फिर भी कितनी हैं दूरियां.’ .” यावर उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला आणि शिट्ट्या वाजवल्या. सोनूने त्याची अनेक गाजलेली गाणी गायली.

Web Title: I was attacked but a pakistani saved me sonu nigam shares chilling memories of the karachi blast

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • india- Pakistan
  • singer sonu nigam

संबंधित बातम्या

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
1

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
2

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार
3

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरातील वातावरण तापलं! 1-2 नाही तर एकाच वेळी 11 जण नॉमिनेट, ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी
4

National Crush: कोण आहे नवी ‘नॅशनल क्रश’ तान्या मिश्रा? बिहारच्या या तरुणीच्या डोळ्यांवर फिदा झाले नेटकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.