Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayan:रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची रिलीज डेट ढकलली पुढे? सोशल मीडियावर चाहत्यांचा उडाला गोंधळ

रणबीर कपूरचा "रामायण" हा या वर्षीच्या सर्वात बिग बजेट चित्रपटांपैकी एक आहे. भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात महागडा चित्रपट म्हणून त्याचे वर्णन केले जात आहे, ज्याचे बजेट ₹४,००० कोटी आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 13, 2026 | 12:33 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • ‘रामायण’ची रिलीज डेट ढकलली पुढे
  • सोशल मीडियावर चाहत्यांचा उडाला गोंधळ
  • नेमकं काय आहे प्रकरण?
 

प्रेक्षक आता रणबीर कपूरच्या “रामायण” चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. निर्मात्यांनी आधीच जाहीर केले आहे की चित्रपटाचा पहिला भाग २०२६ च्या दिवाळीला प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत फक्त चित्रपटाचा परिचय व्हिडिओ निर्मात्यांनी रिलीज केला होता. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागडा चित्रपट म्हणून ओळखला जात आहे, ज्याचे बजेट ₹४,००० कोटी आहे. तसेच चाहते या चित्रपटाची कथा आणि रिलीज डेट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच आता या चित्रपटाबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे.

नमित मल्होत्रा या चित्रपटात गुंतवणूक करत असून साऊथ अभिनेता यश सह-निर्माता म्हणूनही या प्रकल्पाशी जोडले गेले आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम यांच्या भूमिकेत दिसणार आहे, तर साई पल्लवी माता सीतेची भूमिका साकारणार आहेत. याशिवाय यश रावणाच्या भूमिकेत झळकणार असून सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहेत.

अलीकडेच अशी माहिती समोर आली आहे की या चित्रपटासाठी एक भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामध्ये सर्व पात्रांविषयी अधिकृत माहिती दिली जाणार होती. मात्र या कार्यक्रमाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळेच आता हा चित्रपट पुढे ढकलला जाणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे.

अखेर गौरव खन्नाला मिळाली ‘Bigg Boss 19’ ची संपूर्ण प्राइज मनी; काय आहे 50 लाखांचं सत्य?

रणबीर कपूर गेल्या बराच काळापासून या चित्रपटावर काम करताना दिसणार आहे. हा चित्रपट यंदाच्या सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. निर्मात्यांकडून या प्रकल्पाचे काम अतिशय गुप्तपणे सुरू आहे. मात्र चित्रपट पुढे ढकलला जाणार असल्याबाबत निर्मात्यांनी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तरीही सोशल मीडियावर या संदर्भात चर्चा का सुरू झाली आहे.

‘रामायण’ चित्रपटाची डेट ढकलली पुढे?

अलीकडेच अशी माहिती समोर आली होती की सनी देओल लवकरच ‘रामायण’ च्या दुसऱ्या भागाच्या सेटवर पोहोचणार आहेत. कारण रणबीर कपूर आधीपासूनच या चित्रपटावर काम करत आहेत. त्यामुळे लवकरच दोघे मिळून चित्रपटातील एक मोठा सीन पूर्ण करणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, या चित्रपटाचा पहिला भाग सध्या एडिटिंगच्या टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. चित्रपटात मोठ्या प्रमाणावर VFX चा वापर करण्यात आला असल्याने अंतिम रूप देण्यासाठी थोडा वेळ लागणार आहे.

‘Indian Idol’ फेम गायिका सायली कांबळेने जाहीर केले बाळाचे नाव; जाणून घ्या काय आहे नावाचा अर्थ!

मात्र प्रेक्षकांना निर्मात्यांकडून एखादा अपडेट मिळावी अशी अपेक्षा आहे. किमान एखादे पोस्टर किंवा टीझर जरी प्रदर्शित झाले तरी चालेल, असे चाहते म्हणत आहेत. चित्रपटाची घोषणा होऊन बराच काळ लोटला असला तरी अद्याप कोणतीही अधिकृत अपडेट समोर आलेली नाही आहे. त्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर अशी चर्चा सुरू आहे की ‘रामायण’ हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार नाही आहे. मात्र यामागचं नेमकं कारण काय आहे, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. तसेच, निर्मात्यांकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसल्यामुळे आम्ही या बातमीची पुष्टी करत नाही. तरीही सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांमुळे या विषयावर मोठी चर्चा रंगू लागली आहे. या बातमीमुळे अनेक चाहत्यांमध्ये निराशा आणि चिंता व्यक्त होताना दिसत आहे.

Web Title: Is ramayan not releasing in diwali 2026 postponed rumours ranbir kapoor yash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Ramayana

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.