(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘कुली’ चित्रपटाचे एकूण कलेक्शन?
सॅकनिल्कच्या अहवालानुसार, रजनीकांतच्या ‘कुली’ ने तिसऱ्या दिवशी ३८.५० कोटींची कमाई केली आहे. रजनीकांतच्या या चित्रपटाची तमिळ भाषेत ऑक्यूपेंसी ६५.९९% होती. तर सकाळचा शो ४६.५१%, दुपारचा शो ६६.८४%, संध्याकाळचा शो ७०.९०% आणि रात्रीचा शो ७९.७१% होता. या चित्रपटाने फक्त तीन दिवसांत १५८.२५ कोटींची कमाई केली आहे. ७४ वर्षांच्या वयातही रजनीकांतची रेकॉर्डब्रेक ओपनिंग पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहे. चित्रपटामधील रजनीकांत यांची ॲक्शन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
‘वॉर २’ चे एकूण कलेक्शन ?
दुसरीकडे, जर आपण आकडेवारी पाहिली तर, हृतिक रोशनचा ‘वॉर २’ रजनीकांतच्या चित्रपटापेक्षा मागे पडला आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ३३ कोटींची कमाई केली आहे. त्याची हिंदी ऑक्यूपेंसी ३१.४२% होती. सकाळचे शो १६.२७%, दुपारचे शो ३४.६०%, संध्याकाळचे शो ३८.८१% आणि रात्रीचे शो ३५.९९% होते. चित्रपटाने आतापर्यंत १४२.३५ कोटींची कमाई केली आहे. ‘वॉर २’ चित्रपट देखील प्रेक्षकांना आवडत आहे. परंतु, या चित्रपटाला हवा तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळत नाही आहे.
दोन्ही चित्रपटांमधील कलाकार
प्रेक्षक दोन्ही चित्रपटांची बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. रजनीकांत यांना बऱ्याच काळानंतर पडद्यावर पाहून चाहते खूप आनंदी झाले आहेत. चित्रपटातील कलाकारांबद्दल बोलायचे झाले तर, रजनीकांत यांच्या ‘कुली’ चित्रपटामध्ये श्रुती हासन, नागार्जुन अक्किनेनी आणि आमिर खान मुख्य भूमिकेत दिसत आहेत. तसेच, हृतिक रोशनच्या ‘वॉर २’ मध्ये हृतिकसोबत कियारा अडवाणी आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत काम करताना दिसले आहेत.






