Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Netflix वर रिलीज होताच चर्चेत आला माधुरी दीक्षितचा ‘मां बहन’; डार्क कॉमेडी आणि थ्रिलरचा हटके अनुभव

चित्रपटात माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि धारणा दुर्गा यांच्या प्रमुख भूमिका असून कथानकाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका विधवा आई आणि तिच्या दोन मुलींच्या आयुष्यात शेजाऱ्याचा मृतदेह घरात सापडल्यानंतर मोठी उलथापालथ होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 04, 2026 | 08:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
  • या घटनेनंतर तीनही महिला अडचणींच्या भोवऱ्यात अडकतात.
  • प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नक्कीच ‘मस्ट वॉच’ ठरू शकतो.
OTT प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि Web Series प्रदर्शित होत असतात. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये कोणता नवीन चित्रपट पाहावा याबाबत कायमच उत्सुकता असते. अशातच नेटफ्लिक्सवर ४ जून रोजी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने अल्पावधीतच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. दमदार कथा, रहस्याने भरलेले कथानक आणि कलाकारांचा प्रभावी अभिनय यामुळे हा चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘मोहिनी’मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा, शालिनी-महेंद्रच्या लग्नात येणार विघ्न; प्रतापराव उघड करणार नात्याचं गुपित

सुमारे २ तास ७ मिनिटांच्या कालावधीचा ‘मां बहन’ हा चित्रपट डार्क कॉमेडी आणि थ्रिलर या दोन लोकप्रिय प्रकारांचा संगम आहे. प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच या चित्रपटाबाबत उत्सुकता होती आणि आता रिलीज झाल्यानंतर त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सोशल मीडियापासून चित्रपट समीक्षकांपर्यंत अनेकजण या चित्रपटाचे कौतुक करत आहेत.

या चित्रपटात बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित प्रमुख भूमिकेत झळकत आहे. तिच्यासोबत अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि धारणा दुर्गा महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, त्यांनी रहस्य आणि विनोद यांचा अनोखा मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे.

चित्रपटाची कथा एका विधवा आई आणि तिच्या दोन मुलींभोवती फिरते. शांत आणि साधं आयुष्य जगणाऱ्या या कुटुंबाच्या आयुष्यात अचानक मोठा बदल घडतो. त्यांच्या शेजाऱ्याचा मृतदेह अनपेक्षितपणे त्यांच्या घरातील स्वयंपाकघरात आढळून येतो आणि याच क्षणापासून कथेला वेगळं वळण मिळतं. या घटनेनंतर तीनही महिला अडचणींच्या भोवऱ्यात अडकतात.

मृतदेह लपवण्याचा प्रयत्न करताना त्यांना अनेक अनपेक्षित प्रसंगांना सामोरं जावं लागतं. प्रत्येक टप्प्यावर नवीन रहस्य उलगडत जातं आणि प्रेक्षकांना पुढे काय होणार याची उत्सुकता लागून राहते. थरारक घटनांसोबतच विनोदी प्रसंगही कथेत प्रभावीपणे गुंफण्यात आले आहेत, त्यामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा वाटत नाही.

विशेष म्हणजे हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित राहत नाही. समाजातील काही संवेदनशील विषयांवरही तो भाष्य करतो. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनासोबत विचार करायलाही भाग पाडतो. हीच बाब चित्रपटाला इतर थ्रिलर चित्रपटांपेक्षा वेगळं बनवते. पात्रांबद्दल बोलायचं झाल्यास, माधुरी दीक्षितने ‘रेखा’ ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. तृप्ती डिमरी ‘जया’च्या भूमिकेत तर धारणा दुर्गा ‘सुष्मा’च्या भूमिकेत दिसते. तृप्ती आणि धारणा या दोघी माधुरीच्या मुलींच्या भूमिकेत झळकत असून त्यांच्या अभिनयालाही चांगली दाद मिळत आहे.

कलेक्टर होण्याचं स्वप्न, संघर्षाची साथ, ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये ट्विंकल यादवची दमदार एन्ट्री, अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना

याशिवाय रवी किशन, गीतांजली कुलकर्णी, अरुणोदय सिंह आणि शार्दुल भारद्वाज यांसारखे अनुभवी कलाकारही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे कथेला अधिक बळ मिळाले आहे. रहस्य, विनोद, थरार आणि भावनिक पैलू यांचा समतोल साधणारा ‘मां बहन’ हा चित्रपट सध्या नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरत आहे. वेगळ्या धाटणीचे चित्रपट पाहण्याची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी हा चित्रपट नक्कीच ‘मस्ट वॉच’ ठरू शकतो.

Web Title: Madhuri dixits maa behan sparked a buzz immediately upon its release on netflix

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • madhuri dixit
  • Netflix
  • Netflix India

संबंधित बातम्या

इच्छा पूर्ण करणारे App? OTTवरील या थरारक सीरिजने उडवली प्रेक्षकांची झोप; 8 एपिसोडची ही सस्पेन्सने भरलेली सीरिज पाहिलीत का?
1

इच्छा पूर्ण करणारे App? OTTवरील या थरारक सीरिजने उडवली प्रेक्षकांची झोप; 8 एपिसोडची ही सस्पेन्सने भरलेली सीरिज पाहिलीत का?

शॉपिंग करा अन् Netflix फ्री मिळवा! Flipkart च्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा… या यूजर्सना मिळणार फायदा
2

शॉपिंग करा अन् Netflix फ्री मिळवा! Flipkart च्या नव्या ऑफरची सर्वत्र चर्चा… या यूजर्सना मिळणार फायदा

‘डोला रे डोला’ शूटिंगवेळी माधुरी दीक्षित होती प्रेग्नेंट? अभिनेत्रीचा मोठा खुलासा, चर्चेला पूर्णविराम
3

‘डोला रे डोला’ शूटिंगवेळी माधुरी दीक्षित होती प्रेग्नेंट? अभिनेत्रीचा मोठा खुलासा, चर्चेला पूर्णविराम

Madhuri Dixit Viral Video: AI तंत्रज्ञानाचा गैरवापर; डीपफेकची बळी ठरली माधुरी दीक्षित, व्हायरल व्हिडिओ पाहून चाहते थक्क
4

Madhuri Dixit Viral Video: AI तंत्रज्ञानाचा गैरवापर; डीपफेकची बळी ठरली माधुरी दीक्षित, व्हायरल व्हिडिओ पाहून चाहते थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.