(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्टचा ‘जिगरा’ चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. ‘जिगरा’ चित्रपटात आलिया भट्टशिवाय वेदांग रैना आणि मनोज यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 4.55 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, कंगना रणौतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यूजर्स ही पोस्ट आलिया भट्टच्या ‘जिगरा’ चित्रपटाच्या कमाईशी जोडून पाहत आहेत. कंगना रणौतने सोशल मीडियावर काय पोस्ट केले आहे ते जाणून घेऊयात.
कंगना रणौतने कोणाचेही नाव घेतले नाही
आलिया भट्टचा ‘जिगरा’ हा चित्रपट 11 ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल झाला. करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 4.55 कोटींची कमाई केली आहे. दरम्यान, कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने पोस्टमध्ये लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही महिला केंद्रित चित्रपटांना उद्ध्वस्त करता आणि ते काम करू शकत नाहीत असे ठरवता, तेव्हा ते कमावण्यास सक्षम नसतात, तुम्ही स्वत: ते बनवले असले तरीही. पुन्हा वाचा. धन्यवाद.’ असे लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे. कंगना रणौतने तिच्या पोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नसून ते आलिया भट्टच्या ‘जिगरा’ चित्रपटाच्या कमी कलेक्शनशी जोडले जात आहे.

हे देखील वाचा- Bigg Boss 18 : घरात होणार आज शिल्पा आणि अविनाशमध्ये राडा! सलमान कोणावर साधणार निशाणा
‘जिगरा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर
वासन बाला दिग्दर्शित आलिया भट्टच्या ‘जिगरा’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी यांच्या ‘विकी विद्या का वो वाला व्हिडिओ’सोबत टक्कर झाली आहे. आलिया भट्टच्या ‘जिगरा’ या चित्रपटावर बॉक्स ऑफिसच्या क्लॅशचा परिणाम झाला आहे. आता सणासुदीचा कितपत फायदा उठवता येतो हे पाहायचे आहे. कंगना रणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती ‘इमर्जन्सी’ चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होणार होता पण CBFC कडून प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे. कंगना रणौतच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची नवीन रिलीज डेट अद्याप समोर आलेली नाही.






