(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
‘फुलवंती’ चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रामध्ये पाऊल ठेवले. आणि तिच्या चित्रपटाला भरपूर यश मिळाले. तिच्या या चित्रपटाची सध्या खूप चर्चा सुरु आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या ‘फुलवंती’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर उत्तम कमाई केली. आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केले. प्राजक्ता माळीसाठी नवीन वर्षदेखील खास ठरले आहे. ‘झी चित्र गौरव २०२५’ या पुरस्कार सोहळ्यात ‘फुलवंती’ चित्रपटाला सहा पुरस्कार मिळाले आहेत. अभिनेत्री प्राजक्ताने याविषयी खास पोस्ट शेअर करून चित्रपटाबाबत आनंद व्यक्त केला आहे.
चित्रपटाला मिळाले हे पुरस्कार
अभिनेत्री प्राजक्ता माळीने आनंद व्यक्त करत ही एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, फुलवंतीच्या आयूष्यातील क्षण आणखी फुलायला लागले. काल पार पडलेल्या “झी चित्र गौरव २०२५” कार्यक्रमात ‘फुलवंती’ला ६ पारितोषिकं मिळाली आहेत.’ तसेच या ‘फुलवंती’ चित्रपटाने झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट छायाचित्रण (महेश लिमये), सर्वोत्कृष्ट गायिका (वैशाली माढे), सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन (उमेश जाधव), सर्वेश वेशभूषा (मानसी अत्तरदे) आणि सर्वोत्कृष्ट रंगभूषा (महेश बराटे) असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यांसह अभिनेत्री प्राजक्ता माळीला द मोस्ट नॅच्युरल परफॉर्मेंस ऑफ द ईयर हा पुरस्कार मिळाला आहे. असे ६ पुरस्कार मिळवून ‘फुलवंती’ने अव्वल स्थान मिळवले आहे.
रणवीर अलाहाबादिया प्रकरणात ध्रुव राठीची जबरदस्त एंट्री, व्हिडिओ शेअर करून दिला ‘हा’ सल्ला!
प्राजक्ताने ही पोस्ट शेअर करत फुलवंती चित्रपटासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले आहेत. या सोशल मीडिया पोस्टनंतर अनेकांनी अभिनेत्रीच अभिनंदन करून कौतुक केले आहे. ‘फुलवंती’ चित्रपटाविषयी सांगायचं तर या चित्रपटाची कथा पेशव्यांच्या काळात ‘फुलवंती’ नावाची नर्तिका आणि पंडीत व्यंकटशास्त्री यांची कथा दाखवण्यात आली आहे. सिनेमातील सेट्स, गाणी, नृत्य या सगळ्याचं खूप कौतुक झाले आहे. विशेषतः या चित्रपटातली गाणी खूप लोकप्रिय झाली. प्रविण विठ्ठल तरडेने या चित्रपटाचे संवाद लिहिले असून स्नेहल तरडेने दिग्दर्शन केले आहे. महेश लिमये यांनी छायाचित्रण केले आहे. अविनाश- विश्वजीत यांनी संगीत दिग्दर्शन केले.
Ranveer Allahbadia: ‘लोकांना विचार करायला भाग पाडले…’, वादग्रस्त टिप्पणीवर का संतापले जावेद जाफरी?
श्वेता माळी, प्राजक्ता माळी, कुमार पाठक, अभिषेक पाठक, मंगेश पवार या सगळ्यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात फुलवंतीची मुख्य भूमिका प्राजक्ता माळीने साकारली आहे. तर गश्मीर महाजनींनी व्यंकटशास्त्रींची भूमिका साकारली आहे. बाबासाहेब पुरंदरे यांनी ‘फुलवंती’ नावाची कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाला भरपूर प्रशंसा मिळाली आहे.