(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
शब्दलावण्य, भावलावण्य यांचा मिलाप साधत घडणारा देखणा कलाविष्कार म्हणजे लावणी. या आविष्काराला वेगळं रूप देत आपली संस्कृती, परंपरा जपण्याचा प्रयत्न होणे हे कौतुकास्पदच आहे. आणि याचाच प्रयत्न लावणीकिंग आशिष पाटील Ashish Patil हे करत आहेत. आणि त्यांच्या प्रयत्नांना यश देखील प्राप्त होत आहे. ‘लावणी किंग’ म्हणून प्रसिद्ध असलेला लोकप्रिय कोरिओग्राफर आशिष पाटील लावणीला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. कलेच्या माध्यमातून रसिकांच मनोरंजन करताना नृत्यसंस्कृती जपली जावी या उद्देशाने ‘सुंदरी’ The history of Lavani या नव्या शोची संकल्पना आणून आशिष पाटीलने ती यशस्वी केली आहे. आणि आता लवकरच याची जादू परदेशात देखील पसरणार आहे.
Ranveer Allahbadia: ‘लोकांना विचार करायला भाग पाडले…’, वादग्रस्त टिप्पणीवर का संतापले जावेद जाफरी?
मुंबईत ‘सुंदरी’ The history of Lavani शोला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादानंतर आता ‘सुंदरी’ या शोचा नजराणा जुलै महिन्यात अमेरिकेत रंगणार आहे. या बातमीने चाहत्यांना खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री, नृत्यांगना अमृता खानविलकर आणि आशिष पाटील या दोघांच्या अदाकारीने ही नृत्य मैफिल सजणार आहे. लय- तालाचा आविष्कार, रंगमंचीय सहजता, आत्मविश्वास या सर्व गोष्टींच्या जोरावर विलोभनीय नृत्याविष्काराचे दर्शन ‘सुंदरी’ या शोमधून घडविले जाणार आहे. ताल, सौंदर्य उलगडत रसिकांसमोर झालेले हे सादरीकरण आणि त्याचा आस्वाद आता अमेरिकेतील कलाप्रेमींना जुलैमध्ये घेता येणार आहे. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होणार आहे.
Prajakta Mali: ‘फुलवंती’च्या आयुष्यातील क्षण आणखी फुलले; चित्रपटाने पटकावले ६ पुरस्कार!
लोकप्रिय संगीतातून आणि तितक्याच उत्कृष्ट नृत्याविष्कारातून, भावभावना आणि उत्तम कलेचे सादरीकरण लावणीकिंग आशिष पाटील प्रेक्षकांपर्येन्त पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे. ‘सुंदरी’ The history of Lavani (अदा ताल शृंगार) हा अविस्मरणीय कार्यक्रम मनाचा ठाव घेतो, अशा शब्दांत रसिकांनी आणि मान्यवरांनी त्याचे कौतुक केले आहे. ‘सुंदरी’ या शोच्या माध्यमातून आशिष पाटील यांचे एक स्वप्न पूर्ण झाले असे देखील म्हटले आहे.