
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
रिअॅलिटी शो ‘लॉक अप 2’मध्ये अभिनेता राम कपूर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शो सुरू झाल्यापासून त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि स्पर्धकांशी असलेल्या वागणुकीमुळे तो सतत चर्चेचा विषय ठरत आहे. आता शोच्या नव्या प्रोमोमध्ये अभिनेत्री कंगना रनौतने राम कपूरची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे पाहायला मिळत आहे.
‘लॉक अप’च्या पहिल्या पर्वाचे सूत्रसंचालन करणारी कंगना रनौत दुसऱ्या सीझनच्या पाचव्या भागात विशेष पाहुणी म्हणून दिसणार आहे. नुकताच समोर आलेल्या प्रोमोमध्ये ती स्पर्धकांच्या खेळाचा आढावा घेताना राम कपूरवर थेट निशाणा साधताना दिसते.
कंगना राम कपूरला म्हणते, “राम, जर तुला वाटत असेल की हा खेळ गंभीरपणे घ्यायचा नाही किंवा तू या तुरुंगासाठी खूप मोठा आहेस, तर तू या शोमध्ये आलासच का? तुझा उद्धटपणा दाखवण्यासाठी?”
यावर राम कपूर उत्तर देत म्हणतो, “योग्य वेळ आल्यावर मी माझं सत्य सर्वांसमोर मांडेन आणि ते इथल्या इतर कोणापेक्षाही चांगल्या पद्धतीने सांगू शकेन.”
रामचं उत्तर ऐकल्यानंतर कंगना त्याला पुन्हा सुनावते. “जर तुला स्वतःमध्ये सुधारणा करायची असेल, तर स्वतःचा बचाव करणं थांबव,” असा सल्लाही ती त्याला देते. या संवादामुळे आगामी भागाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
दरम्यान, प्रोमोमध्ये आणखी एक मोठा ट्विस्टही पाहायला मिळतो. होस्ट रितेश देशमुख स्पर्धक आकांक्षा चमोला हिला तिच्या उरलेल्या लाईफलाईन्सबद्दल सांगतो. त्यावेळी तिचं आणखी एक गुपित समोर आल्याचं उघड होतं. स्पर्धक श्रेया कालरा हिने आकांक्षा उभयलिंगी (Bisexual) असल्याचं गुपित उघड केल्याचंही प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे.
Kangana literally giving Salman Khan vibes 🔥🔥🔥
What aura man 😇🙌 She owns this show like no one else !! Ram Kapoor n Dheeraj Dhooper buckle 🆙
Come up as main leads of #Lockupp #KanganaRanaut #RamKapoor #DheerajDhoopar #Lockupp2 pic.twitter.com/E4JtCiRvNi — TINCHI (@AartiM18) July 1, 2026
याआधीच्या एका भागात राम कपूर यांनी वैवाहिक नातेसंबंध आणि फसवणुकीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली होती. “जर जोडीदारावर खरं प्रेम असेल, तर नातं टिकून राहतं. कधी कधी नकळत चुका होतात, पण काळ सर्व जखमा भरून काढतो,” असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरही प्रेक्षक आणि सहस्पर्धकांमध्ये मतभेद पाहायला मिळाले.