Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साऊथ अभिनेता संतोष बलराज यांचे वयाच्या ३४ व्या वर्षी निधन, ‘या’ गंभीर आजारामुळे झाला मृत्यू

कन्नड अभिनेता संतोष बलराज यांचे वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी निधन झाले आहे. असे म्हटले जात आहे की अभिनेत्याचा मृत्यू कावीळमुळे झाला आहे. त्यांच्या या बातमीने चाहते आणि कलाकार दुःख व्यक्त करत आहेत.

  • By सायली ससाणे
Updated On: Aug 05, 2025 | 03:20 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • कन्नड अभिनेता संतोष बलराजचे निधन
  • कावीळमुळे झाला अभिनेत्याचा मृत्यू
  • कन्नड चित्रपटसृष्टीसाठी मोठे नुकसान
दक्षिण चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का बसला आहे. सुपरस्टार प्रेम नजीर यांचा मुलगा आणि अभिनेता शानवास कलाभवन नवस यांच्या निधनानंतर आता कन्नड अभिनेता संतोष बलराज यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध निर्माते आणिकल बलराज यांचा मुलगा आणि कन्नड अभिनेता संतोष बलराज यांचे वयाच्या ३४ व्या वर्षी एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. असे म्हटले जात आहे की अभिनेत्याचा मृत्यू कावीळ आजरामुळे झाला. आता अभिनेत्याच्या निधनावर चाहते दुःख व्यक्त करत आहेत.

कावीळमुळे झाला अभिनेत्याचा मृत्यू
काही काळापूर्वी संतोष बलराज यांना कावीळ झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला त्यांची प्रकृती ठीक वाटत होती, परंतु काही दिवसांनी त्यांची प्रकृती झपाट्याने बिघडली. या गंभीर आजाराने त्यांचा जीव घेतला आणि हा तरुण अभिनेत्याने कायमचा या जगाचा निरोप घेत अखेरचा श्वास सोडला. संतोष यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत प्रामुख्याने कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांना तसेच कन्नड चित्रपट जगताला खूप दुःख झाले आहे.

‘ही वर्दी फक्त धैर्यच नाही तर त्याग देखील मागते…’; फरहान अख्तरच्या ‘120 Bahadur’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित!

संतोष बलराज यांचा चित्रपट प्रवास आणि कामगिरी
संतोषने २००९ मध्ये ‘केम्पा’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात त्याने अविनाश, रुचिता प्रसाद आणि प्रदीप सिंह रावत यांसारख्या कलाकारांसोबत काम केले. त्यांचा दुसरा चित्रपट ‘करिया २’ होता, जो त्यांचे वडील अनेकल बलराज यांनी संतोष एंटरप्रायझेसच्या बॅनरखाली तयार केलेला हा चित्रपट होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. ‘करिया २’ मध्ये अजय घोष, मयुरी क्याटारी, साधू कोकिला आणि नागेश कार्तिक यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

संतोषच्या लोकप्रिय चित्रपटांमध्ये २०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘गणपा’ आणि २०२४ मध्ये नुकताच प्रदर्शित झालेला ‘सत्यम’ यांचा समावेश आहे. याशिवाय, तो सुमंत क्रांतीच्या ‘बर्कले’ चित्रपटातही दिसला, ज्यामध्ये चरण राज, सिमरन नाटेकर आणि राजा बलवाडी सारखे कलाकार होते.

हॉलिवूड रॅपर सोल्जा बॉयला अटक, बेकायदेशीर शस्त्रे बाळगल्याचा आरोप; याआधीही भोगला होता तुरुंगवास

गेल्या वर्षी वडिलांचे निधन झाले
संतोषचे वडील, प्रसिद्ध निर्माते अनेकल बलराज यांचेही गेल्या वर्षी बेंगळुरूमध्ये एका रस्ते अपघातात निधन झाले. ‘करिया’, ‘करिया २’ आणि ‘जॅकपॉट’ सारख्या चित्रपटांसाठी त्यांना आठवले जाते. संतोष त्याच्या आईसोबत राहत होता आणि त्याने कधीही लग्न केले नाही. आता अभिनेत्याच्या अकाली निधनाने त्याचे कुटुंब आणि इंडस्ट्रीतील लोक खूप दुःखी आहेत. आणि त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

कन्नड चित्रपटसृष्टीसाठी मोठे नुकसान
संतोष बलराजच्या निधनाने कन्नड चित्रपटसृष्टीने एका तरुण प्रतिभेला गमावले आहे. त्याच्या प्रतिभेमुळे आणि अभिनय कौशल्यामुळे त्याला लवकरच मोठी ओळख मिळाली. चाहते आणि चित्रपटसृष्टीतील लोक सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहून त्यांचे स्मरण करत आहेत.

Web Title: Kannada actor santosh balaraj passed away at the age of 34 due to jaundice

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • entertainment
  • Tollywood Actor
  • tollywood movie

संबंधित बातम्या

आई – मुलींच्या नात्यांचा उलगडणार हळवा प्रवास; ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणे प्रदर्शित
1

आई – मुलींच्या नात्यांचा उलगडणार हळवा प्रवास; ‘तिघी’मधील ‘शारदा सरिता’ गाणे प्रदर्शित

बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित ‘रागिनी 3’ची घोषणा; तमन्ना भाटियासोबत झळकणार ‘ही’ संपूर्ण स्टारकास्ट
2

बालाजी मोशन पिक्चर्स निर्मित ‘रागिनी 3’ची घोषणा; तमन्ना भाटियासोबत झळकणार ‘ही’ संपूर्ण स्टारकास्ट

अनिल कपूर-राधिका मदान यांचा ‘लल्ला अँथम’ रिलीज; ‘सूबेदार’ च्या गाण्याला हरभजन सिंहची खास उपस्थिती
3

अनिल कपूर-राधिका मदान यांचा ‘लल्ला अँथम’ रिलीज; ‘सूबेदार’ च्या गाण्याला हरभजन सिंहची खास उपस्थिती

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा
4

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.