Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana: सोयाबीन काढणीला वेग; मध्य प्रदेशातून हजारो मजूर दाखल, स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न

Buldhana Soybean Harvest Madhya Pradesh Labourers: बुलढाणा जिल्ह्यात सोयाबीन काढणीला वेग आला असून, मध्य प्रदेशातून आलेल्या ५ ते ६ हजार मजुरांमुळे काढणीचे काम गतीने सुरू आहे. सोयाबीन हंगामानंतर स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊन पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगरकडे स्थलांतर वाढण्याची शक्यता आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 08, 2026 | 06:49 PM
Buldhana Soybean Harvest

Buldhana Soybean Harvest

Follow Us
Follow Us:
  • बुलढाण्यात सोयाबीन काढणीला वेग
  • मध्य प्रदेशातून मजूर दाखल
  • स्थानिक मजुरांचे स्थलांतर वाढणार?
बुलढाणा : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीला जिल्ह्यात वेग आला. यंदा पावसाचे प्रमाण अपेक्षेप्रमाणे न झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असतानाच, उपलब्ध परिस्थितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीला सुरुवात केली आहे. साधारण तीन महिन्यांच्या मशागतीनंतर सुरू इसलेला हा काढणीचा हंगाम पुढील एक ते दोन आठवडे चालण्याची शक्यता आहे.सोयाबीन काढणीसाठी शेजारील मध्य प्रदेशातून मोठ्या संख्येने मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. खरगोन, बैतूल आणि खांडवा परिसरातून जवळपास पाच ते सहा हजार मजूर जिल्ह्यात आले असून, त्यांच्या उपलब्धतेमुळे सोयाबीन काढणीला वेग आला. रखरखत्या उन्हातही शेतांमध्ये मजुरांकडून सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे.

Washim News: मत्स्य व्यावसायिकांना मदत देणार, मंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आढावा

खरीप हंगाम संपल्यानंतर हे मजूर पुन्हा मध्य प्रदेशात परततील मात्र, स्थानिक – मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न राहील एवढे मात्र निश्चीत..! यंदाच्या हंगामात अत्यल्प झालेल्या पर्जन्यमानाचा फटका रब्बी – हंगामावर होणार असल्याने सहाजिकच रब्बीच्या पेऱ्यात घट होणार आहे, मजुराच्या हाताला काम मिळेल किंवा नाही याची शाश्वती, राहिली नाही. पर्यायाने रोजगाराच्या शोधात जिल्ह्यातील मजुरांना स्थलांतर व्हावे लागणार ? की प्रशासनाच्या वतीने त्यांना येथे रोजगार उपलब्ध करून दिल्या जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

रोजगारासाठी शहरांकडे धाव

जिल्ह्यातील रोजगाराच्या मर्यादित संधी आणि शेतीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था यामुळे सोयाबीन काढणीचा हंगाम संपल्यानंतर स्थानिक मजुराचे मोठ्या शहरांकडे स्थलांतर वाढण्याची शक्यता आहे. पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरांकडे रोजगाराच्या शोधात मजुरांची पावले वळण्याची शक्यता आहे.

स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न

खरीप हंगामातील काम संपल्यानंतर मात्र स्थानिक मजुरांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने रब्बी हंगामातील शेतीची कामेही मर्यादित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर सर्व मजुरांच्या हाताला सातत्याने काम मिळेल, याची शाश्वती कमी झाली आहे. साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरनंतर जिल्ह्यात बांधकाम क्षेत्रातील गवंडी आणि मजुरांना कामाची संधी उपलब्ध होते. मात्र कमी पावसामुळे यंदा घरबांधणी आणि बांधकामांची संख्या कमी राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिणामी स्थानिक रोजगाराच्या संधी आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Washim: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या, रणथम शिवारात अंधारात टॉर्चच्या उजेडात केली पीक पाहणी

Web Title: Buldhana soybean harvest madhya pradesh labourers employment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • buldhana news
  • madhya pradesh
  • soyabin news

संबंधित बातम्या

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा
1

Buldhana: हत्याकांडप्रकरणात २० जणांना अटक, देऊळगाव राजात नगरसेवकासह दोघांचा खून; दोन्ही गटांतील ४० जणांवर गुन्हा

Buldhana: परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, रखरखत्या उन्हात सोयाबीन काढणीला वेग; रब्बी पिकांसाठी महत्त्वाचे
2

Buldhana: परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, रखरखत्या उन्हात सोयाबीन काढणीला वेग; रब्बी पिकांसाठी महत्त्वाचे

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?
3

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले
4

कर्ज फेडण्यासाठी जमीन विकली, वावर गहाण अन् पत्नीचे मंगळसूत्रही ठेवले; अखेर तरुण शेतकऱ्याने जीवन संपवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.