(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
पाकिस्तानी चित्रपटसृष्टीतून खूप दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगर अली या प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन झाले आहे. हुमैरा तिच्या कराचीतील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली आहे. अभिनेत्री हुमैरा असगर अली तिच्या मृत्यूच्या जवळजवळ तीन आठवड्यांनंतर मंगळवारी कराचीतील डिफेन्स एरियामधील तिच्या अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळली. या धक्कादायक बातमीमुळे
सगळे चकीत झाले आहे.
हुमैरा असगर अली कोण होती?
पाकिस्तानी अभिनेत्री हुमैरा असगर अलीबद्दल बोलायचे झाले तर, ती एक लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल होती. हुमैरा असगर अली टीव्ही शो ‘तमाशा घर’ आणि पाकिस्तानी चित्रपट ‘जलिबी’ मध्ये काम करत होती. हुमैरा असगर अली फक्त 30 वर्षांची होती. लहान वयातच हुमैराने खूप लोकप्रियता मिळवली होती आणि प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. हुमैराचे काम सर्वांना खूप आवडायचे. अभिनेत्रीचा चाहता वर्ग देखील सोशल मीडियावर मोठा आहे. तसेच आता या बातमीने ते दुःख व्यक्त करत आहे.
‘Baaghi 4’ चं शूटिंग संपताच टायगर श्रॉफने शेअर केला स्पेशल फोटो, अभिनेत्याचा फिटनेस फ्रिक लूक चर्चेत
शेजाऱ्यांना आला संशय
पाकिस्तानी माध्यमांवर विश्वास ठेवायचा झाला तर, हुमैरा असगर अली गेल्या काही वर्षांपासून तिच्या फ्लॅटमध्ये एकटीच राहत होती. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, तिच्या शेजाऱ्यांना तिच्या अपार्टमेंटमधून दुर्गंधी येत होती आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले. शेजाऱ्यांना कळले की त्यांनी अभिनेत्रीला बराच काळ पाहिले नाही तेव्हा त्यांचा संशय आणखी वाढला.
कंगना रणौतला राजकारणात नाही येतेय मज्जा…; म्हणाली, “समाजसेवा करणे ही माझी…”
पोलिसांनी दरवाजा तोडला
रात्री सुमारे ३ वाजता हुमैराच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना याबद्दल माहिती दिली. यानंतर, पोलीस अभिनेत्रीच्या घरी आले. पोलिसांनी दार ठोठावले तेव्हा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यानंतर पोलिसांनी घराचा गेट तोडला आणि प्रवेश केला. पोलीस आत गेले तेव्हा हुमैरा जमिनीवर मृतावस्थेत पडली होती. पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. पोलिसांच्या तपासातून काय बाहेर येते हे पाहणे बाकी आहे. तसेच आता अभिनेत्रीचा मृत्यू कसा झाला हे अद्यापही समजलेले नाही आहे.