
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी मोळी अभिनेत्री सई ताम्हणकर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ते म्हणजे मटका किंग यातील तिच्या पात्रामुळे. सई ताम्हणकर ही नेहमीच अशा महिला पात्रांकडे आकर्षित झाली आहे. ज्यांच्यात एक जिद्द असते, स्वतःचा आवाज असतो आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची ताकद असते. प्राइम व्हिडिओवरील ‘मटका किंग’मधील बरखा अगदी तशीच आहे. अतिशय स्वतंत्र विचारांची, स्वतःबद्दल जागरूक आणि स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणारी बरखा ही कथा वाचताच सईंच्या मनात घर करून गेली. एका कलाकारासाठी जो नेहमीच सखोल भूमिकांच्या शोधात असतो, हा रोल खूप वेगळा ठरला. येथे सई त्या पात्राबद्दल मनमोकळेपणाने बोली आहे, ज्याने तिला अक्षरशः वेड लावले.
सईने आपल्या पात्राबद्दल केला खुलासा
आपल्या पात्राबद्दल सांगताना सई म्हणाली “ती एक जिद्दी महिला आहे. साधारणपणे जेव्हा तुम्ही एखाद्याच्या पत्नीची भूमिका करता, तेव्हा एक समज तयार होतो की ‘अरे, ही फक्त पत्नी आहे.’ पण या महिलेची स्वतःची एक दुनिया आहे, स्वतःचा आवाज आहे आणि ती तो आवाज वापरतेही, हे मला खूप भावले. ती आपल्या पतीच्या लोकप्रियतेखाली, ग्लॅमरखाली किंवा पैशांच्या दडपणाखाली दबलेली नाही. तिची स्वतःची विचारसरणी आहे, स्वतःची वेगळी ओळख आहे, जी ती जपते हे खूप खास आहे. मला खंबीर महिलांचे पात्र आवडतात आणि बरखा तशीच आहे.”
सईने पुढे सांगितले की, त्या स्वतःच आपल्या पात्राच्या फॅन कशा झाल्या: “सुरुवातीला ती विजय वर्मा यांनी साकारलेल्या ब्रिज भट्टीच्या ग्लॅमर, लोकप्रियता आणि पैशांकडे आकर्षित होते. पण नंतर हळूहळू, या सगळ्या चमकधमककडे पाहून ती स्वतःचा मार्ग शोधते. बरखाचा प्रवास हा बाहेरून सुरू होतो आणि स्वतःच्या शोधापर्यंत पोहोचतो. हा प्रवास खूप रंजक आहे. माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे या प्रवासात तिचा व्यक्ती म्हणून होणारा विकास, आणि तिच्यातील बदल खरोखरच खूप रोचक आहे. मी बरखाची फॅन आहे.”
सिरीजमध्ये कोणत्या कलाकारांचा समावेश?
नागराज पोपटराव मंजुळे यांनी मटका किंग या सिरीजचे दिग्दर्शन केले असून ही सिरीज अभय कोराने यांनी निर्मिक केली आहे. यात विजय वर्मा, कृतिका कामरा , सई ताम्हणकर , सिद्धार्थ जाधव, भूपेंद्र जादावत आणि गुलशन ग्रोवर मुख्य भूमिकेत आहेत. तसेच इतर कलाकारांमध्ये भरत जाधव, गिरीश कुलकर्णी, जेमी लीवर, किशोर कदम, सायरस साहूकार, अर्पिता सेठिया, संभाजी तांगडे, इश्तियाक खान, संजीव जोटांगिया आणि सिमरन अश्विनी यांचा समावेश आहे.
Asha Bhosle Died : सांगलीच्या ‘आशा’ अन् ऋणानुबंध! जन्मभूमीतून सुरू झालेला सुरांचा प्रवास जगभर