Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्विस शेतकऱ्याच्या अपमानानंतर आर माधवनचा घातला होता मोठा निर्णय; 4 वर्षे अभिनयापासून राहिला दूर

बॉलीवूड अभिनेता आर. माधवन यांनी अलीकडेच खुलासा केला की त्यांनी अभिनयापासून चार वर्षांचा ब्रेक घेतला होता. त्यांनी जाणूनबुजून चित्रपटांमध्ये काम करणे टाळले, परंतु आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 03, 2026 | 08:50 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • स्विस शेतकऱ्याच्या अपमानानंतर माधवनचा मोठा निर्णय
  • 4 वर्षे अभिनयापासून अभिनेता का राहिला दूर?
  • आता स्वतःच माधवन यांनी केला खुलासा
 

बॉलीवूड अभिनेता आर. माधवन यांनी आपल्या कारकिर्दीतील एका महत्त्वाच्या वळणाविषयी प्रामाणिकपणे भाष्य करताना दिसला आहे. अभिनय क्षेत्रात यश, लोकप्रियता आणि सतत काम असूनही ते आतून असमाधानी होते, म्हणूनच त्यांनी जाणूनबुजून चार वर्षांचा ब्रेक घेतल्याचा खुलासा आता केला आहे. २०११ साली माधवन यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी ते ज्या भूमिका साकारत होते, त्या त्यांना सर्जनशील समाधान देत नव्हत्या. अखेर २०१६ मध्ये ‘साला खडूस’ या चित्रपटातून अभिनेत्याने दमदार पुनरागमन केले. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील टर्निंग पॉइंट ठरला आणि त्यांच्या रोमँटिक इमेजपासून दूर जात अधिक गंभीर, वास्तववादी भूमिकांचा प्रवास सुरू झाला. माधवन या टप्प्याला त्यांच्या करिअरचा “फेज टू” म्हणतात.

रोहित शेट्टीच्या पुढील चित्रपटासाठी सतर्कता, ‘गोलमाल 5’च्या सेटवर कडक बंदोबस्त तैनात

अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत माधवन यांनी या ब्रेकमागील अनुभव सांगितला. परदेशात चित्रीकरण करत असताना त्यांना एक प्रसंग आयुष्यभर लक्षात राहिला. स्वित्झर्लंडमध्ये एका तमिळ गाण्याच्या शूटिंगदरम्यान ते रंगीबेरंगी कपड्यांत रस्त्याच्या मधोमध उभे होते. त्यावेळी जवळच बसलेला एक स्विस शेतकरी त्यांच्याकडे तुच्छतेने पाहत होता. त्या क्षणी माधवन यांना अचानक जाणवले की ते त्यांच्या कामातून लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण स्वतःच्या कलात्मक समाधानाकडे दुर्लक्ष होत आहे.

या घटनेनंतर सुरुवातीला दुखावले गेलेले माधवन हळूहळू आत्मपरीक्षणाकडे वळले. त्यांना कळून चुकले की ते ज्या भूमिका करत होते, त्यामध्ये स्वतःचे खरे योगदान फारच कमी होते. या काळात त्यांची पत्नी सरिता बिर्जे यांनी त्यांना पूर्णपणे समजून घेतले आणि आधार दिला. चार वर्षांच्या विश्रांतीदरम्यान माधवन यांनी चित्रपट आणि जाहिरातींपासून स्वतःला दूर ठेवले. त्यांनी दाढी वाढवली, साधे जीवन जगले आणि चेन्नईसह संपूर्ण भारतात प्रवास केला. या प्रवासात त्यांनी रिक्षाचालक, सामान्य नागरिक यांच्याशी संवाद साधला आणि देशातील वास्तव, लोकांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न केला. माधवन यांच्या मते, हा अनुभवच आज त्यांच्या अभिनयाचा खरा पाया आहे असे त्यांनी म्हटले आहे.

”किती फालतुपणा..”, मुंबईच्या रस्त्यावर बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली Sonam Kapoor; नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

दरम्यान, त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी आर. माधवन यांना अलीकडेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सन्मान त्यांच्या अपेक्षेपलीकडचा असल्याची भावना त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली. कामाच्या आघाडीवर, माधवन अलीकडे आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या हिट चित्रपटात झळकले होते. आता ते ‘धुरंधर २’ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा चित्रपट १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी ते अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासोबत ‘दे दे प्यार दे २’ मध्येही दिसले होते.

Web Title: R madhavan took four year break from acting grew beard swiss farmer insulted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 08:50 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • R Madhavan

संबंधित बातम्या

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण
1

Ganesh Yadav Instagram: पडद्यावर दमदार, आता सोशल मीडियावरही एन्ट्री! अभिनेता गणेश यादव यांचे Instagram वर पदार्पण

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?
2

Ajay Devgn Juhu Bungalow: अजय देवगणच्या जुहूतील बंगल्याचं बांधकाम वादात; BMCची ‘स्टॉप वर्क’ नोटीस, कारण काय?

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा
4

Deepika Padukone-Ranveer Singh: घरी पुन्हा ‘लक्ष्मी’ आली! दीपिका-रणवीर दुसऱ्यांदा झाले आई-बाबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.