(फोटो सौजन्य - x अकाउंट)
समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोवरील वादानंतर, अनेक सेलिब्रिटी भारतातील विनोदाच्या बदलत्या युगाबद्दल आपले विचार मांडत आहेत. या विषयावर अभिनेता जावेद जाफरी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, खरा मुद्दा हा नाही की लोक कोणत्या प्रकारचे विनोद ऐकत आहेत, तर खरा मुद्दा हा आहे की अशा बाबींचे राजकारण कसे केले जात आहे. ते म्हणाले की बरेच लोक खूप संवेदनशील असतात, परंतु सर्वांबद्दल असेच म्हणता येणार नाही.
लोकांना विचार करायला लावले जात आहे
ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी बोलताना ते म्हणाले, “हे लोकांबद्दल नाही, तर राजकारणाबद्दल आहे.” ते म्हणाले, ‘लोक अशा बाबींवर जास्त विचार करत नाहीत, उलट लोकांना विचार करण्यास भाग पाडले जाते.’ समाजात अशा काही गोष्टी घडत आहेत ज्या चांगल्या नाहीत. मी याच्याशी सहमत नाही. असं अभिनेत्याने या मुखातील म्हटले आहे.
आवाज करणाऱ्यांचा आवाज येतोच
जावेद जाफरी म्हणाले की, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे, परंतु अनावश्यक गोष्टींकडे लक्ष दिले जात आहे. नाव बदलण्यापेक्षाही अनेक बाबी महत्त्वाच्या आहेत, गोष्टींची स्थिती बदलली पाहिजे, त्यांची नावे नाही. नावात काही नाही, कामात काही नाही. एक विशिष्ट वर्ग आहे जो खूप आवाज करताना दिसला आणि त्यांचाच आवाज लोकांना गेला.’ पुढे अभिनेता म्हणाला की, ‘जर १० लोक आवाज करत असतील आणि १००० लोक बसले असतील तर त्या १० लोकांना आवाज ऐकू जाणार आणि बाकीच्यांना नाही.’ असे ते म्हणाले आहेत.
रणवीर अलाहाबादिया प्रकरणात ध्रुव राठीची जबरदस्त एंट्री, व्हिडिओ शेअर करून दिला ‘हा’ सल्ला!
संपूर्ण प्रकरण काय आहे?
रणवीर अलाहाबादियाचा वाद त्याने समय रैनाच्या शोमध्ये वादग्रस्त टिप्पण्या केल्याने सुरू झाला आहे. शोमध्ये रणवीर अलाहबादियाने एका स्पर्धकाच्या पालकांबद्दल खोटे विधान केले. यानंतर रणवीर आणि समय यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी बोलावले. रणवीर अलाहबादियाने लोकांची माफी मागितली आहे, तर समय रैनाने त्याच्या शोचे सर्व भाग डिलीट केले आहेत.