Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटातून उलगडणार सासू-सुनेच्या नात्याची नवी गोष्ट

सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये अनेक नवनवीन चित्रपट रिलीज होत आहेत. आता अशातच दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा प्रेक्षकांसाठी नवाकोरा चित्रपट घेऊन आले आहेत ज्याचे नाव आहे ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’.

  • By सायली ससाणे
Updated On: Nov 05, 2025 | 02:36 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:
  • केदार शिंदे घेऊन येणार सासू-सुनेच्या नात्याची गोष्ट
  • ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चे पोस्टर रिलीज
  • ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपट कधी होणार रिलीज?
झी स्टुडिओज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच नवनवीन आशय असलेले दर्जेदार चित्रपट घेऊन येतात. आता झी स्टुडियोज आणि केदार शिंदे असाच एक कमाल चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहेत. ‘बाईपण भारी देवा’च्या तुफानी यशानंतर सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहेत. महिलांच्या मनातल्या भावना, त्यांच्या नात्यांमधला विनोद आणि संवेदना पडद्यावर आणण्यात हातखंडा असलेले केदार शिंदे आता ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा नवाकोरा चित्रपट घेऊन आले आहेत.

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज निर्मित या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित झाले असून येत्या १६ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक केदार शिंदे यांची कन्या सना शिंदे पहिल्यांदाच निर्मितीची धुरा सांभाळणार आहेत. तसेच या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दोन नायिका दिसत आहेत. ज्या पाठमोऱ्या उभ्या आहेत.

”पंडित जी खूप पैसे घेतात..”, पत्नी सुनीता आहुजाचे विधान गोविंदाला पडले भारी, अभिनेत्याने मागितली माफी

पोस्टरमध्ये सासू-सुनेची जोडी पाठमोरी दिसत आहे. आता सासू-सूनेच्या भूमिकेत कोण दिसेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. प्रत्येक घरात,कुटुंबात घडणारी सासू-सुनेच्या नात्याची मजेशीर केमिस्ट्री, हलकीशी चतुराई, जिव्हाळा आणि न संपणारी टोलेबाजी याचे गोड-तिखट चित्रण लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे या चित्रपटाबद्दल म्हणाले, “प्रत्येक घरात सासू-सुनेचं नातं वेगळ्या रंगात दिसतं. कधी हसू, कधी नोकझोक, कधी भांडण तर कधी काळजी आणि प्रेम. प्रत्येकाच्या कुटुंबातील ही दोन वेगळी व्यक्तिमत्त्वं, दोन विचार आणि दोन घर सांभाळणाऱ्या स्त्रियांचं सामर्थ्य या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. तसेच हा चित्रपट माझ्या खूप जवळचा आहे, कारण या चित्रपटाच्या निमित्ताने सनाने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.” असे ते म्हणाले आहेत.

सलमान खान अडकला कायद्याच्या कचाट्यात, पोलिसांनी बजावली नोटीस; नेमकं काय प्रकरण?

झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सूनबाई !काय म्हणताय सासूबाई?’ चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे, उमेश कुमार बन्सल यांची निर्मिती आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांची असून पटकथा वैशाली नाईक यांची आहे. तसेच चित्रपटाचे छायाचित्रण आणि संकलन मयूर हरदास यांनी केले आहे. हा चित्रपट येत्या १६ जानेवारी पासून संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 

 

Web Title: Kedar shinde upcoming marathi movie aga aga sunbai kay mhanta sasubai releasing 16th january

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2025 | 02:36 PM

Topics:  

  • entertainment
  • kedar shinde
  • marathi film

संबंधित बातम्या

२०२६ मध्ये ‘Dhurandhar’चा डबल धमाका! अक्षय खन्नाशिवाय ‘हा’ चित्रपट घालणार धुमाकूळ, बनवेल २०२५ पेक्षा मोठा रेकॉर्ड
1

२०२६ मध्ये ‘Dhurandhar’चा डबल धमाका! अक्षय खन्नाशिवाय ‘हा’ चित्रपट घालणार धुमाकूळ, बनवेल २०२५ पेक्षा मोठा रेकॉर्ड

‘पप्पा तुम्ही घाणेरडं काम करता..’, वडिलांच्या खलनायकाच्या भूमिकेमुळे चिडली मुलगी; बाबांना सुनावले खडे बोल
2

‘पप्पा तुम्ही घाणेरडं काम करता..’, वडिलांच्या खलनायकाच्या भूमिकेमुळे चिडली मुलगी; बाबांना सुनावले खडे बोल

यशच्या ‘Toxic’ चित्रपटातील कियारा अडवाणीची दिसली पहिली झलक; चाहते पाहून चकीत, म्हणाले ‘ओळखणेही कठीण..’
3

यशच्या ‘Toxic’ चित्रपटातील कियारा अडवाणीची दिसली पहिली झलक; चाहते पाहून चकीत, म्हणाले ‘ओळखणेही कठीण..’

Govinda Birthday: चित्रपट बनवून वडील झाले कंगाल, गरिबीतून जन्माला आला ‘हा’ सुपरस्टार; आता बॉलीवूडचा ‘Hero No 1’
4

Govinda Birthday: चित्रपट बनवून वडील झाले कंगाल, गरिबीतून जन्माला आला ‘हा’ सुपरस्टार; आता बॉलीवूडचा ‘Hero No 1’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.