Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली

Nida Fazali : निदा फाजली यांची सोमवारी जयंती. उर्दु-हिंदी साहित्य क्षेत्रातील ते एक मोठं नाव. त्यांच्या शायरी या सामान्य माणसाच्या मनाला भिडणाऱ्या अशाच आहेत. त्यांनी लिहिलेली अनेक चित्रपट गिते प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 11, 2026 | 06:19 PM
Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली

Follow Us
Follow Us:
  • सोमवारी निदा फाजली यांची जयंती
  • सहजसोप्या शब्दांत शायरीचं लेखण
  • अनेक चित्रपटांसाठी गीते लिहिली
‘होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है’, 1999 साली आलेला आमिर खान व सोनाली बेंद्रेचा ‘सरफरोश’ चित्रपट आपणास माहित असेलच. हा चित्रपट आमिर खानच्या अभिनयाप्रमाणेच त्यातील गाण्यांनी सुपरहिट ठरला होता. त्यातील ‘होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है’ ही शायरी आजही लाखो तरुण-तरुणींच्या मनात घरं करून आहे. या गाण्याचे किंवा या शायरीचे बोल ज्यांनी लिहिलेत, ते म्हणजे सुप्रसिद्ध शायर, तसेच हिंदी व उर्दुचे साहित्यिक निदा फाजली (Nida Fazali).

‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता, कहीं ज़मीन तो कहीं आसमाँ नहीं मिलता’, या शायरीचा संक्षिप्त संदर्भ असा की, या जगात कोणालाही सर्व काही मिळत नाही. निदा फाजली यांची ही शायरी त्यांच्या मनातील दुःख व्यक्त करते. त्यांनी सर्वसामान्य माणसाचं जीवन, त्यांचा संघर्ष, नाते, प्रेम व माणुसकीला इतक्या सरळ शब्दांत व्यक्त केले की, त्यांची शायरी आजही लोकांच्या ओठावर साम्राज्य करून आहे.

अधुरी प्रेम कहाणी

निदा फाजली यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1938 ला दिल्लीत झाला. त्यांचे खरं नाव मुक्तदा हसन होते. त्यांचे लहानपण मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरला गेले. येथेच त्यांचे शिक्षण ही झाले. त्यांचे वडील मुर्तुझा देखील शायर होते. त्यांच्याच साहित्याचा वारसा निदा यांनी आपल्याकडे घेतला. दरम्यान, निदा यांच्या शायरीचा आवाज हळुहळू त्यांच्या जीवनातील अनुभवांनी घडत गेला.

कॉलेजमध्ये असताना त्यांचे एका तरुणीवर जीव जडले. ती तरुणी पुढच्या रांगेत बसायची. एक दिवस कॉलेजच्या नोटीस बोर्डवर त्या तरुणीचे अपघातात निधन झाले अशी माहिती देण्यात आली. या बातमीमुळे निदांना धक्का बसला. त्यांच्या मनात दुःखाचा असा उद्रेक झाला होता की, ते व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे शब्दच नव्हते. याच भावनेने त्यांना स्वतःच्या भावना समजून घेण्यास आणि त्या शब्दांत व्यक्त करण्यास प्रवृत्त केले.

Nana Patekar: रात्री २.३० वाजता नाना पाटेकरांनी मित्राला केला मेसेज; कोण हा मित्र?

..पण ते भारतातच राहिले

असे सांगितले जाते की, एका सकाळी निदा फाजली एका मंदिरा जवळून जात होते. तेथे त्यांनी सूरदासचे भजन ऐकले. ‘मधुबन तुम क्यौं रहत हरे?’, कृष्णाच्या विरहात दुःखी झालेल्या राधा आणि गोपींच्या भावना व्यक्त करणारे हे भजन त्यांच्या मनाला भावले. विरहाची आणि प्रिय व्यक्तीपासून दूर होण्याची वेदना हा केवळ त्यांचाच वैयक्तिक अनुभव नसून, इतरांनाही ती जाणवते, याची त्यांना जाणीव झाली.
त्यानंतर त्यांनी कबीर, तुलसीदास, सूरदास, मीराबाई आणि बाबा फरीद यांसारख्या साहित्यिकांच्या रचनांचा अभ्यास केला. गालिब आणि मीर यांच्या शायरीतूनही त्यांनी प्रेरणा घेतली. या सर्वांचा प्रभाव त्यांच्या लेखनातून दिसू लागला. सर्वसामान्य माणसालाही सहज समजेल आणि स्वतःच्या आयुष्याशी जोडून घेता येईल, अशा सोप्या भाषेत ते लिहू लागले.
देशाच्या विभागणीदरम्यान निदा फाजली यांचे आई-वडील पाकिस्तानात गेले, पण त्यांनी भारतातच राहण्याचा निर्णय घेतला. कुटुंबापासून लांब राहत स्वतःचं आयुष्य घडवणं काही सोप्पी बाब नव्हती. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नोकरी व लेखण क्षेत्रात संघर्ष सुरू केला.

New Marathi Song: महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित

1964 साली मुंबई गाठली

ते 1964 साली मुंबईत आले. तिथे त्यांनी वर्तमानपत्रात लिखाणाला सुरुवात केली. हळुहळू त्यांच्या ओळखी वाढल्या. 1969 साली त्यांच्या उर्दु कवितेचा संग्रह प्रकाशित झाला. त्यांच्या शायरीत बनावटपणा नसायचा. ते आयुष्याकडे ज्या दृष्टीकोनातून पहायचे, त्यालाच ते शब्दरुपी कागदावर उतरवत होते.

निदा फाजली यांनी साहित्यासह हिंदी चित्रपटांत आपली वेगळी ओळख निर्माण केली. चित्रपट ‘रजिया सुल्तान’मधून त्यांच्या चित्रपट गितांच्या प्रवासाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी अनेक अविस्मरणीय गीते लिहिली. चित्रपट ‘आहिस्ता-आहिस्ता’मधील गीत ‘कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता’ आणि सरफरोशमधील ‘होश वालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है’ आजही रसिकांमध्ये लोकप्रिय आहे.
त्यांनी आपले अनुभव व भावणांना शायरीच्या रुपात वाट करून दिली, पण त्यांच्या रचना फक्त त्यांच्या जीवनाची गोष्ट बनून राहिली नाही, तर ते आज लाखो लोकांच्या ह्रदयाचा आवाज बनलेत.

Web Title: Nida fazali jayanti famous shayari bollywood songs rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • madhya pradesh
  • Shayari

संबंधित बातम्या

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral
1

अजब-गजब! प्राणीसंग्रहालयातून नव्या नवरीला घेऊन बाॅयफ्रेंड फरार, नवरा गाडी पार्क करायला गेला अन् घटनेचा Video Viral

Buldhana: सोयाबीन काढणीला वेग; मध्य प्रदेशातून हजारो मजूर दाखल, स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न
2

Buldhana: सोयाबीन काढणीला वेग; मध्य प्रदेशातून हजारो मजूर दाखल, स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.