Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aamir Khan Lagaan: ऑस्करपर्यंत मजल मारणाऱ्या ‘लगान’च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टपाल विभागाकडून गौरव

भारतीय चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेल्या 'लगान' चित्रपटाला आणि आमिर खान प्रॉडक्शन्सला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त इंडिया पोस्टने ऐतिहासिक सन्मान दिला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 30, 2026 | 07:05 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘लगान’सारख्या ऐतिहासिक चित्रपटातून प्रवासाची सुरुवात करून आजवर दर्जेदार सिनेमाई अनुभव देत, आमिर खान प्रॉडक्शन्सने अशा कथांची परंपरा निर्माण केली आहे, जिने भारतीय सिनेमात यशाचे नवे मापदंड स्थापित केले आहेत.

Extra Marital Affairs: एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या मुद्द्यावर रंगला वाद, राम कपूरचं वक्तव्य चर्चेत; आकांक्षाने केली कानउघाडणी

भारतीय सिनेमात वेगळी परंपरा

आमिर खान प्रॉडक्शन्सने चित्रपटसृष्टीतील आपल्या प्रवासाची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. या प्रवासाची सुरुवात २५ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘लगान’ या चित्रपटातून झाली होती. या बॅनरने नेहमीच आशयघन कथा आणि काळाच्या कसोटीवर टिकून राहिलेल्या अविस्मरणीय चित्रपटांना प्राधान्य दिले असून, भारतीय सिनेमात एक वेगळी आणि भक्कम परंपरा निर्माण केली आहे. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ने नुकतीच आपल्या प्रदर्शित होण्याची २५ वर्षे पूर्ण केली आहेत. ‘लगान’ हा केवळ ब्लॉकबस्टर चित्रपट नव्हता, तर आपल्या प्रभावी कथानक, दमदार अभिनय आणि देशभक्ती तसेच एकजुटीच्या प्रेरणादायी भावनेमुळे तो भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

लगानचा इंडिया पोस्टकडून सन्मान

या ऐतिहासिक यशाचा उत्सव अजूनही सुरू असतानाच आमिर खान प्रॉडक्शन्सला आणखी एक प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे. ‘लगान’च्या २५ वर्षपूर्तीनिमित्त इंडिया पोस्ट (भारतीय टपाल विभाग)ने चित्रपटाच्या सन्मानार्थ विशेष स्मरणिका कव्हर (Special Commemorative Cover) आणि स्पेशल कॅन्सलेशन जारी केले आहे. भारतीय सिनेमावर ‘लगान’ने उमटवलेल्या अमिट ठशाला आणि त्याच्या महत्त्वपूर्ण योगदानाला दिलेली ही एक अनोखी मानवंदना आहे.

मैलाचा दगड म्हणून आपले स्थान

‘लगान’ हा भारतीय सिनेमातील सर्वाधिक लोकप्रिय आणि ऐतिहासिक चित्रपटांपैकी एक मानला जातो. या चित्रपटाचे अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शन झाले असून, समीक्षकांनी त्याचे भरभरून कौतुक केले. तसेच, ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ या श्रेणीतील ऑस्कर नामांकन मिळवणारा तो तिसरा आणि आजपर्यंतचा शेवटचा भारतीय चित्रपट ठरला. भारतातही या चित्रपटाने प्रचंड यश मिळवले. ४९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट लोकप्रिय मनोरंजनप्रधान चित्रपट’ (Best Popular Film Providing Wholesome Entertainment) यासह एकूण आठ पुरस्कार पटकावत ‘लगान’ने भारतीय सिनेमातील मैलाचा दगड म्हणून आपले स्थान कायम केले.

या चित्रपटात आमिर खान, ग्रेसी सिंह, रेचल शेली, पॉल ब्लॅकथॉर्न, सुहासिनी मुले, कुलभूषण खरबंदा, राजेंद्र गुप्ता, रघुवीर यादव, आदित्य लाखिया, यशपाल शर्मा आणि अमीन हाजी यांसारख्या अनेक उत्कृष्ट कलाकारांची दमदार फळी होती. याशिवाय, ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेल्या या चित्रपटातील ‘घनन घनन’, ‘मितवा’, ‘राधा कैसे ना जले’ आणि ‘ओ रे छोरी’ ही सदाबहार गीते आजही रसिकांच्या मनात तितकीच अजरामर आहेत.

Ab Hoga Hisab Season 2 चा ट्रेलर प्रदर्शित! प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद, अपेक्षेपेक्षाही लवकर दुसऱ्या सीझनसह परत

Web Title: Lagaan movie 25 years india post special commemorative cover aamir khan see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 07:05 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • entertainment
  • Entertainment Awards
  • Entertainment News

संबंधित बातम्या

Govinda: ‘स्वतःच्या मर्यादेत रहा…’ गोविंदाचा सुनिता अहुजावर पलटवार, ‘Sugar Daddy’ टोमण्यावर भडकला
1

Govinda: ‘स्वतःच्या मर्यादेत रहा…’ गोविंदाचा सुनिता अहुजावर पलटवार, ‘Sugar Daddy’ टोमण्यावर भडकला

Awarapan 2: पहिल्याच दिवशी इम्रान हाश्मीच्या चित्रपटाने केली 4 पट कमाई, सनी देओलचा ‘बंटवारा 1947’ पडला मागे
2

Awarapan 2: पहिल्याच दिवशी इम्रान हाश्मीच्या चित्रपटाने केली 4 पट कमाई, सनी देओलचा ‘बंटवारा 1947’ पडला मागे

Govinda Affair: ‘मुलीच्या वयाची, थोडी तरी लाज बाळग…’ बायको सुनीता भडकली, गोविंदावर ओढले ताशेरे
3

Govinda Affair: ‘मुलीच्या वयाची, थोडी तरी लाज बाळग…’ बायको सुनीता भडकली, गोविंदावर ओढले ताशेरे

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक
4

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.