
फोटो सौजन्य - Social Media
Mamachya Govyala Jauya : सिनेमाचे आणखीन एक गाणे समोर! ‘या’ तिघडीने केला राडा, ‘डार्लिंग’ ऐकलं का?
कोयंबतूर येथे स्थित असलेल्या आदियोगीच्या 112 फूट उंच भव्य मूर्तीसमोर पार पडलेल्या या विवाहसोहळ्याला दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते. पलकने लग्नासाठी बेज आणि लाल रंगाचा पारंपरिक लेहेंगा परिधान केला होता, तर रोहनने शाही अंदाजातील शेरवानी घातली होती. लग्नाच्या छायाचित्रांमध्ये दोघांची केमिस्ट्री आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत आहे.
लग्नाबाबत बोलताना पलकने सांगितले की, काही खास क्षण सार्वजनिक करण्यापूर्वी त्यांना जपून ठेवण्यात वेगळे सौंदर्य असते. त्यामुळेच त्यांनी हा विवाहसोहळा खासगी ठेवण्याचा निर्णय घेतला. सूर्योदयाच्या वेळी आदियोगीच्या साक्षीने घेतलेल्या फेऱ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असल्याचे तिने नमूद केले.
यावेळी वातावरणही विशेष होते. विवाहसोहळ्यादरम्यान हलका पाऊस, आकाशात उमटलेले इंद्रधनुष्य आणि परिसरातील शांतता यामुळे हा सोहळा अधिक संस्मरणीय ठरल्याचे पलकने सांगितले. तिच्या मते, हा केवळ विवाह नव्हता, तर आयुष्याला मिळालेला एक सुंदर आशीर्वाद होता. कामाबाबत बोलायचे झाल्यास, पलक पुरसवानीने ‘बडी देवरानी’ आणि ‘ये रिश्ते हैं प्यार के’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच ‘बिग बॉस OTT 2’ आणि ‘एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला 7’ या रिअॅलिटी शोमधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.