Kajol Bollywood Actress
‘बाजीगर’, ‘कुछ कुछ होता है’, ‘गुप्त’ आणि ‘फना’ यांसारख्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आपल्या ३२ वर्षांच्या व्यावसायिक प्रवासात अभिनेत्री काजोलने अभिनयाच्या अनेक छटा दाखवल्या आहेत. मात्र, यादरम्यान तिच्या कोणत्याही पत्रावर अडथळे आले नाहीत. तसेच, आता ती तिच्या व्यावसायिक प्रवासातील चित्रपट प्रेक्षकांच्या समोर घेऊन येत आहेत ज्यामध्ये ती ॲक्शन अभिनेत्री म्हणून काम करणार आहे.
काजोलचा पहिला अखिल भारतीय चित्रपट ‘महारागानी’ क्वीन ऑफ क्वीन्स तेलुगु दिग्दर्शक चरण तेज उप्पलापतीसोबत करत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला, ज्यामध्ये काजोल एकदम हटके अंदाजात दिसली आहे. तिचा या चित्रपटातील डॅशिंग आणि हटके लुक पाहून चाहत्यांचे लक्ष तिच्याकडे वेधले गेले आहे.
महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली स्त्रीचे पात्र
चित्रपटाचे दिग्दर्शक चरण तेज यांच्या म्हणण्यानुसार, काजोलने चित्रपटाच्या सेटवर येण्यापूर्वी ॲक्शनसाठी योग्य तयारी केली होती. तिच्या कृतीतही भावना दिसत होत्या. या चित्रपटात काजोल मुंबईतील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत वाढलेल्या माया या महिलेची भूमिका साकारणार आहे. जी झोपडपट्टीतून बाहेर पडून महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली महिला बनली आहे. यावर आधारित काजोलचे पात्र आणि भूमिका पाहायला मिळणार आहे.
या चित्रपटाच्या कथेचा मध्यवर्ती विषय म्हणजे मुलांचे त्यांच्या पालकांवरील प्रेम हा असून, हा संदेश चित्रपटाच्या कथेतून प्रेक्षकांपर्येन्त पोहचणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग गेल्या फेब्रुवारीत हैदराबादमध्ये करण्यात आले होते. आता लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
काजोलसह दिसणार हे कलाकार
काजोलसह नसीरुद्दीन शाह, प्रभु देवा आणि जिसू सेनगुप्ता यांच्या या धमाकेदार कलाकारांच्या मुख्यभूमिका पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट अनके भाषेमध्ये प्रदर्शित होणार असून हिंदीतही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हिंदीसोबतच तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेतही हा चित्रपट प्रदर्शित करण्याची योजना आहे. या चित्रपटाच्या अंतिम शेड्यूलचे शूटिंग लवकरच मुंबईत सुरू होणार आहे