Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्नेहलता वसईकरचा जबरदस्त कमबॅक, ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या नव्या मालिकेत साकारणार दमदार भूमिका

मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकर अनेकदा छोट्या पडद्यावर काम करताना दिसली आहे. तसेच पुन्हा एकदा आता अभिनेत्री मालिकेमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jul 09, 2025 | 05:10 PM
(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

‘सन मराठी’ वाहिनीवर १४ जुलैपासून ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही नवीकोरी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतून पहिल्या नजरेतल्या प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना दिसणार आहे. मालिकेच्या प्रत्येक प्रोमोला प्रेक्षकांनी भरभरून उत्सुक होऊन सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मालिकेत तेजा-वैदही यांच्यासह आणखी एक दमदार भूमिका पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री स्नेहलता वसईकर या मालिकेत ‘माईसाहेब’ भूमिकेत नव्या पात्रासह प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा राहत्या घरी विचित्र अवस्थेत आढळला मृतदेह, ३ आठवड्यानंतर झाला खुलासा

या नव्या भूमिकेबद्दल स्नेहलता म्हणाली की, “‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं या नव्या मालिकेत मी माईसाहेब ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे. माईसाहेब ही मुलावर नितांत प्रेम करणारी, राजकारणातील डावपेच खेळणारी, कर्तबगार, गावाची तारणहार आहे. या भूमिकेमध्ये अश्या बऱ्याच छटा दाखवण्यात आल्या आहेत. माझ्या वयापेक्षा जास्त वय असलेली ही भूमिका आहे. यापूर्वी मी स्वतःशी ठरवलं होतं की, आपल्या वयापेक्षा मोठी व्यक्तिरेखा आपण साकारायची नाही. वयापेक्षा मोठं पात्र साकारताना तारेवरची कसरत असते. कायम अलर्ट राहावं लागत. पण मी माईसाहेब या पात्राच्या प्रेमात पडले आणि मला नेहमीच चॅलेंजिंग भूमिका साकारायला आवडतात. मालिकेचे दिग्दर्शक विनोद लवेकर यांनी जेव्हा मला या भूमिकेबद्दल सांगितलं त्या क्षणी मी भूमिकेसाठी तयार झाले.”

 

काय सांगता! बेबो ४४ व्या वर्षी तिसऱ्यांदा आई होणार? करीनाचे मोनोकिनी लूकमधील फोटो चर्चेत

यापुढे स्नेहलता म्हणाली की, “मुख्यतः या भूमिकेचा लूक खूप खास आहे. मला या नव्या लूकमध्ये प्रेक्षक ओळखूच शकत नाही. नाशिकमध्ये या मालिकेचं शूटिंग सुरू आहे. याआधी मुंबईत शूटिंग करत असताना घराकडे लक्ष देता यायचं, पण आता मुंबई-नाशिक असा प्रवास सुरु झाला आहे. माझी मुलगी शौर्या आता १२ वर्षांची आहे. जेव्हा मी या नव्या भूमिकेविषयी तिच्याशी बोलले, तेव्हा तिने मला खूपच सकारात्मक ऊर्जा दिली. ती म्हणाली, “मम्मा तुला खतरनाक रोल करायला मिळतोय, तू नक्की कर. मला माईसाहेब या भूमिकेत तुला बघायचंय.” तिच्या आणि माझ्या नवऱ्याच्या पाठिंब्यामुळेच मी ही भूमिका आनंदाने आणि मनापासून करत आहे.”

अभिनेत्री स्नेहलता वसईकर ही ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या टीव्ही मालिकेपासून प्रसिद्ध झाली. यानंतर तिने ‘अनुराधा’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटामध्ये काम केले. आता अभिनेत्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. स्नेहलताला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

Web Title: Marathi actress snehalata vasaikar strong comeback she will play an important role in the tujyasathi tujyasanga serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 05:10 PM

Topics:  

  • entertainment
  • Indian Television
  • marathi serial news

संबंधित बातम्या

गौतमी पाटीलच्या हाती लागला नवा प्रोजेक्ट ? अभिनेत्री थेट ‘इंडियन आयडॉल’ झळकणार
1

गौतमी पाटीलच्या हाती लागला नवा प्रोजेक्ट ? अभिनेत्री थेट ‘इंडियन आयडॉल’ झळकणार

कमळीच्या आयुष्यात येणार संघर्ष! सरोज आणि कमळीची होणार का भेट?
2

कमळीच्या आयुष्यात येणार संघर्ष! सरोज आणि कमळीची होणार का भेट?

हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरच्या “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज, सोशल मीडियावर ट्रेंडिंग
3

हास्य जत्रा फेम श्रमेश बेटकरच्या “लास्ट स्टॉप खांदा”चे टायटल साँग रिलीज, सोशल मीडियावर ट्रेंडिंग

‘दाऊद इब्राहिम आतंकवादी नाही…’, ममता कुलकर्णीच्या वादग्रस्त विधानाने उडवली खळबळ
4

‘दाऊद इब्राहिम आतंकवादी नाही…’, ममता कुलकर्णीच्या वादग्रस्त विधानाने उडवली खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.