Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाहरुखच्या ‘किंग’ला ‘लव्ह अँड वॉर’ देणार टक्कर, चित्रपटाची रिलीज डेट झाली जाहीर!

संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट लव्ह अँड वॉरची रिलीज डेट जाहीर झाली आहे. या चित्रपटात आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या तिघांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चित्रपटासाठी तुम्हाला थोडा वेळ वाट पाहावी लागणार आहे. कारण हा चित्रपट २०२६ रोजी रिलीज होणार असल्याचे समजले आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Sep 14, 2024 | 12:49 PM
(फोटो सौजन्य-Social Media)

(फोटो सौजन्य-Social Media)

Follow Us
Close
Follow Us:

संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून या चित्रपटाबाबत चर्चा सुरू झाली आहे. कारण, या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. विकी कौशलने आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांसोबत काम केले आहे. राझीमध्ये विकी कौशल आलियासोबत मुख्य भूमिकेत दिसला होता, तर संजू चित्रपटात तो रणबीरचा चांगला मित्र बनला होता. मात्र, हे त्रिकूट पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहे. या तिघांचेही चाहते त्यांना पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. आता या सिनेमाची रिलीज डेटही समोर आली आहे.

‘लव्ह अँड वॉर’ रिलीज डेट केली जाहीर
संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला लव्ह अँड वॉर हा चित्रपट चित्रपटगृहात पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे, कारण हा चित्रपट या वर्षी किंवा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार नाही. या चित्रपटाची रिलीज डेट 2026 मध्ये निश्चित करण्यात आली आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांच्या मते, भन्साळींचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट 20 मार्च 2026 रोजी चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

रामायणनंतर रणबीर लव्ह अँड वॉरमध्ये सहभागी होणार आहे
काही काळापूर्वी एक बातमी समोर आली होती, ज्यामध्ये नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण चित्रपटाचे ९० टक्के शूटिंग पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले होते. रामायणमधील रणबीर कपूर त्याच्या भागाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर लव्ह अँड वॉरच्या शूटिंगमध्ये सामील होणार आहे. त्याचबरोबर आलिया आणि विकी आपापल्या प्रोजेक्टचे काम पूर्ण करून भन्साळींच्या चित्रपटाची तयारी करणार आहे.

हे देखील वाचा- शाहरुख खानने केली सलमानची कॉपी? 2026 ची ईद भाईजान नव्हे तर किंगच्या नावावर!

शाहरुखसोबत टक्कर होणार आहे
ज्या दिवशी लव्ह अँड वॉर रिलीज होत आहे त्यादिवशी ईद असणार आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा आगामी चित्रपट किंग देखील ईदला रिलीज होत आहे. या चित्रपटात सुहाना खान दिसणार आहे. अशा परिस्थितीत, जर ही बातमी खरी ठरली तर शाहरुखच्या चित्रपटामुळे ‘लव्ह अँड वॉर’ वर पडदा पडू शकतो.

Web Title: Love and war and shahrukh khans king movie will release on the same day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2024 | 12:49 PM

Topics:  

  • ranbir kapoor
  • Sanjay Leela Bhansali
  • shahrukh khan
  • Vicky Kaushal

संबंधित बातम्या

Deepika – Ranbir: बॉलिवूडची आवडती जोडी पु्न्हा चर्चेत, रणबीर- दीपिका एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण
1

Deepika – Ranbir: बॉलिवूडची आवडती जोडी पु्न्हा चर्चेत, रणबीर- दीपिका एकत्र दिसल्याने चर्चांना उधाण

रणवीरकडे 3 व्हॅनिटी वॅन; शाहरुखची वॅन अवाढव्य! पण व्हॅनिटीची किंमत नेमकी असते तरी किती?
2

रणवीरकडे 3 व्हॅनिटी वॅन; शाहरुखची वॅन अवाढव्य! पण व्हॅनिटीची किंमत नेमकी असते तरी किती?

“वाट लागेल… अरे माझे १२ वाजतील, इथे हे सगळं अलाउड नाहीये…” वाढदिवशीच भडकला रणबीर, व्हिडिओ व्हायरल
3

“वाट लागेल… अरे माझे १२ वाजतील, इथे हे सगळं अलाउड नाहीये…” वाढदिवशीच भडकला रणबीर, व्हिडिओ व्हायरल

Ranbir Kapoor Birthday: नेपो कीड अजूनही, रणबीरला करावा लागला संघर्ष; अभिनय कौशल्यने बनला सुपरस्टार
4

Ranbir Kapoor Birthday: नेपो कीड अजूनही, रणबीरला करावा लागला संघर्ष; अभिनय कौशल्यने बनला सुपरस्टार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.