Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dragon Movie : ‘हा आजवरचा सर्वोत्तम देशभक्तीपर चित्रपट ठरेल’; Jr. NTR च्या ‘ड्रॅगन’बाबत दिग्दर्शक प्रशांत नील यांचं वक्तव्य

भारतीय सिनेमातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेला चित्रपट म्हणजे ‘ड्रॅगन’. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून तो चांगलाच चर्चेत आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात ‘मॅन ऑफ द मासेस’ Jr. NTR आणि देशातील आघाडीचे दिग्दर्शक Prashanth Neel एकत्र येणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 21, 2026 | 04:05 PM
फोटो सौजन्य : सोशल मीडिया

फोटो सौजन्य : सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

Dragon Movie: चित्रपटांचं वेड भारतीय सिनेसृष्टीला पहिल्यापासूनच आहे. त्यात जर तो साऊथ सिनेमा असेल तर मग त्याची स्टोरी आणि त्याची अॅक्शन यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता जास्तच वाढलेली असते. आताही भारतीय सिनेमातील सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेला चित्रपट म्हणजे ‘ड्रॅगन’. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून तो चांगलाच चर्चेत आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटात ‘मॅन ऑफ द मासेस’ Jr. NTR आणि देशातील आघाडीचे दिग्दर्शक Prashanth Neel एकत्र येणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या दोघांची जोडी उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव देण्यार इतकं मात्र नक्की. मोठ्या प्रमाणावर तयार होत असलेला हा चित्रपट आपल्या दमदार कथानक आणि जबरदस्त अॅक्शनमुळे सिनेमाचा अनुभव एका नव्या उंचीवर नेणार आहे.

जलवा… Cannes मध्ये Jacqueline Fernandezs च्या फॅशनची जादू, ‘या’ वेगळेपणाने वेधलं जगाचं लक्ष

पहिली झलक समोर

या चित्रपटाची पहिली झलक आता समोर आली असून, प्रत्येक फ्रेममध्ये एक भव्य आणि अत्यंत आकर्षक विश्व पाहायला मिळत आहे. ज्यांनी ही झलक पाहिली, ते अक्षरशः थक्क झाले आहेत आणि आता हा चित्रपट आणखी कोणते सरप्राइझ घेऊन येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

सर्वोत्तम देशभक्तीपर चित्रपटांपैकी एक

चित्रपटाच्या पहिल्या झलकबद्दल बोलताना ‘ड्रॅगन’चे दिग्दर्शक Prashanth Neel यांनी चाहत्यांमध्ये निर्माण झालेल्या प्रचंड उत्साहावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले , “आम्ही पहिल्या झलकमध्ये जे काही दाखवलय ते फक्त एक सेटिंग आहे. टीझरमधून आम्ही जो संदेश दिला आहे, चित्रपट त्यापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. जसं मी सांगितले, हे फक्त एक पार्श्वभूमी तयार करण्यासारखे आहे; सोप्या भाषेत सांगायचे तर, हे केवळ खेळाचे मैदान तयार करण्यासारखे आहे. पण या चित्रपटाचे खरे नाट्य म्हणजे आम्ही अशी एक गोष्ट साकारण्याचा प्रयत्न करत आहोत जी कदाचित आजवरच्या सर्वोत्तम देशभक्तीपर चित्रपटांपैकी एक ठरेल.”

सोशल मीडियावर प्रचंड चर्चा

घोषणेनंतरपासूनच या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे आणि चाहते प्रत्येक अपडेटची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटसृष्टीतील दोन मोठी आणि प्रभावशाली नावे एकत्र येत असल्यामुळे ‘ड्रॅगन’ हा सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ठरणे स्वाभाविक आहे. प्रेक्षक मोठ्या पडद्यावर या मेगा सहकार्याची जादू पाहण्यासाठी खूपच उत्सुक आहेत.

Prashanth Neel यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या ‘ड्रॅगन’मध्ये Jr. NTR मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती Mythri Movie Makers आणि NTR Arts यांच्या बॅनरखाली केली जात आहे. हा चित्रपट एकूण पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, ११ जून २०२७ रोजी भव्य स्वरूपात चित्रपटगृहांमध्ये रिलीज करण्याची तयारी सुरू आहे.

दुबईत ‘झाडाला पिकलाय आंबा’ गाण्याची क्रेझ, मराठमोळा संगीतकार सागर पाटिलने रचला इतिहास

Web Title: Jr ntr prashanth neel dragon movie first look best patriotic film release date see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Entertainment News
  • Hindi
  • Marathi News

संबंधित बातम्या

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन
1

Phone Theft Protection: फोन चोरीला गेला तरी चोर करू शकणार नाहीत बंद! ‘हे’ सेटिंग लगेच करा ऑन

ZEE5 वर ‘बंदर’ची एंट्री! २८ ऑगस्टला पाहता येणार समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट
2

ZEE5 वर ‘बंदर’ची एंट्री! २८ ऑगस्टला पाहता येणार समीक्षकांनी गौरवलेला चित्रपट

Amaravati News: अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची चाहूल; दिग्गजांच्या वारसदारांची होणार एंट्री?
3

Amaravati News: अमरावती जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची चाहूल; दिग्गजांच्या वारसदारांची होणार एंट्री?

Generic Medicines Govt App : तब्बल 80 % पर्यंत स्वस्त मिळणार औषधं! क्वॉलिटीची गॅरंटी सरकार घेणार, लगेच डाऊनलोड करा ‘हा’ ॲप
4

Generic Medicines Govt App : तब्बल 80 % पर्यंत स्वस्त मिळणार औषधं! क्वॉलिटीची गॅरंटी सरकार घेणार, लगेच डाऊनलोड करा ‘हा’ ॲप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.